Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंजली दमानिया यांना छगन भुजबळ यांच्या घराबाहेर पोलिसांनी रोखलं

Anjali damania Police stopped at Chhagan Bhujbal Home : छगन भुजबळ यांच्या घराबाहेर पत्रकार परिषद घेण्यासाठी निघालेल्या अंजली दमानिया यांना पोलिसांनी रोखलं. महिला पोलीस आणि दमानिया यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी दमानिया भडकल्या, मी चोर आहे का?, असा सवाल त्यांनी केला. पाहा नेमकं काय घडतंय...

अंजली दमानिया यांना छगन भुजबळ यांच्या घराबाहेर पोलिसांनी रोखलं
Anjali damania
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 12:24 PM

गोविंद ठाकूर, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 18 नोव्हेंबर 2023 : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या घराबाहेर पत्रकार परिषद घेणार होत्या. त्यासाठी दमानिया भुजबळांच्या घराकडे निघाल्या. मात्र त्याआधीच पोलिसांकडून अंजली दमानिया यांना अडवण्यात आलं आहे. अंजली दमानिया यांना पोलिसांनी रोखलं आहे. अंजली दमानिया यांना सांताक्रूझ पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर अंजली दमानिया यांना पोलिसांनी जुहू पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे. यावेळी अंजली दमानिया आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली.

जालन्यातील अंबडमध्ये काल ओबीसी एल्गार महासभा झाली. या सभेतून छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. यावर अंजली दमानिया यांनी भाष्य केलंय. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कुठेतरी मला असं वाटतं की, छगन भुजबळांना देवेंद्र फडणवीसांनी जरांगेंना विरोध करण्यासाठी उभं केलं आहे. आता तावा तावाने भुजबळ कसे बोलतात पाहा… जेलमधून बाहेर येण्यासाठी अगदी गरीब बिचारे बनण्याचा आव आणायचा. आता छातीत कळ नाही येत?, असं म्हणत अंजली दमानिया यांनी भुजबळांवर गंभीर आरोप केलेत.

आज भुजबळांचे भाषण ऐकून तळ पायाची आग मस्तकात गेली. कुणाच्या कष्टाचे खात आहेत भुजबळ?, असं म्हणत दमानिया यांनी भुजबळ यांच्यावर घणाघात केला आहे. सोशल मीडियावरून त्यांनी भुजबळांवर गंभीर आरोप केलेत. अशात आता अंजली दमानिया आज पत्रकार परिषद घेणार आहेत. मात्र त्याआधीच त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पण आता दमानिया यांची होणार का? आणि जर ही पत्रकार परिषद झाल्यास दमानिया काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

“अनेक खुलासे करणार”

छगन भुजबळ यांच्या कालच्या भाषणानंतर आज मी त्यांच्या घराचं समोर जाऊन पत्रकार परिषद घेणार आहे. मात्र त्यांच्या घराबाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. रस्त्यावर बॅरिकेड्स लावल्याचंही दिसतंय. तरीही मी जाऊन पत्रकार परिषद घेईन, पोलिसांनी मला जिथे अडवले तिथे मी पत्रकार परिषद घेणार आहे. छगन भुजबळ यांच्याबाबत अनेक खुलासे मी करणार आहे, असं अंजली दमानिया म्हणाल्या.

छगन भुजबळांच्या घरी पोलीस बंदोबस्त वाढवला

मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. काल झालेल्या ओबीसी सभेनंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस खबरदारी घेत आहेत. भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस गस्त घालत आहेत. त्याचप्रमाणे ताफ्यातील पोलीस वाहनांच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे.

..याची माहिती CM यांना आहे का?, बीड हत्या प्रकरणावरून दमानियांची टीका
..याची माहिती CM यांना आहे का?, बीड हत्या प्रकरणावरून दमानियांची टीका.
गोऱ्हेंना अंधारेंची कायदेशीर नोटीस, ठाकरेंबद्दलचं 'ते' भाष्य करण भोवलं
गोऱ्हेंना अंधारेंची कायदेशीर नोटीस, ठाकरेंबद्दलचं 'ते' भाष्य करण भोवलं.
त्र्यंबकेश्वरमधील वादावर प्राजक्ता स्पष्ट म्हणाली, मनातले किंतू परंतू
त्र्यंबकेश्वरमधील वादावर प्राजक्ता स्पष्ट म्हणाली, मनातले किंतू परंतू.
देख तूनी बायको.. गाण्यावर थिरकले महसूलचे अधिकारी; वडेट्टीवारांचा संताप
देख तूनी बायको.. गाण्यावर थिरकले महसूलचे अधिकारी; वडेट्टीवारांचा संताप.
धंगेकर पक्षप्रवेशावर स्पष्टच म्हणाले, 'निर्णय घ्यायचा की नाही ते...'
धंगेकर पक्षप्रवेशावर स्पष्टच म्हणाले, 'निर्णय घ्यायचा की नाही ते...'.
'..माझ्यावर दबाव होता', कोल्हेंचा 'स्वराज्यरक्षक संभाजी'बाबत मोठा दावा
'..माझ्यावर दबाव होता', कोल्हेंचा 'स्वराज्यरक्षक संभाजी'बाबत मोठा दावा.
'पण ब्राम्हणांची औकात...', इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांना धमकी
'पण ब्राम्हणांची औकात...', इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांना धमकी.
गोऱ्हेंच्या वक्तव्यानं शिवसेनेत नाराजीचा सूर?आता पक्षाची भूमिका काय?
गोऱ्हेंच्या वक्तव्यानं शिवसेनेत नाराजीचा सूर?आता पक्षाची भूमिका काय?.
राऊतांचा फोटो थेट रेड्याच्या गळ्यात, शिवसेनेचं कुठं अनोखं आंदोलन?
राऊतांचा फोटो थेट रेड्याच्या गळ्यात, शिवसेनेचं कुठं अनोखं आंदोलन?.
त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध, पोलिसात पत्र
त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध, पोलिसात पत्र.