मुंबई | आयएनएस विक्रांत घोटाळ्या प्रकरणी 58 कोटी रुपयांचे आरोप असलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज अनेक दिवसानंतर पत्रकार परिषद घेतली. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी दोन व्यक्ती गायब असून त्यांना कुठे लपवून ठेवलंय, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना केलाय. पहिले म्हणजे नंदकिशोर चतुर्वेदी आणि दुसरे म्हणजे प्रवीण कलमे (Pravin Kalme). मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या दादर येथील श्री जी कंपनीत 29 कोटींचा मनी लाँड्रिंगचा पैसा आला असून तो हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदीच्या मदतीने आल्याचा आरोप सोमय्यांनी केला. तपास यंत्रणा चतुर्वेदींच्या शोधात असून ते गायब असल्याचे दिसून येत आहेत, असे सोमय्या म्हणाले. तसेच प्रवीण कलमे यांनीही माझ्याविरोधात अनेक केसेस केल्या, मात्र आता तेदेखील गायब असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं.
पत्रकार परिषदेत प्रवीण कलमे यांच्याविषयी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, ‘काही महिन्यांपूर्वी मी जितेंद्र आव्हाड यांचे वाझे यावर बोललो होतो. त्यानंतर प्रवीण कलमे यांनी माझ्याविरोधात अनेक तक्रारी केल्या. कोर्टात याचिका दाखल केली. कलमेंनी अनेक केसेस केल्या आणि आरोप केले. माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे. प्रवीण कलमे कुठे आहेत? आव्हाड त्याची माहिती देऊ शकतात का? की कलमे भारतात आहे की विदेशात आहे? प्रवीण कलमे यांच्याविरोधात एप्रिलमध्ये एफआयआर दाखल केला. ही सोमय्या यांनी केली नाही. तर एसआरएने दाखल केली आहे. कलमे सरकारी कार्यालयात येऊन फायली आणि कागदे चोरून नेत असल्याचा आरोप केला आहे. अजामीनपात्रं गुन्हा दाखल आहे. त्याच्याविरोधात का कारवाई होत नाही? त्यांना फरार का घोषित केलं जात नाही? त्याला कागद चोरताना पकडलं आहे. या गोष्टीला आज 15 दिवस झाले. कलमे विदेशात गेला? तो कसा गेला? त्यांना मदत कुणी जितेंद्र आव्हाड की अनिल परबांनी केली? आमच्या विरोधात आरोप करणारे आणि त्यांना पाठिंबा देणारे यावर उत्तर देणार का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला.
इतर बातम्या-