Navneet Rana | नवनीत राणांची संपूर्ण इमारतच संकटात, सर्वच फ्लॅटधारकांना नोटीस, बीएमसी ऑडिट करणार

आता बीएमसीने पुन्हा एकदा राणा दाम्पत्याच्या मुंबईतील संपूर्ण इमारतीला नोटीस पाठवली आहे. त्यामुळे खार मधील सर्वच फ्लॅटधारक संकटात सापडण्याची शक्यता आहे.

Navneet Rana | नवनीत राणांची संपूर्ण इमारतच संकटात, सर्वच फ्लॅटधारकांना नोटीस, बीएमसी ऑडिट करणार
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 2:15 PM

मुंबईः नवनीत राणा (Navneet rana) यांच्या मुंबईतील फ्लॅटला नोटीस मिळाल्यानंतर आता ही संपूर्ण इमारतच अडचणीत सापडली आहे. इमारतीतील सर्वच फ्लॅटधारकांना मुंबई महापालिकेने (BMC) नोटीस पाठवली आहे. नियमबाह्य बांधकाम केल्याचा आरोप नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर करण्यात आला होता. मुंबईतील खार परिसरातील इमारतीत राणा दाम्पत्याचा फ्लॅट आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आव्हान देत मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणण्याचा हट्ट राणा दाम्पत्याला चांगलाच महागात पडलाय, अशी चर्चा या निमित्ताने होत आहे. राणा दाम्पत्याच्या फ्लॅटला बीएमसीने याआधी नोटीस पाठवली होती. आता खारमधील या इमारतीत राहणाऱ्या सर्वच फ्लॅटधारकांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. बीएमसीचे अधिकारी या इमारतीचे ऑडिट करणार असून त्याचा अहवालही लवकरच जाहीर केला जाईल.

राणा दाम्पत्य नुकतेच अमरावतीत परतले

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे नुकतेच दिल्लीतून अमरावतीत दाखल झाले आहेत. मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी आग्रही भूमिका घेतल्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांच्याविरोधात पोलिसांनी राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस कोठडीत असताना आपल्याला चांगली वर्तणूक मिळाली नसल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. एकूणच राज्य सरकारची भूमिका आणि पोलीसांनी दिलेली वागणूक याविषयी तक्रार करण्याकरिता नवनीत राणा यांनी नवी दिल्ली गाठली होती. केंद्र सरकारकडे त्यांनी यासंदर्भात तक्रारही केली आहे. त्यानंतर दिल्लीत हनुमान चालिसा पठण करत नवनीत राणा यांनी मोठे शक्ती प्रदर्शनही केले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी नवनीत राणा आणि रवी राणा अमरावतीत परतले.

हे सुद्धा वाचा

सर्वच फ्लॅटधारक संकटात

राजद्रोह खटला दाखल केल्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांना जामीन मिळाला असून ते सध्या अमरावतीत आहेत. आता बीएमसीने पुन्हा एकदा राणा दाम्पत्याच्या मुंबईतील संपूर्ण इमारतीला नोटीस पाठवली आहे. त्यामुळे खार मधील सर्वच फ्लॅटधारक संकटात सापडण्याची शक्यता आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.