Corona Update: मुंबईत पार्ट्यांवर बंदी, तर इमारतीही सील, आदित्य ठाकरेंनी सांगितलं काय करायचं, काय नको!

मुंबईसह राज्यभरात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेषतः मुंबईकरांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, याची नियमावली पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितली.

Corona Update: मुंबईत पार्ट्यांवर बंदी, तर इमारतीही सील, आदित्य ठाकरेंनी सांगितलं काय करायचं, काय नको!
आदित्य ठाकरे, पालकमंत्री, मुंबई
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 3:00 PM

मुंबईः महाराष्ट्रात मागील आठवड्यापासून अचानक कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असून ही चिंताजनक बाब आहे. ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांनी गंभीरपणे ही स्थिती हाताळावी, असे निर्देश पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिले आहेत. तसेच कोणत्या स्थितीत मुंबईतील (Rules for MUmbai) इमारती सील करायच्या, मुंबईत कोणत्या पार्ट्यांवर बंदी आहे, या सगळ्याविषयी आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले.

आदित्य ठाकरेंनी सांगितली नियमावली

कोरोना रुग्णांच्या अचानक वाढलेल्या आकड्यामुळे मुंबईकरांनी नियमांचं काटेकोरपणे पालन केलंच पाहिजे, अशा सूचना आदित्य ठाकरे यांनी दिल्या आहेत. ते नियम पुढील प्रमाणे- – एखाद्या इमारतीत 10 पेक्षा जास्त व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास ती संपूर्ण इमारत पुढील पंधरा दिवस सील केली जाईल. – सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या पार्ट्या होणार नाहीत. – 31 डिसेंबर किंवा न्यू ईयरच्या पार्श्वभूमीवर कोणीही पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊन कार्यक्रम करू नयेत, असेही आदित्य ठाकरेंनी सांगितले. – मुंबईत 58 हजार बेड्स उपलब्ध आहेत. मात्र नागरिकांनी गरज असल्याशिवाय बाहेर पडणे टाळावे. – लसीकरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. – कोराना केसेस वाढल्या तरी पॅनिक होऊ नका. शाळा, कॉलेजसंदर्भात निर्णय घेण्यासाठी पालक किंवा डॉक्टरांनी अद्याप कोणतीही मागणी केलेली नाही. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय आणखी दोन दिवसांनी घेतला जाईल.

‘ओमिक्रॉनचा विषाणू कसा आहे, हे डॉक्टरांना ठरवू द्या’

पर्यावरण मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवरून चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, मागील महिन्यात दीडशे कोरोना रुग्ण आढळत होते. आता ती संख्या अडीच हजारांवर गेली आहे. ही स्थिती गांभीर्यानं घेतली पाहिजे. ओमिक्रॉन विषाणू फारसा घातक नाही. जीवघेणा नाही, असे संदेश व्हॉट्सअपवरून फिरत आहेत. मात्र यामुळे नागरिकांनी बेफिकीर राहू नये. ओमिक्रॉनला हलक्यात घेऊ नका. कारण नंतर परिस्थिती बिघडू शकते. ओमिक्रॉनचा विषाणू कसा आहे, भारतीयांची प्रतिकार शक्ती कसा सामना करेल, यासंदर्भात संशोधन सुरु आहेत. या सगळ्याबाबत काय ते डॉक्टरांना ठरवू द्या. नागरिकांनी फक्त नियमांचं पालन करावं, अशा सूचना आदित्य ठाकरे यांनी दिल्या.

इतर बातम्या-

VIDEO: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार काय?; विरोधकांवर बरसत संजय राऊतांचं मोठं विधान

12 आमदारांची नियुक्ती कुणामुळे लटकली?, केंद्रातील कोणत्या खात्याचा राज्यपालांवर दबाव; संजय राऊतांचं मोठं विधान

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.