Extortion case : अंगडिया खंडणी प्रकरण, सौरभ त्रिपाठींच्या शोधासाठी पाच पथके, उत्तर प्रदेशसह, मध्य प्रदेशात पथकाकडून शोध सुरू
मुंबई गुन्हे शाखेने अंगडिया खंडणी प्रकरणी पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी पाच पथके तयार केल्याची माहिती आहे. ही पथक उत्तर प्रदेश, राजस्थानसह अनेक ठिकाणी पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठीचा शोध घेत आहेत. सौरभ त्रिपाठी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कामावर आलेले नाहीत. गुन्हे शाखेने याच प्रकरणी एल. टी. मार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक ओम वंगाटे यांना अटक केली होती.
मुंबई : मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) अंगडिया खंडणी प्रकरणी (Extortion case) पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी (Saurabh Tripathi) यांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी पाच पथके तयार केल्याची माहिती दिली आहे. हे पथक उत्तर प्रदेश, राजस्थानसह अनेक ठिकाणी पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठीचा शोध घेत आहेत. सौरभ त्रिपाठी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कामावर आलेले नाहीत. गुन्हे शाखेने याच प्रकरणी एल. टी. मार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक ओम वंगाटे यांना अटक केली होती. आता उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना फरार आरोपी घोषित करण्यात आलं आहे. संबंधित प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून सुरु असून या प्रकरणात आणखी कुणाकुणाची नावे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांना तयार केलेल्या पाच पथक उत्तर प्रदेशसह मध्य प्रदेशात त्रिपाठीचा शोध घेत असल्याची माहिती दिली आहे.
Maharashtra | Five teams have been formed to investigate the Angadiya extortion case. Searches are going in many places including UP, Rajasthan to find DCP Saurabh Tripathi, a wanted accused in the case: Mumbai Police
— ANI (@ANI) March 20, 2022
काय आहे प्रकरण?
ओम वंगाटे या पोलिस अधिकाऱ्यावर खंडणी उकळल्याचा आरोप आहे. लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात ओम वंगाटे हे पोलीस निरीक्षक आहेत. अंगडिया व्यावसायिकांकडून खंडणी उकळल्याचा आरोप वंगाटे यांच्यावर आहे. खंडणीप्रकरणी ओम वंगाटे यांना अटक करत सोबत अन्य तीन अधिकाऱ्यांवरही खंडणी आणि लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 2021 वर्षातील डिसेंबर महिन्यात अंगडिया व्यापार करणाऱ्यांना आयकराची भीती दाखवत पैसे उकळले होते. पोलिसांची वागणूक आणि पोलिस ठाण्यातील नोंद यात तफावत आढळ्याचं समोर आल्यानंतर अनेकांवर कारवाई करण्यात आली. मुंबई क्राईम ब्रांचकडून खंडणी उकळल्या प्रकरणी अधिक तपास सुरु करण्यात आला. उपायुक्त सौरभ त्रिपाठी गेल्या काही दिवसांपासून पोलीस स्थानकात न आल्यानं संशय बळावला. आता चौकशीतून इतरही अनेकांची नावं समोर येण्याची शक्यता आहे.
तक्रारीनंतर पोलिसांचा भांडाफोड
व्यवसायिकाने पत्र लिहून तक्रार केल्याने या पोलिसांचा भंडाफोड झाला. आणि हे प्रकरण आता त्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. कारण या प्रकरणामुळेच काही अधिकाऱ्यांना आता जेलची हवा खावी लागत आहे. हे एल टी मार्ग पोलीस ठाण्यातील खंडणी प्रकरण आहेत. ज्यात पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्यावर गंभीर आरोप करणारे अंगाडीया यांचे पत्र टीव्ही 9 च्या हाती लागले आहे. या पत्रात डीसीपी सौरभ त्रिपाठी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याच पत्राचा आधार घेत तीन पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आता पोलिसांनी सौरभ त्रिपाठीच्या शोधासाठी पाच पथके तयार केली असून ते उत्तर प्रदेशसह मध्य प्रदेशात आरोपीचा तपास करत आहे.
इतर बातम्या