Mumbai Dog Murder : इथं माणूसकी मेली, पाळीव कुत्र्यांवर गाडी घातली, गुन्हा दाखल, घटनेचे पुरावे CCTV मध्ये कैद
पाळी प्राणी म्हटलं की अनेकांच्या जिवाचा तुकडा असतो. त्याची देखभाल, त्याचं अगदी माणसासारखं पालनपोषण केलं जातं. मात्र, याच पाळीव प्राण्यांसोबत क्रुरता केल्याची आणि माणूसकी मेल्याची एक घटनो समोर आली आहे. पाळीव कुत्र्यावर अंगावर गाडी घालून एक चारचाकी चालक गाडी नेत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. आरोपीचे नाव कुणाल रुपाणी असं असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : पाळी प्राणी म्हटलं की अनेकांच्या जिवाचा तुकडा असतो. अनेकांच्या घरी मांजर, कुत्रा (Dog), पोपट पाळला जातो. त्यांची देखभाल अगदी माणसांसारखी केली जाते. मात्र, याच पाळीव प्राण्यांसोबत क्रूरता केल्याची आणि माणूसकी मेल्याची एक घटना समोर आली आहे. पाळीव कुत्र्याच्या अंगावर गाडी घालून एक चारचाकी (four wheeler) चालक गाडी नेत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये (CCTV) दिसत आहे. आरोपीचे नाव कुणाल रुपाणी असं असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल याने पाळीव कुत्र्यावर चारचाकी घातल्याने कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला होता. ही क्रृरता सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत असून हे दृष्य पाहिल्यावर अंगावर काटा येतो. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कांदिवली पोलिसांनी प्राण्यांचा छळ आयपीसी 429 आणि 279 अंतर्गत गुन्हा कुणाल रुपाणीवर गुन्हा दाखल केला आहे. पाळीवर प्राण्यावर गाडी घालून क्रुरतेचा कळस पुन्हा एकदा समोर आलाय.
क्रूरता दिसल्यास रोखा!
कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला गुन्हा आणि या घटनेवरुन भविष्यात कुठेही प्राण्यांसोबत क्रूरता झाल्याचे लक्षात येताच आवाज उठवला पाहिजे.पाळीव कुत्र्याच्या अंगावर गाडी घालून कुणाल रुपाणी याच्यावर गुन्हा दाखल झालाय. मात्र, यामुळे कुत्र्याचा नाहक जीव गेला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली म्हणून आरोपीवर गुन्हा दाखल झालाय.
पाळीव प्राण्यांसोबत क्रूरता
पाळीव प्राण्यांसोबत क्रूरता केल्याच्या अनेक घटना यापूर्वी देखील समोर आल्या आहे. माकडावर डांबर ओतल्याची घटना, कुत्र्याला जाळल्याची घटना, कुत्र्यांच्या पिलांनाही त्रास दिल्याच्या काही घटना घडल्या आहेत. अशा घटना वारंवार घडू नये, यासाठी प्रयत्न व्हायला हावेत. प्राण्यांसोबत क्रूर व्यवहार करणाऱ्यांवर कडक कारवाई गरजेची असल्याचे अनेक प्राणी प्रेमींना यापूर्वी बोलून दाखवले आहे.
पशू-पक्ष्यांच्या हक्कासाठी आवाज उठवा
भारतासारख्या देशात जिथे प्रत्येक जीवाला देवाचे रूप मानले जाते. तिथे केवळ उपद्रव करण्याच्या हेतूने प्राण्यांवर अत्याचार करणे निंदनीय आहे. भारत सरकारने प्राण्यांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी कायदे केले आहेत. पण या कायद्यांबाबतही जागरुकता असणं गरज आहे.
जबाबदारी विसरता कामा नये!
जगातील बहुतांश धर्मात प्राण्यांची हत्या करणे हे पाप मानले गेले आहे. तरीही काही लोक मोकाट जनावरांचा जीव घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत. प्राण्यांवरील क्रूरता त्यांची संवेदना दर्शवते. प्रत्यक्षात मानवामध्ये मानवतेचा ऱ्हास होत आहे. आता प्राण्यांवर होणारा हिंसाचार कसा थांबवायचा हा प्रश्न आहे. सर्वप्रथम सामान्य माणसाच्या मनात पशु-पक्ष्यांबद्दलची करुणेची भावना जागृत झाली पाहिजे. प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्यांवर कडक कारवाई गरजेची आहे.
इतर बातम्या