मुंबईत गोरेगावमध्ये फिल्म स्टुडिओत आग, अनेक लोक अडकल्याची शक्यता; पाहा व्हिडिओ!

गोरेगावच्या बांगूर नगर येथील एका फिल्म स्टुडिओला आज दुपारी भीषण आग लागली. (Mumbai: Fire breaks at out a film set in Goregaon; no injuries reported so far)

मुंबईत गोरेगावमध्ये फिल्म स्टुडिओत आग, अनेक लोक अडकल्याची शक्यता; पाहा व्हिडिओ!
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 6:35 PM

मुंबई: गोरेगावच्या बांगूर नगर येथील एका फिल्म स्टुडिओला आज दुपारी भीषण आग लागली. दहा अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या सहाय्याने तब्बल एक तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आगीत अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. (Mumbai: Fire breaks at out a film set in Goregaon; no injuries reported so far)

बांगूर नगर येथील एका फिल्म स्टुडिओला आज दुपारी साडेचार वाजता लागली. स्टुडिओला आग लागल्याचं कळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. तब्बल 8 ते 10 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर आग विझवण्याचे काम सुरू झालं होतं. या स्टुडिओत खुर्च्या आणि इतर फर्निचर होतं. त्यामुळे आगीने लाकडी सामानाला तात्काळ पेट घेतला. त्यातच सोसायट्याचा वारा सुटल्याने ही आग अधिकच भडकली. बघता बघता आगीने उग्ररुप धारण केलं होतं. आग आणि धुराचे लोट पसरल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती.

अनेकजण अडकल्याची भीती

स्टुडिओत अनेक लोक अडकल्याची चर्चा सुरू झाल्याने येथील लोकांमध्ये एकच धावपळ उडाली. तर, दुसरीकडे अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून तासाभराने ही आग नियंत्रणात आणली. सध्या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. आगीची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. गर्दीला दूर करत आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना प्रचंड अडचणी येत होत्या, असं सूत्रांनी सांगितलं.

शॉर्टसर्किटने आग?

हा स्टुडिओ बंद होता. पण त्यात शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठ्याप्रमाणावर वित्तहानी झाली आहे. तसेच आगीत आणखी कोणी अडकलंय का? याचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली आहे. या स्टुडिओत अग्निरोधक यंत्रणा होती की नाही? याचाही तपास करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Mumbai: Fire breaks at out a film set in Goregaon; no injuries reported so far)

संबंधित बातम्या:

Sharjeel Usmani : हिंदू समाज सडका झालाय म्हणणारा शरजील उस्मानी कोण आहे?

VIDEO : ‘ती’ व्यायाम करता करता व्हिडीओ बनवत होती, कैद झाली म्यानमार तख्तापलटची संपूर्ण घटना

एमपी गजब है! ‘गोमूत्र फिनाईल’नेच ऑफिस साफ करण्याचा आदेश! बाबू लोकांसमोर धर्मसंकट

(Mumbai: Fire breaks at out a film set in Goregaon; no injuries reported so far)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.