राम शिंदेंचा आक्षेप, आमदार रोहित पवारांना कोर्टाचा समन्स

राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांना कोर्टाने समन्स बजावले आहे.

राम शिंदेंचा आक्षेप, आमदार रोहित पवारांना कोर्टाचा समन्स
Follow us
| Updated on: Feb 11, 2020 | 9:01 PM

औरंगाबाद : राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांना कोर्टाने समन्स बजावले आहे. माजी मंत्री आणि भाजपचे नेते राम शिंदे यांनी रोहित पवारांच्या प्रचारावर आक्षेप घेत कोर्टात याचिका दाखल केली आहे (Mumbai High Court summons MLA Rohit Pawar).

याप्रकरणी कोर्टाने रोहित पवार यांना 13 फेब्रुवारीपर्यंत आपलं मत मांडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कोर्टात रोहित पवारांना बाजू मांडावी लागणार आहे. या याचिकेमुळे रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे (Mumbai High Court summons MLA Rohit Pawar).

रोहित पवार यांनी निवडणुकीत मतदारांना प्रत्येकी एक हजार रुपये वाटले, असा गंभीर आरोप राम शिंदे यांनी याचिकेत केला आहे. याशिवाय रोहित पवारांनी निवडणूक खर्चही लपवला, निवडणुकीत बारामती अॅग्रोच्या कर्मचाऱ्यांचा गैरवापर केला, सोशल मीडियात हेतूपुरस्सर राम शिंदेंची बदनामी केली, असे अनेक आरोप याचिकेत करण्यात आले आहेत. राम शिंदे यांच्या याचिकेची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रोहित पवार यांना नोटीस बजावली आहे.

अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता. टीका टिपण्णी आणि आरोप प्रत्यारोपांनी गाजलेली कर्जत जामखेडची निवडणूक गाजली होती.

रोहित पवार यांना कर्जत जामखेड मतदारसंघातून 1 लाख 34 हजार 848 मतं मिळाली. तर राम शिंदे यांना 91 हजार 815 मते मिळाली. रोहित पवार यांनी राम शिंदेंना 43 हजार 947 मताधिक्यांनी पराभूत केले.

संबंधित बातमी : प्रामाणिकपणे निवडणूक लढलो, जो निर्णय होता तो लोकांचा निर्णय होता : रोहित पवार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.