आज Pratap Sarnaik ची प्रॉपर्टी अटॅच केली, नंतर त्यालाही अटॅच-अटक होणार, Kirit सोमय्यांचा इशारा!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरील कारवाईनंतर प्रताप सरनाईक यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई हा शिवसेनेला दुसरा मोठा धक्का बसला आहे.

आज Pratap Sarnaik ची प्रॉपर्टी अटॅच केली, नंतर त्यालाही अटॅच-अटक होणार, Kirit सोमय्यांचा इशारा!
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा इशारा Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 2:30 PM

मुंबईः NACL घोटाळ्याप्रकरणी शिवसेना आमदार  प्रताप सरनाईक यांच्या 11 कोटी 35 लाख रुपयांच्या प्रॉपर्टीवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. उद्या प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनाही अटक होऊ शकते, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी दिला आहे. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या मालमत्तेवर काही वेळापूर्वीच ईडीने (ED) कारवाई केली आहे. 2013 मध्ये आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर प्रताप सरनाईक यांना अनेकदा समन्स बजावण्यात आले होते. त्याला प्रतिसाद न दिल्यामुळे आता ईडीने ही कारवाई केल्याचे समजते आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरील कारवाईनंतर प्रताप सरनाईक यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई हा शिवसेनेला दुसरा मोठा धक्का बसला आहे.

नंतर यालाही अटक करणार…

प्रताप सरनाईक यांची 11.35 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली, याविषयी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, ‘ एनएसीएल कंपनीच्या घोटाळ्यात प्रताप सरनाईक आणि त्यांचे पार्टनर यांनी 216 कोटी रुपये ढापले होते. 35 कोटी सरनाईकांच्या बँक खात्यात आले होते. या पैशांत त्यांनी टिटवाळ्याची जमीन घेतली होती. आज ईडीने त्यांची पुढची कारवाई केली आहे. साडे अकरा कोटींची प्रॉपर्टी अटॅच झाली आहे. ही कारवाई इथेच थांबणार नाही. उद्धव ठाकरेंनी त्यांचे कितीही गुन्हे माफ केले तरी किरीट सोमय्या थांबणार नाही. एनएसीएलची जनहितयाचिका मी 2013 मध्ये दाखल केली होती. 5,600 कोटींचा घोटाळा करुन गुंतवणूकदारांना लुटलं होतं. आज प्रॉपर्टी अटॅच केली आहे, पुढे केव्हातरी प्रताप सरनाईकलाही अटक केली जाणार.

मीच जनहितयाचिका दाखल केली होती..

किरीट सोमय्या पुढे म्हणाले, ‘ आर्थिक गुन्हे शाखेने 2013 मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 5, 600 कोटी रुपयांचा टर्नओव्हर असणाऱ्या 13 हजार गुंतवणूकदार असलेल्या कंपनीचा घोटाळा झाला आहे, असा आरोप केला जात आहे. चुकीच्या पद्धतीनं पैसे वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवण्यात आले आहेत. याप्रकरणी ईडीने पीएमएल कायद्याअंतर्गत मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 25 डिफॉल्टर ईडीने शोधले होते. त्यांच्यावर कारवाई होत आहे. त्यापैकीच ही एक कारवाई आहे, अशी प्रतिक्रिया किरटीट सोमय्या यांनी दिली.

इतर बातम्या-

आमदारांना मोफत घरे नाहीच, आमदारांना कितीला पडणार घर?; Jitendra Awhad यांनी सांगितली किंमत

Lock Upp Show : कंगना रनौत ‘लॉकअप’ बाहेर…, मुंबई विमानतळावर स्पॉट, पाहा फोटो…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.