मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सकाळी सकाळी प्रवाशांचे हाल
मध्य रेल्वेच्या टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेन २० मिनिटे उशीराने धावत आहेत. तांत्रिक कारणामुळे लोकलची वाहतूक विस्कळीत झाली असून त्यामुळे चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय.
मंगळवार सकाळ उजाडलीच ती मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची बातमी घेऊन. मध्य रेल्वेच्या टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेन २० मिनिटे उशीराने धावत आहेत. तांत्रिक कारणामुळे लोकलची वाहतूक विस्कळीत झाली असून त्यामुळे चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सकाळीच लोकल वाहतूकीवर परिणाम झाल्याने शहाड, कल्याण, डोंबिवली, तसचे ठाणे रेल्वे स्टेशवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ७.३० ते ८ च्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणा झाला. टिटवाळा ते सीएसएमटी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील सर्वच ट्रेन १५ ते २० मिनिटे उशीराने धावत होत्या. मात्र यामुळे सकाळी उठून ऑफीसच्या दिशेने निघालेल्या नागरिकांन मोठा मनस्ताप सहन करावा लागला. केवळ टिटवाळा नव्हे तर शहाड, कल्याण, डोंबिवली , ठाणेसह अनेक स्थानकांवरून लाखो प्रवासी रोज सीएसएमटीच्या दिशेने कामाला जातात. मात्र आज सकाळीच वाहतुकीवर परिणाम झाल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. नेहमीच्या गर्दीत आणखी भर पडली आणि प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
ठाणे स्टेशनवर जाहिरात फलकाला आग
दरम्यान, मंगळवारी सकाळी आणखी एक धक्कादायक घटना घडली. ठाणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ समोरील जाहिरात फलकाला आग लागल्याने एकच खळबळ माजली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेतली आणि ही आग विझवण्यात त्यांना यश मिळालं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेल नाही. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.