दहावीतील विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करणाऱ्या शिक्षकांना मुंबई लोकल प्रवासाची मुभा, वर्षा गायकवाडांची घोषणा
आता दहावीतील विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करणाऱ्या शिक्षकांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे दिलीय.

मुंबई : मुंबई शहर आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या शिक्षकांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी शिक्षकांकडून करण्यात येत होती. या मागणीसाठी सोमवारी शिक्षकांनी लोकल स्थानकावर जोरदार आंदोलनही केलं होतं. त्यानंतर आता दहावीतील विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करणाऱ्या शिक्षकांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे दिलीय. या निर्णयाबाबत वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभारही मानले आहेत. (Teachers who evaluate 10th graders are allowed to Mumbai local travel)
दहावीच्या मूल्यमापनाच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला केली होती. त्यावर आज निर्णय घेण्यात आल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिलीय. गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीच्या मूल्यमापन प्रक्रियेत सहभागी असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवास करता येणार आहे.
A big thank you to @CMOMaharashtra & State Disaster Management Authority, Maharashtra for granting my request to allow teachers & non-teaching staff involved in assessment work for Std Xth to travel on local trains for official purposes.#teacher #sscresults #localtrain
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) June 17, 2021
शालेय शिक्षणमंत्र्यांचा राज्यातील शाळांना आदेश
दरम्यान, कोरोनाच्या संकटात काही पालक आपल्या पाल्याचं शालेय शुल्क भरु शकलेले नाहीत. तसंच त्यांना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यावा लागत आहे. अशा विद्यार्थ्यांना शाळेतून शाळा सोडल्याचा दाखला अर्थात TC/LC काही शाळांकडून नाकारली जात आहे. त्यावरही वर्षा गायकवाड यांनी कठोर भूमिका मांडली आहे. ‘प्रत्येक मुलाला शिकण्याचा तसेच एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याचा अधिकार आहे. सध्याच्या असामान्य परिस्थितीत आर्थिक कारणांमुळे शालेय शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला (T.C/L.C) काही शाळा नाकारत असल्याचे कळते. विद्यार्थ्यांना TC/LC अभावी प्रवेश नाकारू नये. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, याची मुख्याध्यापकांनी दक्षता घ्यावी. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यास संबंधित मुख्याध्यापक / शाळाप्रमुख यांच्याविरुद्ध नियमातील व कायद्यातील तरतुदीनुसार योग्य ती कारवाई केली जाईल’, असा इशारा वर्षा गायकवाड यांनी दिलाय.
विद्यार्थ्यांना TC/LC अभावी प्रवेश नाकारू नये. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, याची मुख्याध्यापकांनी दक्षता घ्यावी. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यास संबंधित मुख्याध्यापक / शाळाप्रमुख यांच्याविरुद्ध नियमातील व कायद्यातील तरतुदीनुसार योग्य ती कारवाई केली जाईल.
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) June 17, 2021
पूर्वीच्या शाळेकडून LC/TC प्राप्त न झाल्यास प्रवेशित होणाऱ्या शाळेत विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गात प्रवेश द्यावा. यासाठी विद्यार्थ्यांचे जन्माचे प्रमाणपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरावा, असा आदेशही गायकवाड यांनी राज्यातील शाळांना दिला आहे.
संबंधित बातम्या :
औरंगाबाद शहरात सक्तीचे लसीकरण ? 21 जूनपासून 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे नियोजन
नागपुरात लहान मुंलांमध्ये अँटिबॉडीज आढळल्या, तज्ज्ञ म्हणतात धोका कायम, पालकांनी मुलांची काळजी घ्यावी
Teachers who evaluate 10th graders are allowed to Mumbai local travel