Mumbai Local Train Pass : लोकल पाससाठी पहिल्याच सत्रात 18 हजार नागरिकांची तपासणी, तर 17 हजारापेक्षा अधिक पास वितरित

आज सकाळपासून मुंबई महानगरपालि‍का क्षेत्रातील 53 रेल्‍वे स्‍थानकांवर 358 मदत कक्ष सुरु करण्‍यात आले आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर तसंचअतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी रेल्वे स्थानकांवर भेटी देऊन या प्रक्रियेची पाहणी केली. दुपारी 3 वाजेपर्यंत 18 हजाराहून अधिक नागरिकांची पडताळणी पूर्ण झाली.

Mumbai Local Train Pass : लोकल पाससाठी पहिल्याच सत्रात 18 हजार नागरिकांची तपासणी, तर 17 हजारापेक्षा अधिक पास वितरित
किशोरी पेडणेकरांकडून रेल्वे पास वितरण प्रक्रियेची पाहणी
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 7:33 PM

मुंबई : मुंबईतील सर्वसामान्‍य नागरिकांना येत्‍या स्‍वातंत्र्य दिनी म्‍हणजे 15 ऑगस्‍ट 2021 पासून उपनगरीय रेल्‍वे प्रवास अर्थात लोकल प्रवास करण्‍यास मुभा देण्‍याची घोषणा मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यानुसार आज सकाळपासून मुंबई महानगरपालि‍का क्षेत्रातील 53 रेल्‍वे स्‍थानकांवर 358 मदत कक्ष सुरु करण्‍यात आले आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर तसंचअतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी रेल्वे स्थानकांवर भेटी देऊन या प्रक्रियेची पाहणी केली. दुपारी 3 वाजेपर्यंत 18 हजाराहून अधिक नागरिकांची पडताळणी पूर्ण झाली. तर याच अनुषंगाने आज दुपारपर्यंतच्या पहिल्या सत्रात रेल्वे प्रशासनाद्वारे 17 हजार 758 मासिक पास वितरित केले आहेत. (Passes distributed to public for Mumbai local travel)

प्रभादेवी, दादर स्टेशनवर महापौरांकडून पाहणी

ज्या नागरि‍कांना कोविड लशीचे दोन डोस घेतल्‍यानंतर 14 दिवस पूर्ण झाले आहेत, त्‍यांचे लसीकरण अंतिम प्रमाणपत्र व छायाचित्र असणारे ओळखपत्र पडताळण्यात येत आहे. या ऑफलाईन पडताळणीमध्‍ये पात्र ठरलेल्‍यांना रेल्वेकडून मासिक पास दिला जात आहे. त्याआधारे उपनगरीय रेल्‍वे प्रवासाची मुभा देण्‍यात आली आहे. महापौर श्रीमती किशोरी कि‍शोर पेडणेकर यांनी पश्‍च‍िम रेल्‍वे मार्गावरील प्रभादेवी रेल्‍वे स्‍थानक आणि दादर रेल्‍वे स्‍थानकावर या प्रक्रियेची पाहणी केली. तसंच दादर (पश्‍चि‍म) रेल्‍वे स्‍थानकावरील मदत कक्षास महापौरांनी भेट दिली. महापौरांनी यावेळी कोविड लसीकरण प्रमाणपत्र आणि ओळखपत्र घेऊन आलेल्‍या सर्वसामान्‍य रेल्‍वे प्रवाशांशी संवाद साधला. ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया पार पाडताना येणारे रेल्वे प्रवासी आणि मदत कक्षावरील कार्यरत कर्मचारी यांनी देखील कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही, या दृष्टीने काळजी घेण्याचा सल्लाही महापौरांनी दिला.

पहिल्या सत्रात 17 हजार 758 मासिक पास वितरित

दरम्यान, मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण 53 रेल्वे स्थानकांवर मिळून 358 मदत कक्ष कार्यान्वित झाले आहेत. आज दुपारी 3 वाजेपर्यंतच्या पहिल्या सत्रात या सर्व 53 स्थानकांवर मिळून एकूण 18 हजार 324 रेल्वे प्रवाशांची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. या पडताळणीनंतर नागरिकांना मासिक पास देण्याच्या कार्यवाहीची सुरुवात देखील रेल्वे प्रशासनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार आज दुपारपर्यंत पहिल्या सत्रात 17 हजार 758 मासिक पास देण्यात आले आहेत. यामध्ये मध्य रेल्वेद्वारे 12 हजार 771, तर पश्चिम रेल्वेद्वारे देण्यात आलेल्या 4 हजार 987 मासिक पासांचा समावेश आहे.

दररोज सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत सलग 2 सत्रामध्‍ये मदत कक्ष कार्यरत असणार आहेत. यामुळे विनाकारण गर्दी न करता नागरिकांनी आपल्‍या घराजवळील रेल्‍वे स्‍थानकांवर पडताळणीकरिता जावे, असे आवाहन पुनःश्च महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Unlock : मुंबईसह महाराष्ट्रात हॉटेल्स रात्री 10 पर्यंत खुली ठेवण्यास मुभा, वाचा नव्या नियमावलीनुसार काय सुरु, काय बंद?

लोकल पाससाठी मुंबईकरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी, प्रशासन सज्ज, पाससाठी कोणती कागदपत्रं गरजेची?, वाचा

Passes distributed to public for Mumbai local travel

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.