राजीनाम्यावर शरद पवार नक्की विचार करतील, पण… छगन भुजबळ यांनी दिले मोठे संकेत

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार किंवा शरद पवार हे राजीनाम्याचा निर्णय मागे घेतील अशी चर्चा सुरू असताना छगन भुजबळ यांनी मोठे संकेत दिले आहे.

राजीनाम्यावर शरद पवार नक्की विचार करतील, पण...  छगन भुजबळ यांनी दिले मोठे संकेत
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: May 03, 2023 | 11:36 AM

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदाच्या निवृत्तीची घोषणा केल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावर राहावे अशी मागणी केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार आपल्या मतावर ठाम असल्याने नवा अध्यक्ष कोण होणार यावर चर्चा सुरू झाली आहे. त्यामध्ये सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील राजकारण अजित पवार आणि सुप्रिया सुळे केंद्रातील राजकारण बघणार असल्याची चर्चा सुरू असतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोठं विधान केले आहे. त्यामध्ये छगन भुजबळ यांनी भविष्यातील राजकारणाचे मोठे संकेत दिले आहे.

छगन भुजबळ म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना, नेत्यांना आणि शरद पवार यांच्यावर प्रेम करणारे सर्व जनतेला सुद्धा मोठा धक्का बसला आहे. आमच्यासारखे ओबीसी, मागासवर्गीयाचे आणि आदिवासी बांधवांच्या प्रश्नांची जाण असल्याने आम्ही त्यांचा हात धरून पुढे आलो.

शिवसेनेनंतर शरद पवार यांचा आम्ही हात धरला. त्यानंतर आम्हाला अनेक फायदे झाले. आरक्षण मिळाले, मराठवाडा विद्यापीठाला नाव मिळाले. फुले-शाहू-आंबेडकर यांचा आदर्श घेऊन पुढे जाणारा एकमेव नेता म्हणजे शरद पवार आहे. शरद पवार यांना आम्ही सगळे जण पुन्हा पुन्हा समजविण्याचा प्रयत्न करत आहोत.

हे सुद्धा वाचा

पण शरद पवार ऐकण्याच्या परिस्थितीत नाही. शरद पवार अध्यक्ष पदावर असले तरी किंवा नसले तरी ते जे अध्यक्ष देतील त्यानुसार पक्ष चालणार आहे. तसा आदेश त्याप्रमाणे दिला आहे असंही शरद पवार यांनी दिला आहे. मात्र, कमिटीने त्यावर निर्णय घ्यायचा असला तरी असली कुठलीही कमिटीने बैठक घेतली नाही.

जर काही निर्णय झाला नाही तर कमिटीला निर्णय घ्यावा लागेल. महाराष्ट्रातील संपूर्ण कारभार अजित पवार बघत आहे. आणि केंद्रातील सुप्रिया सुळे देशातील कारभार पाहत आहे. सुप्रिया यांची शैली, त्यांना संसदरत्न दिला आहे. राजकारणाची जाण पाहता योग्य निर्णय होईल असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.

त्यामुळे एकूणच आगामी काळात सुप्रिया सुळे अध्यक्षा होण्याची शक्यता अधिक असून जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तसे संकेत दिले आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे अध्यक्ष होतात की आणखी काही वेगळ्या घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.