व्यापक कलादृष्टी असलेला संवेदनशील प्रतिभावंत गमावला; नितीन देसाई यांच्या निधनाने राजकीय वर्तुळ गहिवरलं
Nitin Desai Death : नितीन देसाई यांच्या निधनाने राजकीय वर्तुळही गहिवरलं; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त
कर्जत | 02 ऑगस्ट 2023 : कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. कर्जतमध्ये असलेल्या एन डी स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केली आहे. प्रतिभावंत कलावंत गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. राजकीय वर्तुळातूनही नितीन देसाई यांच्या जाण्यावर शोक व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ट्विट करत शिंदे यांनी देसाईंना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
एकनाथ शिंदे यांचं ट्विट
ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचे आज निधन झाले. ही अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना आहे. मराठी, हिंदी कलासृष्टीत आपल्या कलेच्या माध्यमातून नवे विश्व निर्माण करणाऱ्या देसाई यांचे जाणे चटका लावणारे आहे.
टेंभी नाक्याची देवी आणि नितीन देसाई यांचे वेगळे ऋणानुबंध होते. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा त्यांनी कायम जपली होती. येथील नवरात्रोत्सव त्यांच्यामुळे कायम अविस्मरणीय झाला. त्यांच्या हातून घडलेली कलाकृती पाहण्याची कायम उत्सुकता असे. इतका उमदा माणूस आणि मित्र आज आपण गमावल्याचे वृत्त वेदनादायी आहे. वैयक्तिक माझ्यासाठी आणि कलाक्षेत्रासाठी आजचा दिवस अत्यंत दु:खद आहे. त्यांच्याप्रती श्रद्धांजली व्यक्त करतो.
ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचे आज निधन झाले. ही अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना आहे. मराठी, हिंदी कलासृष्टीत आपल्या कलेच्या माध्यमातून नवे विश्व निर्माण करणाऱ्या देसाई यांचे जाणे चटका लावणारे आहे. टेंभी नाक्याची देवी आणि नितीन देसाई यांचे वेगळे ऋणानुबंध… pic.twitter.com/qla4wBgEy8
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 2, 2023
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नितीन देसाई यांच्याबाबतच्या आठवणी जागवल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दुःख व्यक्त
प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या अकस्मात मृत्यूचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सिनेमा आणि कला क्षेत्रात अतिशय बहुमूल्य योगदान त्यांनी दिले आणि त्यासाठी अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला. मुख्यमंत्री असताना मरीन लाईन्स येथे आयोजित ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ कार्यक्रम व्यवस्थेचे यशस्वी संयोजन त्यांनी केले होते. हा हरहुन्नरी कलावंत असा अचानक आपल्याला सोडून जाईल, अशी कल्पनाही केली नव्हती. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची ताकद प्राप्त होवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या अकस्मात मृत्यूचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सिनेमा आणि कला क्षेत्रात अतिशय बहुमूल्य योगदान त्यांनी दिले आणि त्यासाठी अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला. मुख्यमंत्री असताना मरीन लाईन्स येथे आयोजित…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 2, 2023
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शरद पवारांचं ट्विट
राज्य चित्रपट पुरस्कार प्राप्त, प्रख्यात कलादिग्दर्शक, निर्माते नितीन चंद्रकांत देसाई यांचे निधन अत्यंत दुःखदायक व वेदनादायक आहे. प्रचंड आत्मविश्वास, नाविन्याची ओढ आणि मेहनत करण्याची तयारी असलेला एक उमदा मराठी उद्योजक आपण गमावला. मराठी सिनेसृष्टी बरोबर सर्वच क्षेत्राला बसलेला हा मोठा धक्का आहे.
राज्य चित्रपट पुरस्कार प्राप्त, प्रख्यात कलादिग्दर्शक, निर्माते नितीन चंद्रकांत देसाई यांचे निधन अत्यंत दुःखदायक व वेदनादायक आहे. प्रचंड आत्मविश्वास, नाविन्याची ओढ आणि मेहनत करण्याची तयारी असलेला एक उमदा मराठी उद्योजक आपण गमावला. मराठी सिनेसृष्टी बरोबर सर्वच क्षेत्राला बसलेला हा… pic.twitter.com/6HXjTWw1jG
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 2, 2023
खासदार अमोल कोल्हे यांनीही नितीन देसाई यांच्यासोबतच्या आठवणी जागवल्या आहेत. त्यांनी ट्विट करत जुन्या आठवणी सांगितल्या आहेत.
अमोल कोल्हे यांचं ट्विट
प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीनजी देसाई यांच्या दुर्दैवी निधनाची बातमी माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे. या बातमीवर अजिबात विश्वास बसत नाहीये. कला क्षेत्रातील माझ्या आजवरच्या प्रवासात मला लाभलेले नितीन दादांचे मार्गदर्शन आणि त्यांची साथ माझ्यासाठी खूप मोलाची ठरली आहे. ज्या ‘राजा शिवछत्रपती’ मालिकेत मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली, त्या मालिकेचे निर्माते नितीन दादाच होते. त्यांच्या अचानक जाण्याने मनात पोरके झाल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! देसाई कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, तसेच नितीन दादांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच आई-जगदंबेचरणी प्रार्थना!
प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीनजी देसाई यांच्या दुर्दैवी निधनाची बातमी माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे. या बातमीवर अजिबात विश्वास बसत नाहीये. कला क्षेत्रातील माझ्या आजवरच्या प्रवासात मला लाभलेले नितीन दादांचे मार्गदर्शन आणि त्यांची साथ माझ्यासाठी खूप मोलाची ठरली आहे. ज्या ‘राजा… pic.twitter.com/tEeOkr103x
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) August 2, 2023