राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा, शरद पवार यांना ‘तो’ अधिकार नाहीच म्हणत आव्हाड स्पष्टच बोलले…
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा शरद पवार यांनी मागे घ्यावा अशी मागणी करत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कार्यकर्त्यांनी मोठा निर्णय घेत मागणी केली आहे.
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी घेतलेला राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मागणी करत आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहेत. राज्यातील बहुतांश ठिकाणी अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू करत शरद पवार यांनीच अध्यक्षपदी कायम राहावे अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना आपल्या निर्णयाच्या संदर्भात माघार घेण्यासाठी रेटा लावून धरला आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे.
याच दरम्यान शरद पवार हे राजीनामावर ठाम असल्याचाही बोलले जात आहे. त्यामुळे शरद पवार यांनी राजीनामा द्यावा यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून दबाव तंत्राचा वापर केला जात आहे.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अनेक पदाधिकाऱ्यांसह राजीनामा दिला आहे त्यामुळे एकूणच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून राजीनामा अस्र काढण्यात आले असून शरद पवार यांच्या राजीनामाच्या संदर्भात पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक होताना बघायला मिळत आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाचा राजीनामा देत म्हंटलंय, आपण लोक जी भूमिका घेतात त्या सोबत राहील पाहिजे असा आग्रह शरद पवार यांचा असतो. आमचा ही तोच आग्रह आहे. शरद पवार यांनी राजीनामा देऊ नये, जनमताचा आदर केला पाहिजे.
शरद पवार हे राजकारणातील भिष्मपितामह आहेत. अजित पवार यांचा सुर काय आहे माहीत नाही आमचा सुर स्पष्ट आहे. सुप्रिया सुळे राष्ट्रीय स्तरावर. अजित पवार राज्य स्तरावर या वर बोलताना जरतर ला अर्थ नसतो असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटलं आहे.
पवार साहेबांनी राजीनामा देऊ नये, आमचा प्रवास शरद पवार यांच्या सुरू होतो तेथेच थांबतो. मला नाही माहित कोण काय करतंय असे अजित पवार यांच्या भूमीकेवर मत मांडलं. पाऊल मागे घ्यावं ही अपेक्षा आहे. ठाणे शहरातील सर्व पदाधिकारी राजीनामे देत आहे.
समिती मध्ये सुध्दा मी माझं मत मांडणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारण केंद्रं बिंदू शरद पवार असणे ही महाराष्ट्राची गरज आहे . मी मानसशास्त्रज्ञ नाही पण आजारपणाच कारण चुकीचे आहे. पण शेवटी शरद पवार जे म्हणतील ते अंतिम असेल, पण आम्हाला विश्वासात न घेता त्यांना तडकाफडकी राजीनामा देण्याचा अधिकार नाही.
शेवटी पक्षाची जबाबदारी त्यांच्या नियंत्रणाची होती .ते बाजूला गेले की त्यामधील इंटरेस्ट कमी होत जातो. दादांचा काय रोल होता मला नाही माहित माझा रोल स्पष्ट आहे. शरद पवार प्रत्येक वेळी नव्या लोकांना संधी देतात आम्ही राजीनामा दिला द्या नव्या लोकांना संधी असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे.