राजीनाम्याचा निर्णय मागे घेत असतांना शरद पवार यांचा मोठा निर्णय, उत्तराधिकारी असणं गरजेचे म्हणत…
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार यांनीच राहावे अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर अध्यक्ष निवड समितीने ठराव केला होता. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी शरद पवार कायम राहणार असल्याची घोषणा त्यांनी स्वतःच पत्रकार परिषदेत केली आहे. याच वेळी बोलत असतांना शरद पवार यांनी महत्वाचे संकेत दिले आहे. यामध्ये उत्तराधिकारी असणं हे माझं स्पष्ट मत असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. शरद पवार यांनी यावेळी विविध पक्षाच्या नेत्यांनी आणि पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या आवाहनाचा आदर करून मी राजीनाम्याचा निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केला आहे. शरद पवार यांनी यावेळी मी नव्या जबाबदाऱ्या देणार असल्याचेही जाहीर केले आहे. याशिवाय नव्या जोमाने काम करणार असल्याचे जाहीर करत शरद पवार यांनी जाहीर केली आहे.
पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या जबाबदारी बाबत फेरविचार करावा अशी मागणी केली होती. त्यामध्ये जेष्ठ नेत्यांनी याबाबत ठराव केला होता. त्याचा मान राखून राजीनाम्याचा निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर करत असतांना उत्तराधिकारी असणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
यामध्ये पक्षात नवीन कार्याध्यक्ष पद निर्माण करण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा देखील झाली होती. याशिवाय अजित पवार यांच्याही नावाची चर्चा होऊ लागली होती. अशातच नवीन नेतृत्व घडविण्यावर भर असेल असं शरद पवार यांनी म्हंटलं होतं.
राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवार यांनी अध्यक्ष निवड समितीची घोषणा केली होती. त्यानंतर शरद पवार हेच अध्यक्ष असावेत अशी भूमिका अनेक नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी दोन दिवसांचा वेळ मागितला होता.
अध्यक्ष निवड समितीची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी दिलेला राजीनामा नामंजूर करण्यात आला होता. त्यामध्ये शरद पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष असावे अशी मागणी करत ठराव करण्यात आला होता. त्यानंतर अध्यक्ष निवड समितीने शरद पवार यांची भेट घेतली होती.
अध्यक्ष निवड समितीने शरद पवार यांना बैठकीत केलेला ठराव आणि झालेल्या चर्चेची माहिती दिली होती. यामध्ये प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, नरहरी झिरवळ, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, फौजिया खान, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
त्यानंतर शरद पवार हे अध्यक्ष पद पुन्हा स्वीकारतील अशी शक्यता वर्तवली जात होती. अध्यक्ष समितीने ठराव केल्यानंतरच पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी जल्लोष केला होता. ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला होता. त्यानंतर शरद पवार हे अंतिम निर्णय काय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.