चंद्रकांत पाटील गोमूत्रधारी, उद्धव ठाकरे कडाडले; बाबरीच्या विषयावरून उद्धव ठाकरे यांनी इतिहासच सांगितला
बाबरीच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार हल्लाबोल केला आहे. याशिवाय एकनाथ शिंदे यांच्यावरही जहरी टीका केली आहे.
मुंबई : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरी पडायला शिवसौनिक नव्हते असा खळबळजनक दावा केल्यानंतर शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. गोमूत्रधारी चंद्रकांत पाटील म्हणत उद्धव ठाकरे यांनी चांगलाच घणाघात केला आहे. यावेळी भाजपसह एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. मातोश्री येथे पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी जहरी टीका केली आहे. यावेळी जुना इतिहास सांगत बाबरीच्या बाबत काय घडलं होतं हे सांगितलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, गोमूत्रधारी चंद्रकांत पाटील हे आपल्या बाबरीच्या खंदकातून बाहेर पडले. असे बाबरीच्या खंदकातून उंदीर बाहेर पडायला लागले आहे. पण त्यावेळी बाबरी पाडली त्यावेळी सगळे उंदीरच बिळात लपलेले होते. उंदीरच म्हणत भाजपवर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.
कोणताही उंदीर बिळातून बाहेर आलेला नव्हता. त्यावेळी आत्ताचे पंतप्रधान बांग्लादेशच्या लढ्यात किंवा हिमालयात असतील पण त्यांचे नाव मला कुठं आढळून आलेले नव्हते असं म्हणत तेथ नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे यांनी यावेळेला भाजपाचा शब्दप्रयोग हा भरकटलेला पक्ष म्हणत तेव्हाचे सुंदरसिंह भंडारी यांनी अंगलट येऊ नये याकरिता जाहीर केले होते. हे काम भारतीय जनता पक्षाने केलेल नाही. हे जर कुणी केले असेल तर शिवसेनेने केले असेल असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
आणि त्याच वेळेला बाबरी पडल्याची बातमी आली. मी घाबरलो आणि वर गेलो. बाळासाहेबांना सांगितलं की बाबरी पडली आणि त्यांनी सांगितलं टीव्ही लाव. त्याच वेळी फोन वाजला, संजय राऊत यांचा होता. आणि बाळासाहेब म्हणाले बाबरी जर शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे असे बाळासाहेब म्हणाले होते.
त्यावेळी बाळासाहेब चिडले होते. आणि म्हणाले हे कसलं नपूसंक नेतृत्व. आपल्या कार्यकर्त्यांना सांगायचे आणि घटना घडल्यानंतर पळून जायचे त्यामुळे हिंदु नेतृत्व उभे कसे राहील असे म्हंटलं होतं. आणि आत्ताचे लोक सांगायचे की माझ्या बाजूने गोळी गेली होती.
शाळेच्या सहलीला जायचे आणि नंतर सांगायचे की इकडून गोळी गेली आणि तिकडून गोळी गेली. मोगलांचा इतिहास पुसता पुसता हिंदूंचा सुद्धा इतिहास पुसायला निघाले आहेत का? असा सवालही यावेळेला उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
ज्यांचेकडे शौर्य नसतं ते निर्माण करतात. भाजपकडे कधीही शौर्य नव्हतं. मुंबई सुद्धा शिवसैनिकांनी वाचवली होती. आमच्याकडे त्यावेळी सत्ता नव्हती. पोलिस शिवसैनिकांना मारत होते. त्यावेळी काही दर्गाह सुद्धा शिवसैनिकांनी वाचविले आहेत असेही उद्धव ठाकरे यांनी म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे.
चंद्राकांत पाटील यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे. एकनाथ शिंदे यांना मिंधे म्हणत सत्तेसाठी लाळघोटेपणा करत लाचार झालेले म्हणत यांनी राजीनामा घेतला पाहिजे आणि स्वतः राजीनामा द्यायला पाहिजे अशीही मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.