AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणी घर देता का घर ? मुंबईकराचं स्वप्नं कधी होणार पूर्ण ? घर महागणार, रेडीरेकनर दरांमध्ये वाढ

महाराष्ट्र सरकारने 2025-26 साठी रेडीरेकनर दरांमध्ये वाढ जाहीर केली आहे. मुंबईत 3.39%, ठाण्यात 7.72% आणि सोलापूरमध्ये 10.17% ची वाढ झाली आहे. राज्याची सरासरी वाढ 4.39% आहे. यामुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात घरांच्या किमती वाढतील आणि घर खरेदी करणाऱ्यांवर आर्थिक ताण येईल. नवे दर आजपासून लागू होतील.

कोणी घर देता का  घर ? मुंबईकराचं स्वप्नं कधी होणार पूर्ण ? घर महागणार,  रेडीरेकनर दरांमध्ये वाढ
घर महागणारImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 01, 2025 | 8:58 AM

मुंबई हे स्वप्नांचं शहर म्हणून ओळखलं जातं, आणि याच शहरात आपलं एक तरी घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. करोडो लोक मुंबईत पोटापाण्यासाठी येतात, राहतात, पण प्रत्येकालाच काही स्वत:च्या मालकीचं घर घेता येत नाही, तेवढी किंमत सर्वांनाच परवडणारी नसते. आणि आता मुंबईत घर घेण्याचं हे स्वप्न आणखीनच महागणार आहे. त्याचं कारण म्हणते रेडीरेकनर दरांमध्ये झालेली वाढ. राज्यातील रेडीरेकनर दरामध्ये सरकारडकडून वाढ करण्यात आली आहे. मुंबईत 3.39 टक्के, ठाण्यात 7.72 टक्के तर सोलापूरमध्ये सर्वाधिक, म्हणजे 10.17 टक्के वाढ करण्यात आली आहे.

आजपासूनच लागू होणार नवे दर

राज्यात सरासरी 4.39 टक्के रेडीरेकनर दरांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे संपूर्ण राज्यात घरांच्या किंमती वाढणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे नवे दर आज, मंगळवारपासून लागू होतील. त्यामुळे घरे महागणार आहेत. राज्याच्या नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक विभागाने 2025-26 कालावधीसाठी रेडीरेकनर दरांमध्ये वाढ जाहीर केली आहे. त्यानुसार मीरा-भाईंदरमध्ये 6.26 टक्के, कल्याण- डोंबिवलीत 5.84 टक्के, नवी मुंबईत 6.75 टक्के अशी वाढ जाहीर करण्यात आली आहे. या वाढीमुळे आता मुंबईसह संपूर्ण राज्यात घरांच्या किंमतीमध्ये वाढ होणार असून घर खरेदीची करणाऱ्या नागरिकांवर अधिक आर्थिक भार पडणार आहे.

कशी असेल वाढ ?

महापालिका क्षेत्र – 5.95. टक्के (मंबई वगळता) राज्याची सरासरी वाढ – 4.39 टक्के (मुंबई वगळता) मुंबई महापालिका क्षेत्र सरासरी वाढ – 3.39 टक्के संपूर्ण राज्याची एकूण वाढ -3.89 टक्के ग्रामीण क्षेत्र – 3.36 टक्के प्रभाव क्षेत्र – 3.29 टक्के नगरपरिषद/पंचायत क्षेत्र – 4.97क्के

2022-23 मध्ये रेडीरेकनर दरात वाढ करण्यात आली होती. राज्याच्या महसुलात बांधकाम क्षेत्रातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाचा मोठा वाटा आहे. यामुळे आता दोन वर्षांनी पुन्हा दरवाढ करण्यात आली आहे. याआधीच मुंबईसह महानगरात घरांच्या किंमती गगनाला भिडल्या असताना नव्या रेडीरेकनर दरांमुळे त्यात आणखी भर पडणार आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा.
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस.
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन.
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी.
हल्ल्यातील महाराष्ट्रातील पीडित कुटुंबाला 50 लाख, CM यांचा मोठा निर्णय
हल्ल्यातील महाराष्ट्रातील पीडित कुटुंबाला 50 लाख, CM यांचा मोठा निर्णय.
तर 2 मिनिटांत.. LOC वर हालचाली वाढल्या? सैन्यातील विमानांना मोठा आदेश
तर 2 मिनिटांत.. LOC वर हालचाली वाढल्या? सैन्यातील विमानांना मोठा आदेश.
अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण.. ; पाकिस्तानबद्दल जी. डी. बक्षी या
अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण.. ; पाकिस्तानबद्दल जी. डी. बक्षी या.