Maharashtra Rain Live | खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

| Updated on: Jul 23, 2021 | 12:38 AM

मुंबईसोबतच राज्यातील जालना, बीड, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची हवामान विभागाने वर्तवली आहे.

Maharashtra Rain Live | खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
प्रातिनिधिक फोटो

अनेक दिवस दडी मारल्यानंतर पावसाने राज्यात जोरदार कमबॅक केले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. मुंबईसह उपनगरात सकाळपासून वेगवान वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे मिठी नदी सध्या तुडुंब भरून वाहत आहे. मुंबईसोबतच राज्यातील जालना, बीड, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची हवामान विभागाने वर्तवली आहे. मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Jul 2021 10:48 PM (IST)

    खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

    पुणे : खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला

    धरणातून मुळा नदीपात्रात 25 हजार 036 क्यूसेस पाण्याचा विसर्ग

    नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

  • 22 Jul 2021 10:47 PM (IST)

    पुण्यातील भिमाशंकर मुख्य मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा, बाजुच्या डोंगरातून पुराचा लोट

    पुणे -बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर मुख्य मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा

    -24 तासांपासून भिमाशंकर परिसरात जोरदार पाऊस

    -मंदिराच्या बाजुच्या डोंगरातून पुराचा लोट, मंदिरात पाणी

    -मंदिराच्या नुतनीकरणाचे काम सुरु असल्याने पुराच्या पाण्याचा प्रवाह अचानक वळून पाणी मंदिरात

  • 22 Jul 2021 10:10 PM (IST)

    महाडमध्ये मोठी दुर्घटना, 30 घरांवर दरड कोसळली, 72 जण बेपत्ता

    रायगड :

    महाडमध्ये दरड कोसळून 30 घरे गाडली गेल्याची भीती

    महाड तालुक्यातील बीरवाडी पासुन 14 किमी अतंरावर घडली घटना.

    72 नागरिक बेपत्ता असण्याची भिती व्यक्त होत आहे.

    परंतु महाड शहरासह तालुक्यात विदारक परिस्थीती असुन सपंर्क तुटला आहे.

  • 22 Jul 2021 09:06 PM (IST)

    चिपळूणच्या कोविड सेंटरच्या तळ मजल्यावर 10 फुटापेक्षा जास्त पाणी, 30 ते 40 जण अडकले

    चिपळूण – चिपळूण नगरपालिका समोरील कोविड सेंटरमध्ये 30 ते 40 जण अडकले आहेत

    कोविड सेंटरच्या तळ मजल्यावर 10 फुटा पेक्षा जास्त पाणी

  • 22 Jul 2021 08:54 PM (IST)

    कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे सहा तासांपासून वीर स्थानकात थाबंली

    रायगड :

    कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे सहा तासांपासून वीर स्थानकात थाबंली आहे.

    चंदीगड ते कोचीवलीला जाणारी रेल्वे महाड जवळील वीर स्थानकात थाबंवून ठेवण्यात आली आहे.

    अतिव्रुष्टीमुळे अनेक ठिकाणी ट्रँकवर पाणी साचल्याने कोकण रेल्वे ठप्प

    कोचिवलीला जाणारी गाडी वीर स्थानकात अनिश्चित काळासाठी थाबंवून ठेवण्यात आली आहे.

  • 22 Jul 2021 08:27 PM (IST)

    अलमट्टी धरणातून 1 लाख 30 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जाणार

    महाराष्ट्रातील वाढता पाऊस लक्षात घेऊन अलमट्टी धरणातून आज गुरुवारी रात्री सात वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग 95 हजार क्युसेक्स वरून 1 लाख 30 हजार क्युसेक्स इतका वाढवण्यात आला आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे.

  • 22 Jul 2021 08:23 PM (IST)

    पंचगंगेची पाणी पातळी धोक्याच्या दिशेने

    पंचगंगेची पाणी पातळी धोक्याच्या दिशेने

    पाणी पातळीत वेगानं वाढ होतेय

    राजाराम बंधारा पाणी पातळी ४१ फुट ३ इंच इतकी आहे.

    (पंचगंगा नदी इशारा पातळी – ३९ फूट व धोका पातळी – ४३ फूट आहे.)

    एकूण पाण्याखालील बंधारे -:११०

  • 22 Jul 2021 08:03 PM (IST)

    कृष्णा नदीची पातळी 27 फुटावर, प्रशासनाकडून नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आवाहन

    सांगली फ्लॅश –

    कृष्णेची पातळी 27 फुटावर,

    प्रशासन पूर पट्ट्यात दाखल,

    नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आवाहन

  • 22 Jul 2021 08:02 PM (IST)

    कोल्हापूरचा वैभव असलेला ऐतिहासिक रंकाळा तलाव ओव्हरफ्लो

    कोल्हापूर :

    कोल्हापूरचा वैभव असलेला ऐतिहासिक रंकाळा तलाव ओव्हरफ्लो

    सलग पडत असलेल्या पावसामुळे तलाव भरला

    2005 नंतर पहिल्यांदाच रंकाळा तलाव ओव्हरफ्लो

    भरलेला रंकाळा तलाव पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची गर्दी

  • 22 Jul 2021 08:00 PM (IST)

    चिपळूण शहरातील पूर स्थिती जैसे थे

    चिपळूण – चिपळूण शहरातील पूर स्थिती जैसे थे

    गेल्या 16 तासापासून चिपळूण शहरात पाणी

    इतिहासात प्रथम एवढा वेळ शहरात राहिले पाणी

    या आधी 2005 रोजी अशी स्थिती निर्माण झाली होती

    रात्री भरतीची वेळ असल्याने पूर ओसरण्याची शक्यता कमी

    तर संपूर्ण शहर अंधारात

  • 22 Jul 2021 07:49 PM (IST)

    चिपळूण, खेड पूर परिस्थिती अपडेट

    कोळकेवाडी धरणक्षेत्र व वाशिष्ठी नदी पाणलोट क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्राबाहेर गेल्या २४ तासात २०० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाल्याने कोळकेवाडी धरणाच्या चार दरवाजांमधून १ हजार क्यूसेक्स इतका पाण्याचा विसर्ग चालू आहेत.

    ▪️ बचाव कार्यासाठी सद्यस्थितीत खाजगी-६, कस्टम-१, पोलीस-१, नगर परिषद-०२, तहसिल कार्यालय-०५ बोटी मदत करीत आहेत.

    एनडीआरएफचे ५ बोटींसह २३ जणांचे पथक चिपळूण येथे पोहोचत आहे.

    ▪️ एनडीआरएफचे ०४ बोटींसह २३ जणांचे पथक पुण्यावरुन खेड तालुक्याकडे रवाना झाले आहे.

    सदर पथक एक तासात खेड येथे पोहोचेल. रस्ता अनुकूल नसल्याने त्यांना उशिर होत आहे.

    ▪️ रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सचे १२ जणांचे पथक रस्सी, लाईफ जॅकेटसह बचाव कार्यासाठी चिपळूण येथे हजर आहे.

    ▪️ राजू काकडे हेल्प फाऊंडेशनचे १० जणांचे पथक खेड व चिपळूण येथे पोहोचत आहे.

    ▪️ जिद्दी माऊंटेनिअर्सचे पथक बचावकार्यासाठी पोहोचत आहे.

    ▪️ आत्तापर्यंत पुरामध्ये अडकलेल्या सुमारे १०० नागरिकांची सुटका करण्यात आली असून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांसाठी चिपळूण व सावर्डे येथील शैक्षणिक संस्थांच्या इमारतीमध्ये निवारा व्यवस्था करण्यात आली आहे.

    ▪️ निवारा व्यवस्थेच्या ठिकाणी शिवभोजन थाळीद्वारे अन्नपुरवठा, पिण्याचे पाणी तसेच ५०० बेडसीट्सचा पुरवठा करण्यात आला आहे.

    ▪️ चिपळूणच्या आजूबाजूची ०७ गावे पुराच्या पाण्याखाली असून सदर गावातील नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्याचे काम बचाव पथकाद्वारे सुरु आहे.

    ▪️ सद्यस्थितीमध्ये चिपळूण व खेड तालुक्यात कोणतीही मनुष्यहानी नाही.

    ▪️ परशुराम घाट तसेच मुंबई-गोवा महामार्गावर पुराचे पाणी असल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

    ▪️ पुढील भरती साधारण रात्री १0 वाजता सुरु होणार असल्याने सद्यस्थितीत पुराखाली नसलेल्या भागांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

    ट्रक द्वारे रत्नागिरीहून २, दापोलीहून २, गुहागरवरुन 10 बोटी चिपळूणकडे बचावकार्यासाठी रवाना झाल्या आहेत.

  • 22 Jul 2021 07:42 PM (IST)

    साताऱ्यात क्षेत्र महाबळेश्वर नागरी वस्तीत पाणी शिरले, दहा वर्षात पहिल्यांदाच इतक्या पावसाची नोंद

    सातारा :

    क्षेत्र महाबळेश्वर नागरी वस्तीत पाणी शिरले

    महाबळेश्वर येथील क्षेत्र महाबळेश्वर परिसरामध्ये संपूर्ण रस्ते जलमय झाले आहेत

    महाबळेश्वर तालुक्यात सगळ्यात जास्त पाऊस हा क्षेत्र महाबळेश्वर परिसरात पडत असतो. या परिसरात गेल्या चोवीस तासात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे

    दहा वर्षात आज पर्यंत कधीच असा पाऊस पडला नव्हता तो या 24 तासात नोंद झाला

    पावसाने परिसरातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे

  • 22 Jul 2021 07:34 PM (IST)

    महाड शहराचा संपर्क तुटला, मुंबई-गोवा महामार्ग बंद

    महाड शहराचा संपर्क तुटला आहे. संपूर्ण शहराला पुराने वेढलं आहे. पुरामुळे मुंबई-गोवा महामार्गही बंद झाला आहे. महाड शहरात वीज, मोबाईल नेटवर्कही बंद झालं आहे.

  • 22 Jul 2021 07:27 PM (IST)

    चिपळून बस स्टँड परिसरात गरोदर महिला अडकली, मदतीसाठी हाक

    चिपळून बस स्टँड परिसरात गरोदर महिला अडकली, गरोदर महिलेकडून मदतीची हाक, दुसरीकडे सीमा शुल्क विभागाची टीम घटनास्थळी दाखल

  • 22 Jul 2021 07:08 PM (IST)

    अतिवृष्टीमुळे अतिशय गंभीर परिस्थिती, राज्य सरकारने नागरिकांना बाहेर काढावं : नारायण राणे

    अतिवृष्टीमुळे अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, जवळपास आतापर्यंत 350 मिमी पाऊस पडला आहे. यावर एक उपाय आहे. नागिरकांना हेलिकॉप्टर आणि बोटीने बाहेर काढणं, त्यांना अन्न पुरवठा करणं, योग्य ठिकाणी नेण्याची व्यवस्था सरकारने केली पाहिजे. मी केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्याशी बोललो आहे. त्यांनी मला त्वरित व्यवस्था करण्याचं आश्वासन दिलंय. हेलिकॉप्टर, बोटी, सैनिक आणि इतर व्यवस्था पुरवण्याचं सांगितलंय. मी वेळ पडली तर अमित शाह यांच्याशी देखील बोलेल. केंद्र सरकार नागरिकांच्या बचावसाठी टीम पाठवणार, केंद्र सरकार मदत करणार, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले.

  • 22 Jul 2021 07:04 PM (IST)

    शेकडो नागरीक पुरात अडकले, चिपळूनमध्ये भयावह परिस्थिती

    चिपळूनमध्ये भयावह परिस्थिती, प्रशासनाकडून अद्यापही मदत नाही, गावांना पुराचा वेढा, शेकडो नागरीक पुरात अडकले

  • 22 Jul 2021 06:34 PM (IST)

    चिपळूणच्या खेर्डी परिसरात नागरीक हतबल, छतावर माणसं अडकली

    चिपळूणच्या खेर्डी परिसरात पाणी साचलं, अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे सुरक्षेसाठी लोकांना घराच्या छतावर जावं लागलं, या दरम्यान एका कंपनीत एक व्यक्ती अडकला आहे, तो कंपनीच्या छतावर बसला आहे, संबंधित ठिकाणी प्रशासन पोहोचलेलं नाही, संबंधित व्यक्ती मदतीची हाक देताना कॅमेऱ्यात दिसत आहे, तसेच ती व्यक्ती जेवणासाठी अन्न मागत असल्याचं कॅमेऱ्यात टिपलं गेलं आहे. एमआयडीसीत पाच कर्मचारी अडकल्याची माहिती समोर येत आहे. तिथे काही कर्मचारी भुकेने व्याकूळ झाले आहेत.

  • 22 Jul 2021 06:23 PM (IST)

    उजनी धरण प्लसमध्ये, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

    इंदापूर :

    उजनी धरण प्लसमध्ये, सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यासह मराठवाड्यास वरदायिनी असलेले उजनी धरण आज सहा वाजता मायनसमधून प्लसमध्ये, उजनीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी, पुणे जिल्ह्यात व भीमा नदी खोऱ्यात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ

  • 22 Jul 2021 06:21 PM (IST)

    मुसळधार पावसामुळे चंद्रपूर-हैदराबाद वाहतूक बंद

    चंद्रपूर : जिल्ह्यात पडतोय मुसळधार पाऊस, मुसळधार पावसाने मार्ग जलमय झाल्याने चंद्रपूर- हैदराबाद वाहतूक बंद, राजुरा तालुक्यातील राज्य सीमेवरच्या लक्कडकोट येथे नाल्याचे पाणी आले मार्गावर, गेल्या तासाभरापासून वाहतूक ठप्प झाल्याने मालवाहू वाहनांच्या लागल्या रांगा, या भागात गेल्या दहा तासापासून मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना आलाय पूर, या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता

  • 22 Jul 2021 06:20 PM (IST)

    लोणावळ्यात दहा तासांत 163 मिलिमीटर पावसाची नोंद

    लोणावळा, पुणे

    -लोणावळ्यात दहा तासांत 163 मिलिमीटर पावसाची नोंद

    -तर गेल्या 34 तासांत 553 मिमी पाऊस कोसळला आहे

    -यामुळे लोणावळ्यातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीचा प्रवाह वाढला असून पात्र सोडून ती वाहू लागली आहे.परिणामी सखल भागात पाणी शिरले आहे.काही गावांचा संपर्क देखील तुटला आहे.

  • 22 Jul 2021 05:57 PM (IST)

    उद्या कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडणार

    कराड :

    उद्या कोयनेचे सहा दरवाजे उघडणार

    23 जुलै 2021 रोजी सकाळी 10 वाजता कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 10000 क्युसेक्स पाणी विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.

    पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे कोयना धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली

    कोयना धरण पाणीसाठा 73.18 TMC झाला आहे.

    नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

  • 22 Jul 2021 05:55 PM (IST)

    पुराच्या पाण्यात बाप आणि मुलगी वाहून गेले, कर्जत तालुक्यातील दामत येथील घटना

    रायगड :

    पुराच्या पाण्यात बाप आणि मुलगी वाहून गेले

    कर्जत तालुक्यातील दामत येथील आज सकाळची घटना

    इब्राहिम मुनियार (वय 40), झोया मुनियार (वय 5) अशी वाहून गेलेल्यांची नावे

    घरात पाणी शिरले म्हणून सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी घराबाहेर पडले

    पाण्याचा अंदाज न आल्याने नदीत वाहून गेले

  • 22 Jul 2021 05:53 PM (IST)

    …तर कोल्हापुरातील परिस्थिती गंभीर होऊ शकते : हसन मुश्रीफ

    कोल्हापूर :

    हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया :

    आज तरी परिस्थिती आटोक्यात आहे

    मात्र दोन दिवस असाच पाऊस राहिला तर परिस्थिती गंभीर होऊ शकते

    संभाव्य पूर परिस्थिती निवड जिल्हा प्रशासनाकडून योग्य नियोजन केले गेल

    चीपळून सारखी परिस्थिती सध्या तरी जिल्ह्यात नाही

    अफवांवर विश्वास ठेवू नका

  • 22 Jul 2021 04:56 PM (IST)

    पुण्यावरून चिपळूणकडे मदतीसाठी जाणाऱ्या NDRF टीम कोयनेत अडकली

    कराड :

    पुण्यावरून चिपळूणकडे मदतीसाठी जाणाऱ्या NDRF टीम कोयनेत अडकली

    नवजा मार्गावर दरड आणि झाड पडल्याने टीम पडली अडकून

    कराड चिपळूण महामार्ग वाहतूक खोळंबल्यामुळे नवजा मार्ग जात होती

    मदतीसाठी कोयना धरण व्यवस्थापनकडून जेसीबी आणि यंत्रणा पाठवली

  • 22 Jul 2021 04:32 PM (IST)

    कल्याणमध्ये उल्हासनदीला महापूर, नदीचं आक्राळविक्राळ रुप

    कल्याणमध्ये उल्हासनदीला महापूर, NDRF कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु, शहापूर, भिवंडीमध्ये पावसाचं थैमान, नदीकाठाच्या गावांमध्ये पाणी शिरलं

  • 22 Jul 2021 04:26 PM (IST)

    खडकवासला धरणातून 2 हजार 466 क्युसेकने विसर्ग, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

    खडकवासला धरणात आज दुपारी ३ वाजेपर्यंत १.७५ टीएमसी (८८.५२%) पाणीसाठा झाला आहे. धरण क्षेत्रामध्ये अतिपर्जन्यमानामुळे आज ठीक दु. ४:३० वा. २ हजार ४६६ क्युसेकने विसर्ग करण्यात येणार आहे. त्यानंतर विसर्ग वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवर दिली आहे.

  • 22 Jul 2021 04:20 PM (IST)

    नदीचे पाणी वाढत असल्याने चिखली ग्रामस्थ स्थलांतराच्या तयारीत

    कोल्हापूर :

    नदीचे पाणी वाढत असल्याने चिखली ग्रामस्थ स्थलांतराच्या तयारीत

    गावातील गावकऱ्यांना स्थलांतरित होण्याचा करताहेत आवाहन

    वृद्ध, जनावरांना आधी बाहेर काढा, असं तरुणांचं आवाहन

  • 22 Jul 2021 04:13 PM (IST)

    कोयना पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस, पाणी वाढल्याने नदीपात्रात विसर्ग सुरु, गावांना सतर्कतेचा इशारा

    कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक पाणी विसर्ग नदीपात्रात सुरू कोयना पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस कोयना धरणात पाणी आवक वाढली धरणात 1.45 611 कयुसेक पाण्याची आवक सुरु कोयना धरणाचा पाणीसाठा 70.51 टीएमसी झाला

    धरणातील पाणीसाठा नियमनासाठी धरणाच्या पायथा वीजगृहातुन 2100 कयुसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु

    कोयना नदी काठांच्या गावांना सतर्कतेचा इशारा

  • 22 Jul 2021 04:09 PM (IST)

    चिपळूणमध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढला, भयानक परिस्थिती

    चिपळूनमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात, पावसाचा जोर वाढला, अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे, एनडीआरएफची टीमन पोहोचत आहे, इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचलं आहे. अनेकांच्या घरात खांद्यापर्यंत पाणी साचलं आहे.

  • 22 Jul 2021 04:05 PM (IST)

    मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

    हवामान खात्याने अंदाज वर्तवल आहे की, मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडू शकतो. सिंधुदुर्ग-रत्नागिरीत सध्या पाऊस सुरू आहे. या भागांमध्ये चार ते पाच दिवसांपासून पाऊस सुरू आहे. गोवामध्ये जास्त पाऊस पडतो. आज मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. उद्या येल्लो ॲलर्ट आहे. उद्या मुंबईमध्ये कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

  • 22 Jul 2021 03:59 PM (IST)

    मुक्ताईनगरमध्ये पूर्णा नदीची पातळी वाढली, हातनूर धरणाचे 12 दरवाजे उघडले

    मुक्ताईनगर :

    विदर्भात रात्री झालेल्या दमदार पावसामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णा नदीची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली

    पूर्णा नदीच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे आज सकाळी हातनूर धरणाचे देखील 12 दरवाजे उघडण्यात आले होते धरणातून 18 हजार 187 क्युसेक प्रमाणे पाण्याचा विसर्ग होत आहे

    पूर्णा नदीच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे हातनुर क्षेत्रातही पाण्याची आवक वाढण्याची शक्यता

  • 22 Jul 2021 02:35 PM (IST)

    रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

    रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

    पाऊस सुरूच असल्याने यंत्रणांनी सतर्क राहून बचाव कार्य करावे

    नागरिकांनीही खबरदारी बाळगावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

  • 22 Jul 2021 02:28 PM (IST)

    नागपुरात पावसाचा जोर वाढला, वातावरणात गारवा

    नागपूर  –

    नागपुरात पावसाचा जोर वाढला

    मात्र उघडछाप सुरू

    काल पासून सुरू आहे रिमझिम पाऊस

    वातावरणात गारवा निर्माण झाला

    सकाळ पाऊस पावसाचं वातावरण असून रिमझिम सुरू होता पाऊस

  • 22 Jul 2021 02:25 PM (IST)

    कल्याणमध्ये पाण्यात अडकलेल्या नागरिकांना होडीच्या सहाय्याने काढले बाहेर

    पाण्यात अडकलेल्या नागरीकांना होडीच्या सहाय्याने काढले बाहेर

    कल्याण खाडीत पाण्याची पातळी वाढल्याने खाडीचे पाणी शेजारच्या लोकवस्तीत शिरले आहे. याचा फटका कल्याण डोंबिवली या दोन्ही शहराना बसला आहे डोंबिवलीत गणोश घाट येथील न्यू देवीचा पाडा परिसरात घरात पाणी साचल्याने याठिकाणी स्थानिक नागरीकांनी होडीच्या सहाय्याने नागरीकांना सुखरुप बाहेर काढले तर वालधूनीनजीक असलेल्या शहाड परिसरातील काही घरांमध्ये कमरे इतके पाणी घुसल्याने नागरीकांना कल्याण अग्नीशमन दलाच्या पथकाने होडीच्य सहाय्याने बाहेर काढले आहे.

  • 22 Jul 2021 02:22 PM (IST)

    महाड शहर पाण्याखाली, वस्ती आणि बाजारपेठेला पुराचा वेढा

    महाड शहर पाण्याखाली

    महाड शहरातील वस्ती आणि बाजारपेठेत पुराचा वेढा

    2005 नंतर महाड शहरात सर्वात मोठा पूर आलेला आहे हा व्हिडिओ आहे

    महाड आहे जिथे मुंबई गोवा हायवे वरती पाणी आले आणि हायवे बंद आहे

    महाड हे शहर आहे ते c आकारांमध्ये वेढलेला आहे

    या शहरांमध्ये तीन नद्यांचा पाणी एकत्र येथे काळ नदी सावित्री नदी आणि गांधारी नदी

  • 22 Jul 2021 01:30 PM (IST)

    कुडाळ माणगाव खोऱ्यातील गावांना पावसाचा तडाखा, जनजीवन विस्कळीत

    सिंधुदुर्ग:-

    कुडाळ माणगाव खोऱ्यातील गावांना पावसाचा तडाखा.

    वसोली, उपवडे, आंजीवडे, दुकानवाड, शिवापुर या पंचक्रोशीतील गावातील सर्वच नद्या, ओहोळांना मोठा पुर. शहराला जोडणारे रस्ते, पुल गेले पाण्याखाली. राञी पासुन या गावांचा शहराशी संपर्क तूटला आहे. या भागातील विद्युतपुरवठा देखील खंडित झाला आहे जनजीवन विस्कळीत.

  • 22 Jul 2021 01:28 PM (IST)

    रायगड जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल

    जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल

    अलिबाग :- रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे-

    रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -23.50 मी., अंबा नदी (नागोठणे बंधारा)-7.40 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट महिकावती मंदिर)-9.20 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-19.50 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-46.30 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)-3.60 मी. इतकी आहे.

  • 22 Jul 2021 01:27 PM (IST)

    साताऱ्यातील कैलास स्मशानभूमी पाण्याखाली, 14 अग्निकुंड पाण्याखाली

    सातारा

    साताऱ्यातील संगममाहुली येथील कैलास स्मशानभूमी पाण्याखाली गेली

    मृत कोरोनाबधितांवर अंत्यसंस्कार करण्याची समस्या निर्माण झाली आहे

    अंत्यसंस्काराचे 14 अग्निकुंड पाण्याखाली गेले असून मृत कोरोना अंत्यसंस्कार करण्याची समस्या निर्माण झाली आहे..

  • 22 Jul 2021 01:25 PM (IST)

    कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला, 97 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु

    कोल्हापूर :

    कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला

    महाराष्ट्रात पडत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारचा निर्णय

    अलमट्टीतून 97 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु

  • 22 Jul 2021 01:23 PM (IST)

    सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 19 फुटांवर, सात बंधारे पाण्याखाली

    सांगली –

    कृष्णा नदीची पाणी पातळी 19 फुटावर ,

    कृष्णा नदीवरील सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत.,

    तर वारणा नदीवरील दोन पूल पाण्याखाली.

  • 22 Jul 2021 01:21 PM (IST)

    चिपळूण शहरातील पूर स्थिती जैसे थे, दहा तासापासून शहरात पाणी

    चिपळूण – चिपळूण शहरातील पूर स्थिती जैसे थे

    गेल्या दहा तासापासून चिपळूण शहरात पाणी

    इतिहासात प्रथम एवढा वेळ शहरात राहिले पाणी

    या आधी 2005 रोजी अशी स्थिती निर्माण झाली होती

  • 22 Jul 2021 12:35 PM (IST)

    कणकवली तालुक्यातील फोंडाघाट एस्टी स्टँडला पाण्याचा वेढा, प्रवाशांना मनस्ताप

    सिंधुदुर्ग – कणकवली तालुक्यातील फोंडाघाट एस्टी स्टँडला पाण्याचा वेढा.

    एसटी स्टँडच्या आतमध्ये ही शिरलं पाणी, प्रवाशांना मनस्ताप

    करूळ आणि भुईबावडा घाट मार्गावरची वाहतूक बंद असल्याने कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली होती.

    मात्र फोंडाघाट एसटी स्टँडलाही पावसाचा तडाखा.

  • 22 Jul 2021 12:30 PM (IST)

    चंद्रपुरात कालपासून पावसाची रिपरिप, वैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    चंद्रपूर:- जिल्ह्यात कालपासून पावसाची होती रिपरिप, अर्ध्या तासापासून पावसाने पकडला वेग, जिल्ह्याच्या सर्वच भागात कोसळत आहेत पावसाच्या सरी, अशाच पावसाची होती मुख्य धान पिकाला गरज, जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या सुमारे 42 टक्के एवढा पडलाय पाऊस,

    गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणाचे दोन दरवाजे उघडून 500 क्युमेक्स एवढा जल विसर्ग नदी प्रवाहात सोडणार, पुढच्या काही तासात वैनगंगा नदीकाठच्या गावांना आणि शेतीला प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा, जिल्ह्यातील लाल नाला सिंचन प्रकल्प 75 टक्के भरले याची प्रशासनाची माहिती

  • 22 Jul 2021 12:07 PM (IST)

    कोल्हापूर शहरातील अनेक उपनगरात पाणी शिरले, 200 नागरिकांचे स्थलांतर

    कोल्हापूर शहरातील अनेक उपनगरात पाणी शिरले

    रामानंद परिसरातील 200 नागरिकांचे स्थलांतर

    महापालिकेच्या आपत्ती दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन ला सुरुवात

    रामानंद परिसरातील 50 कुटुंबांचे स्थलांतर

  • 22 Jul 2021 12:05 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात 63.08 मिमी पाऊस, मंगरुळपिर तालुक्यात अतिवृष्टी

    वाशिम :

    वाशिम जिल्ह्यात 63.08 मी मी पाऊस..

    मंगरुळपिर तालुक्यात अतिवृष्टी..

    वाशिम मध्ये 49.4 मी मी रिसोड मध्ये 45.1 मी मी मालेगाव 57.2  मी मी मंगरुळपिर 114.6 मी मी मानोरा 65.8  मी मी कारंजा 59.2 मी मी

  • 22 Jul 2021 11:58 AM (IST)

    नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये अतिवृष्टीसदृश्य पाऊस, 141.9 मिमी पावसाची नोंद

    नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात अतिवृष्टी, १४१.९ मि मि पावसाची नोंद मंडळ निहाय पाऊस किनवट १०४ मि मि बोधडी १४९ मि मि इस्लापुर १७५ मि मि शिवणी १७४ मि मी जलधरा २०७ मि मि मांडवी ९० मि मि दहेली ९२ मि मि अशी नोंद झाली आहे

  • 22 Jul 2021 10:45 AM (IST)

    रायगडच्या कर्जत तालुक्यात दरड कोसळली

    रायगड

    कर्जत तालुक्यातील उमरोली येथे दरड कोसळली.

    उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील पालीवाडी शेजारी दरड कोसळली.

  • 22 Jul 2021 10:39 AM (IST)

    चिपळूण शहरातील वशिष्ठी आणि शिव नदीला पूर, महामार्ग ठप्प

    रत्नागिरी – चिपळूण शहरातील वशिष्ठी आणि शिव नदीला पूर

    बहदूरशेक पूल वाहतुकीसाठी बंद

    मुंबई गोवा व चिपळूण कराड महामार्ग ठप्प

    2005 नंतर प्रथमच भरले एवढे पाणी

  • 22 Jul 2021 10:36 AM (IST)

    सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढला, वाहतूक ठप्प

    सिंधुदुर्ग:-

    जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला सकाळ पासून थांबून थांबून पावसाच्या मोठ मोठ्या सरी. कुडाळ मधील माणगाव खो-यातील निर्मला नदीला आला पुर आंबेरी पुलावर पुराचे पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प 27 गावांचा तालूक्याशी संपर्क तुटला जनजीवन झाले विस्कळीत अनेक भागात विद्युतपुरवठा जाला खंडित. जिल्ह्यात सर्वञ काळोखी वातावरण आहे

  • 22 Jul 2021 10:35 AM (IST)

    कोल्हापुरातील सखल भागात पुराचं पाणी, NDRF च्या दोन टीम कोल्हापूरच्या दिशेने रवाना

    NDRF च्या दोन टीम कोल्हापूरच्या दिशेने रवाना

    कोल्हापूर शहरासाठी एक तर शिरोळ साठी एक टीम रवाना

    कोल्हापूर जिल्ह्यातील सकल भागात पुराच पाणी

    दुपारपर्यंत NDRF च्या टीम कोल्हापूर जिल्ह्यात दाखल होणार

  • 22 Jul 2021 10:34 AM (IST)

    मुसळधार पावसाचा फटका लांब पल्ल्याच्या रेल्वेला, अनेक गाड्या उशिराने

    मनमाड – मुंबईत होत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वेलाही पंचवटी एक्स्प्रेस,

    जनशताब्दी एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस, कोलकोता मेल यासह ट्रेन्स रद्द

    तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब यासह इतर राज्यातून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे 8 ते 10 तास उशिराने

  • 22 Jul 2021 10:33 AM (IST)

    वसई तालुक्यातील 10 ते 12 गावांना तानसा नदीच्या पुराचा विळखा

    विरार:- वसई ताल्युक्यातील 10 ते 12 गावांना तानसा नदीच्या पुराचा विळखा पडला आहे..

    तानसा डाँम ओहरफ्लु झाल्याने मध्यरात्रीच्या सुमारास तानसा नदीला पूर आला आहे..

    या पुराणे भाताने, नावसाई, जाभुलपाडा, थल्याचापाडा, बेलवाडी, आडना यासह छोटे मोठे 10 च्या वर गाव पाडयाना पुराणे विळखा घातला आहे

    किनार्यावरील 50 च्या वर कुटुंबाच्या घरात पाणी शिरले असून गावकार्यानी पूर्ण रात्र जागून काढली आहे..

    गावाला पूर्ण पुराचा वेढा असतानाही प्रशासन मात्र फिरकले नसल्याने स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे..

  • 22 Jul 2021 10:32 AM (IST)

    महाड शहरात पुराचा पहिला बळी, टेरेसवरुन पडून एकाचा मृत्यू

    रायगड

    महाड शहरात पुराचा पहिला बळी.

    टेरेस वरून पडून एकाचा मृत्यू

    टेरेस वरून पूर पहात असताना तोल जाऊन खाली कोसळला.

    महाडच्या रोहिदास नगर भागातील घटना.

    संजय नारखेडे असे 50 वर्षीय मृत व्यक्तीचे नाव.

    महाडच्या खाजगी रुग्णालयात सुरू होते उपचार.

    तटरक्षक दलाची 2 पथके महाडकडे रवाना.

    कोलाड येथील महेश सानप यांचे बचाव पथकही रवाना.

  • 22 Jul 2021 09:30 AM (IST)

    रत्नागिरीत बावनदीला पूर, पुलावरील वाहतूक थांबवली

    रत्नागिरी-अतिवृष्टी मुळे बावनदीला पुर

    मुंबई – गोवा महामार्गावरील ब्रीटीशकालीन बावनदी पुलावरील वाहतूक थांबवली

    पुढील आदेश येईपर्यंत वाहतुक थांबवण्यात येणार आहे

  • 22 Jul 2021 09:23 AM (IST)

    कोल्हापुरातील हातकणंगलेमध्ये पावसाचा जोर कायम

    इचलकरंजी

    कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी शिरोळ हातकणंगलेमध्ये पावसाचा जोर कायम

    आज गुरुवार दि. 22 जुलै रोजी सकाळी ८ : ०० वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी ५९.६ फुट आहे.

    इशारा पातळी -६८ फूट

    धोका पातळी – ७१ फूट

  • 22 Jul 2021 09:11 AM (IST)

    नाशिक धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार हजेरी, गंगापूर धरण 49.71 टक्के भरले

    नाशिक – धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार हजेरी

    24 तासांत गंगापूर धरण क्षेत्रात 234 मिमी इतक्या पावसाची नोंद

    गंगापूर धरण 49.71 टक्के भरले

    अवघ्या 24 तासात 13 टक्के वाढ

  • 22 Jul 2021 09:08 AM (IST)

    चिपळुणात पुराने हाहाकार, खेर्डी बाजारपेठेमध्ये सात फूट पाणी

    रत्नागिरी- चिपळुणात पुराने हाहाकार

    चिपळूण 2005 पुराची गंभीर परिस्थिती

    खेर्डी बाजारपेठेमध्ये सात फुट पाणी

    अनेक लोकं घरामध्ये अडकून

  • 22 Jul 2021 09:07 AM (IST)

    भीमाशंकर परिसरातील कळमोडी धरण ओव्हरफ्लो

    भीमाशंकर, पुणे

    -भीमाशंकर परिसरातील कळमोडी धरण ओव्हरफ्लो

    -दोन दिवसांपासून भीमाशंकर परिसरात पाऊसाचा जोर वाढल्याने 1.5 TMC क्षमता असणारे कळमोडी धरण ओव्हरफ्लो

    -काळमोडी धरणाच्या आठही सांडव्याद्वारे रात्रीच्या सुमारास ६९७९ क्यूसेक वेगाने पाणी स्वयंचलित दरवाजाद्वारे आरळा नदीत सोडण्यात आले.पहाटे पावसाचा थोडा जोर कमी झाल्याने ३००० क्युसेक वेगाने पाणी सुरू आहे

    -आरळा नदीतुन चासकमान धरणात पाण्याचा विसर्ग सुरू

    -प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय

  • 22 Jul 2021 08:31 AM (IST)

    कोल्हापूर शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात

    कोल्हापूर

    शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात

    खानविलकर पेट्रोल पंप परिसरातील रस्त्यावर एक ते दीड फूट पाणी

    परिसरातील अपार्टमेंटच्या तळमजल्यात शिरतय साचलेले पाणी

    स्थानिक रहिवाशांनी खबरदारी म्हणून आपली चार चाकी वाहने लावली सुरक्षित ठिकाणी

  • 22 Jul 2021 08:08 AM (IST)

    कराड कोयना धरण पाणलोट क्षेत्रात उच्चांकी पावसाची नोंद, 400 मिमी पावसाची नोंद

    कराड कोयना धरण पाणलोट क्षेत्रात उच्चांकी पावसाची नोंद महाबळेश्वर व वलवण येथे 400मिमी पावसाची नोंद

  • 22 Jul 2021 08:05 AM (IST)

    सोलापुरात पहाटेपासून पावसाची रिपरिप, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

    सोलापुर -रात्रीपासून पडणाऱ्या भुरभुर पावसाने दिली उघडीप

    पहाटेपासून पावसाने दिली उघडीप

    पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

  • 22 Jul 2021 08:03 AM (IST)

    मराठवाड्यात सर्वदूर संततधार, काही जिल्ह्यात सूर्यदर्शन नाही

    औरंगाबाद :-

    मराठवाड्यात सर्वदूर संततधार,काही जिल्ह्यात सूर्यदर्शन नाही..

    चांगल्या पावसामुळे मराठवाड्याला होतोय लाभ..

    रस्त्यांवर पाणी तर तलाव वाहतायेत तुडुंब..

    सतत पाऊस पडत असल्याने आणि सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे पिके पडली पिवळे..

    खंड पडल्यानंतर मराठवाड्यात पावसाचे पुनरागमन

  • 22 Jul 2021 08:02 AM (IST)

    बदलापुरात उल्हास नदीचं पाणी शहरात घुसलं

    बदलापुरात उल्हास नदीचं पाणी शहरात घुसलं

    रमेशवाडी, बॅरेज रोड, हेंद्रेपाडा भागात नदीचं पाणी घुसलं

    काही ठिकाणी गुडघाभर, तर काही ठिकाणी तीन फुटांपर्यंत पाणी साचलं

  • 22 Jul 2021 08:02 AM (IST)

    वसईचा सनसिटी-गास रस्ता 4 दिवसापासून पाण्याखाली, पाणी ओसरायला 8 दिवस लागण्याची शक्यता

    वसई:- वसईचा सनसिटी-गास रस्ता 4 दिवसापासून पाण्याखाली

    वसई विरार नालासोपारा शहरात मध्यरात्री पासून पावसाने विश्रांती घेतली आहे..

    शहरातील सकल भागातील रस्त्यावर साचलेले पाणी ओसरले आहे मात्र वसई चा सनसिटी रस्त्यावरील पाणी ओसरायचे नाव घेत नाही

    सनसिटी-गास रस्त्यावर गुडगाभर पाणी साचले असून वाहनधारक जीव मुठीत घालून याच पाण्यातून मार्ग काढत आहेत.

    सनसिटी- गास रस्त्याला समुद्राचे स्वरूप आल्याने रस्ता कुठे आहे हे दिसणे ही कठीण झाले आहे..

    वसई पश्चिमेकडून गास, भुईगाव, सोपारा, निर्मळ, विरार पश्चिम या ठिकाणी जाण्यासाठी हा जवळचा बायपास रोड आहे

    या रस्त्यावरील पाणी ओसरायला पुढचे 8 दिवस लागू शकतात तो पर्यंत हा रस्ता प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद करणे गरजेचे आहे अन्यथा याठिकाणी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता ही आहे

  • 22 Jul 2021 08:01 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच, पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल

    कोल्हापूर

    कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच

    पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल

    पंचगंगा नदीचे पाणी पातळी 34 फूट 9 इंचावर

    नदीची इशारा पातळी आहे 39 फुटावर तर धोका पातळी आहे 43 फुटांवर

    कोल्हापूर गगनबावडा मार्गावर पुराच पाणी

    मांडुकली इथं कुंभी नदीच एक फूट पाणी

    कोल्हापूर गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी बंद

    गेळवडे धरणातील विसर्ग वाढल्यान बरकी गावात जाणार पूल पाण्याखाली

    बरकी गावचा संपर्क तुटला

  • 22 Jul 2021 07:56 AM (IST)

    वसई-विरारमध्ये पावसाची विश्रांती, लोकल वाहतूक सुरळीत

    मध्यरात्री पासून वसई विरार मधील पाऊस थांबला आहे…

    शहरातील सर्व व्यवहार सुरळीत.. सकल भागातील पाणी ही ओसरले आहे..

    विरारहून चर्चगेट ला जाणाऱ्या सर्व लोकल सुरळीत सुरू..

    आभाळ पूर्णपणे भरलेलेच आहे..पण पाऊस नसल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना एक दिलासा मिळाला आहे

  • 22 Jul 2021 07:51 AM (IST)

    जळगाव हतनूर धरणाचे 12 दरवाजे पूर्णपणे उघडले

    जळगाव – हतनूर धरणाचे 12 दरवाजे पूर्णपणे उघडले

    धरणातून 18 हजार 187 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू

  • 22 Jul 2021 07:51 AM (IST)

    कसारा घाटातील इगतपुरी जवळ अप मार्गावरच्या ट्रॅकवर कोसळली दरड, अनेक गाड्या रद्द

    नाशिक – कसारा घाटातील इगतपुरी जवळील अप मार्गावरच्या ट्रॅकवर कोसळली दरड..

    ट्रॅक वरची माती काढण्याचे काम सुरू..

    नाशिक मुंबई दरम्यानच्या अनेक गाड्या रद्द..

    तर काही गाड्या वसई विरार मार्गे वळल्या

    दुपार पर्यंत ट्रॅक सुरू होण्याची शक्यता

  • 22 Jul 2021 07:50 AM (IST)

    चिपळूण शहराला मुसळधार पावसाचा फटका, अनेक बाजारपेठेत शिरले पाणी

    रत्नागिरी – रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाचा चिपळूण शहराला बसला फटका

    शहरातील अनेक भागात भरले पाणी बाजार पेठ ,मच्छी मार्केट ,भाजी मार्केट ,ठिकाणी या परिसरात भरले पाणी

  • 22 Jul 2021 07:49 AM (IST)

    रत्नागिरीतील काजळी नदीला पूर, चांदेराई बाजारपेठेत चार फूट पाणी

    रत्नागिरी- जवळच्या काजळी नदीला पूर

    चांदेराई बाजारपेठेत पाणी

    बाजारपेठेत चार फुटांचे पाळी

    चांदेराई लांजा आणि चांदेराई रत्नागिरी मार्गावरती पाणी

    दोन्हीकडची वाहतूक ठप्प

    रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या कोसळती धारा

  • 22 Jul 2021 07:49 AM (IST)

    पुणे शहरात ढगाळ वातावरण, धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम

    पुणे

    पुणे शहरात ढगाळ वातावरण

    अधून मधून पडतायेत रिमझिम पावसाच्या सरी

    रात्री शहरात झाला संततधार पाऊस

    धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम

  • 22 Jul 2021 07:48 AM (IST)

    रत्नागिरी-चिपळूण-कराड मार्गावर पाणी भरल्याने वाहतूक ठप्प

    रत्नागिरी -चिपळूण – कराड मार्गावर पाणी भरल्याने वाहतूक ठप्प

    खेर्डी बाजारपेठेत भरले अनेक ठिकाणी पाणी

  • 22 Jul 2021 07:47 AM (IST)

    रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचा कहर, बाजारपेठेमध्ये तीन फूट पाणी

    रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचे धुमशान

    मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत

    रत्नागिरीजवळच्या काजळी नदीला पूर

    चांदेराई बाजारपेठेमध्ये तीन फुटांचे पाणी

    खेडमधील जगबुडी नदीला देखील पूर

    खेड मटन मार्केट…ख्वाजा स्वामिल …..गांधी चौक इथं पुराचं पाणी …

    गांधी चौक इथं चौक येते ३ फूट पाणी..

  • 22 Jul 2021 07:43 AM (IST)

    नाशिकमध्ये अवघ्या काही तासांच्या पावसात त्रंबकेश्वर नगरी पाण्यात, अनेक घरात पाणी घुसलं

    नाशिक – अवघ्या काही तासांच्या पावसात त्रंबकेश्वर नगरी पाण्यात..

    रात्री झालेल्या पावसाने नाल्याचं पाणी रस्त्यावर

    अनेकांच्या घरात पाणी घुसलं

    नगरपालिकेचे नाले सफाईचे दावे ठरले फोल

    पावसाने सध्या घेतली उसंत

  • 22 Jul 2021 07:41 AM (IST)

    नाशिकच्या गोदावरी नदीला रात्री पावसामुळे पूर, नालेसफाईचे तीन तेरा

    नाशिक – गोदावरी नदीला रात्रीच्या पावसाने आला नाल्याचा पूर..

    धरणाचं पाणी न सोडताच रस्त्यावर आलं नाल्याचं पाणी..

    गोदाघाटावर साचलं नाल्याच पाणी..

    महापालिकेच्या नालेसफाईचे पहिल्याच पावसात तीन तेरा..

  • 22 Jul 2021 07:40 AM (IST)

    नवी मुंबईत पावसाची विश्रांती, रेल्वे वाहतूक सुरळीत

    नवी मुंबई

    नवी मुंबईत पावसाची विश्रांती.

    रात्री १२ नंतर पावसाचा ओघ थांबला

    सध्या ढगाळ वातावरण

    हार्बर अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सुरळीत

  • 22 Jul 2021 07:39 AM (IST)

    कसारा घाटात दरड कोसळल्याने अनेक रेल्वेगाड्या रद्द, तर काही गाड्या अडकल्या

    नाशिक – कसारा घाटात दरड कोसळल्याने अनेक गाड्या रद्द

    अपच्या हावडा मेल,गोरखपूर एक्सप्रेस, फैजाबाद एक्स्प्रेस

    तर डाऊन च्या सर्व गाड्या वसई विरार कडून वळल्या

    कृषिनगर एक्स्प्रेस आणि पवन एक्स्प्रेस कसारा कसारा इगतपुरीच्या मध्ये अडकल्या

  • 22 Jul 2021 07:38 AM (IST)

    नाशिकच्या जुन्या कसारा घाटात दरड हटविण्याचे काम सुरु, मध्य रेल्वेची वाहतूक बंद

    नाशिक – जुना कसारा घाटात दरड हटविण्याचे काम सुरू..

    मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन लाईन वर काम सुरू..

    अप लाईन खाली वाहून गेलेल्या खडीचे भराव टाकण्याचे काम सुरू..

    मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन रेल्वे गाड्या बंद..

  • 22 Jul 2021 07:31 AM (IST)

    भिवंडीतील भादाणे गावात शिरले खडवली नदीचे पाणी, पुरसदृश्य परिस्थिती 

    भिवंडी

    भिवंडी तालुक्यातील पडघा नजीक भादाणे या गावात शिरले खडवली नदीचे पाणी,

    ठिकठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती

    रोहिदास नगर आणि सिद्धार्थ नगर 55 घरांमध्ये शिरले पाणी

    200 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

    तहसीलदार पडघा परिसरात TDRF पथका सह तैनात,

  • 22 Jul 2021 07:26 AM (IST)

    भिवंडीत 6 घरांना पावसाच्या पाण्याचा वेढा, 25 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

    भिवंडी

    भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या कुंभारशिव ग्रामपंचायत हद्दीतील गोरलेपाडा येथील 6 घरांना पावसाच्या पाण्याचा वेढा

    25 नागरिकांना रस्सीच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात यश

    कुंभारशिव येथे सुरक्षित स्थळी हलविले

Published On - Jul 22,2021 7:24 AM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.