Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिष शेलार म्हणाले, गेला गाळ कुणीकडे?; पालिकेने केला ‘हा’ दावा, दिली आकडेवारी!

महापालिकेने एक प्रसिद्धीपत्रक काढून नालेसफाईच्या कामाची माहिती दिली आहे. ही माहिती देतानाच महापालिकेने आतापर्यंत 104 टक्के गाळ काढल्याचा दावाही केला आहे.

आशिष शेलार म्हणाले, गेला गाळ कुणीकडे?; पालिकेने केला 'हा' दावा, दिली आकडेवारी!
ashish shelar
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 7:44 PM

मुंबई: भाजपचे नेते आशिष शेलार यांनी दोन दिवसांपूर्वीच मुंबईतील नालेसफाई आणि गाळावरून महापालिकेवर टीका केली होती. महापालिकेने किती गाळ काढला आणि हा गाळ कुठे टाकला? असा सवाल आशिष शेलार यांनी केला होता. महापालिकेने गाळाची आकडेवारी जाहीर करून शेलार यांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे. (104% desilting of nullahs done, better prepared for monsoon: BMC)

महापालिकेने एक प्रसिद्धीपत्रक काढून नालेसफाईच्या कामाची माहिती दिली आहे. ही माहिती देतानाच महापालिकेने आतापर्यंत 104 टक्के गाळ काढल्याचा दावाही केला आहे. मुंबईतील मोठ्या नाल्यांमधून पावसाळा पूर्व कामांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत अधिक म्हणजे 104 टक्के गाळ काढण्यात आला आहे. एकूण 3 लाख 11 हजार 381 मॅट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट महानगरपालिकेने यंदा समोर ठेवले होते. त्या तुलनेत 3 लाख 24 हजार 284 मॅट्रिक टन इतका गाळ काढून वाहून नेण्यात आला आहे. निश्चित केलेल्या मुदतीत म्हणजे मे अखेरीपर्यंत ही कामगिरी साध्य करण्यात आली आहे, असं पालिकेने म्हटलं आहे.

टाळेबंदीतही उद्दिष्ट्ये पूर्ण

मुंबई महानगरातील पर्जन्यमान आणि पावसाची तीव्रता याबाबतचा अनुभव लक्षात घेऊन, पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्यांमधून गाळ काढण्याबाबतचे उद्दिष्ट ठरविले जाते. या आधारावर यंदा गतवर्षाच्या तुलनेत 35 टक्के अधिक गाळ काढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. ते महानगरपालिकेने यशस्वीपणे पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे कोविड – 19 विषाणू संसर्गाच्या स्थितीचा आणि टाळेबंदीचा प्रतिकूल परिणाम नालेसफाई कामांवर होऊ नये, याची पूर्ण दक्षता घेऊन ही कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे, असा दावा पालिकेने केला आहे.

19 हजार 093 वाहनफेऱ्यांद्वारे गाळ वाहून नेला

संपूर्ण वर्षभरात प्रमुख नाल्यांमधून सुमारे 4 लाख 13 हजार 987 मॅट्रिक टन गाळ काढण्याचे ठरविण्यात आले आहे. पैकी, पावसाळापूर्व 3 लाख 11 हजार 381 मॅट्रिक टन गाळ काढण्याचे निश्चित करण्यात आले होते. 31 मे अखेरीपर्यंत एकूण 3 लाख 24 हजार 284 इतका गाळ पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून काढण्यात आला आहे. तर 19 हजार 093 इतक्या वाहनफेऱ्यांद्वारे हा गाळ वाहून नेण्यात आला. म्हणजेच पावसाळापूर्व उद्दिष्टाच्या 104 टक्के इतका गाळ काढण्याची कामगिरी महानगरपालिकेने पार पाडली आहे.

कोणत्या भागातून किती गाळ काढला?

यामध्ये मुंबई शहर भागात 40 हजार 246 मॅट्रिक टनाच्या तुलनेत 43 हजार 766 मॅट्रिक टन म्हणजे 109 टक्के गाळ काढण्यात आला आहे. एकूण 2 हजार 125 वाहनफेऱ्यांमधूनन तो वाहून नेण्यात आला आहे. पूर्व उपनगरांचा विचार करता एकूण 96 हजार 908 मॅट्रिक टन उद्दिष्टाच्या तुलनेत 1 लाख 6 हजार 260 मॅट्रिक टन गाळ काढण्यात आला आहे. याचाच अर्थ सुमारे 102 टक्के उद्दिष्ट गाठण्यात आले आहे. हा गाळ वाहून नेण्यासाठी 5 हजार 964 वाहनफेऱ्या झाल्या आहेत. पश्चिम उपनगरांमध्ये 1 लाख 74 हजार 209 मॅट्रिक टन गाळ काढण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. पैकी, 1 लाख 82 हजार 285 मॅट्रिक टन म्हणजेच सुमारे 105 टक्के गाळ काढण्यात आला आहे. एकूण 11 हजार 004 इतक्या वाहनफेऱ्या करून हा गाळ वाहून नेण्यात आला आहे, असं पालिकेने स्पष्ट केलं आहे.

जूनमध्ये 17 हजार 297 मॅट्रिक टन गाळ काढला

ही सर्व कार्यवाही 31 मे पर्यंत म्हणजेच निर्धारित केलेल्या मुदतीमध्ये पूर्ण करण्यात आली आहे. त्यानंतर देखील म्हणजे सध्याच्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 17 हजार 297 मॅट्रिक टन गाळ काढण्यात आला आहे. मान्सूनचे प्रत्यक्ष आगमन होण्यापूर्वी अधिकाधिक नाले स्वच्छता करून महानगरपालिकेने समाधानकारकरित्या कार्यवाही पूर्ण केली आहे. नाल्यांमधून अधिकाधिक गाळ काढल्याने पावसाळी पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी मदत मिळते, असं पालिकेने स्पष्ट केलं आहे.

शेलार काय म्हणाले होते?

आशिष शेलार यांनी दोन दिवसांपूर्वी नालेसफाईची पाहणी करताना पालिकेच्या नालेसफाईवर प्रश्नचिन्हे उपस्थित केले होते. नालेसफाईचे पालिकेच्या सत्ताधारी आणि प्रशासनाकडून करण्यात आलेले दावे फोल आहेत. अनेक ठिकाणी गाळ तसाच पडून आहे. काही ठिकाणी तर नाल्यावर जलपर्णी उगवली आहे. त्यामुळे महापालिका 100% चा दावा कसा करू शकते? कंत्राटदारांकडून बीलं काढण्यासाठी दावा केला जातोय पण स्थायी समिती आणि महापौर पण असे दावे करीत असतील तर हे त्यांचे निव्वळ पाप आहे. याला जबाबदार महापालिका प्रशासन ही आहे. वेलारसू नावाचा एक राक्षस या शहरात फिरत असून त्यांनी केलेले फोल दावे आहेत. या वेलारसू यांनी मुंबईकरांच्या जीवाशी खेळ रचला आहे. हे दावे करणाऱ्या वेलारसू आणि त्याचे समर्थन करणारे महापौर आणि स्थायी समिती यांना आम्ही मुंबईकरांसमोर उघडे करू. यांच्या घरासमोर आम्ही गाळ नेऊन टाकू, असा इशारा शेलार यांनी दिला होता. तसेच गाळ कुठे टाकला याचे फोटो दाखवण्याचे आव्हानच त्यांनी पालिकेला दिले होते. (104% desilting of nullahs done, better prepared for monsoon: BMC)

संबंधित बातम्या:

मुंबई तुंबू नये म्हणून पालिका अ‍ॅलर्ट; रेल्वे, मेट्रो, एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

आघाडी सरकारचा ‘कौशल्य विकास’, एका महिन्यात दिला 10 हजार बेरोजगारांना रोजगार

Maharashtra Coronavirus LIVE Update : नाशिकमध्ये दिवसभरात 750 रुग्णांना डिस्चार्ज, 356 नव्या रुग्णांची नोंद

(104% desilting of nullahs done, better prepared for monsoon: BMC)

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.