मुंबई : मुंबईत दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे कंत्राट खड्डे बुजवण्यासाठी काढले जातात. यंदा या खड्डेमुक्तीसाठी तिप्पट रुपयांचे कंत्राट काढण्यात आले. यावर काँग्रेसने आक्षेप घेतलाय. मोठ्या प्रमाणावर लूट सुरू आहे. कंत्राटदाराचे आणि सरकारचे पोट भरण्यासाठीचा हा उपक्रम आहे. या कामाला स्थगिती द्या, अशी मागणी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली. सरकारने असं सांगितलं की, महाराष्ट्र खड्डेमुक्त होणार. त्यासाठी तुम्ही १२५ कोटी रुपयांचे खड्डे भरण्यासाठी टेंडर काढता. ही जी टेक्नॉलॉजी आहे. महापालिका ही एक प्रयोगशाळा झाली आहे. असा आरोप रवी राजा यांनी केला.
बृहन्मुंबई महापालिकेने टेंडर काढले आहे. सिमेंटच्या प्रणालीसाठी ८ कोटी ९९ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. ४ कोटी ९२ लाख एक गोलचासाठी वापरण्यात येणार आहे. १४ कोटी रुपये यासाठी वापरण्यात येणार आहे. ही लूट सुरू आहे.
कुठे पाऊस पडणार माहीत आहे का. रस्त्याचे नाव दिलेले नाही. कोणते रोड आहेत. खड्डे तुम्ही कसे मापणार, असा सवाल रवी राजा यांनी विचारला आहे. खड्डे कुठे पडणार हे तुम्हाला माहीत आहे का. ही फक्त बृहन्मुंबई महापालिकेची पैशाची उधळपट्टी आहे.
महापालिकेने पावसाळ्यातील खड्डे भरण्यासाठी तब्बल सव्वाशे कोटी रुपयांचे कंत्राट काढले. दरवर्षी ४० कोटी रूपयांत खड्डे भरले जात असताना मग यंदा १२५ कोटी रुपये कशासाठी ? असा सवाल काँग्रेसने विचारला आहे. कंत्राटदारांचे भले करण्यासाठी ही मॅच फिक्सिंग करून लूट सुरू असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.
पश्चिम उपनगर ८४ कोटी रुपये, पूर्व उपनगर २८ कोटी रुपये आणि शहर विभागासाठी १४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. रॅपिड हार्डनिंग कॅाक्रिटद्वारे खड्डे भरण्यासाठी ८० कोटी रुपयांची आणि अस्फाल्टद्वारे खड्डे भरण्यासाठी ४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मुंबई म्युन्सिपल कॅार्पोरेशनचे आता मुंबई म्युन्सिपल करप्शन झाल्याचा आरोप रवी राजा यांनी केला.