‘व्होट जिहाद’साठी देशभरातून 125 कोटी, मालेगावात गुन्हा दाखल, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा खळबळजनक दावा

ग्रामीण भागातील सहकारी बँकेत हे अकाऊंट उघडले जातात. तसेच ज्या नावाने बँक अकाऊंट उघडले ते सर्व खाती हिंदू व्यक्तींच्या नावाने आहेत. मालेगाव येथील मर्चेंट बँकेच्या शाखेत गेल्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये जवळजवळ १२ खात्यांमध्ये शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा प्रकार उघड झाला होता.

'व्होट जिहाद'साठी देशभरातून 125 कोटी, मालेगावात गुन्हा दाखल, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा खळबळजनक दावा
किरीट सोमय्या
Follow us
| Updated on: Nov 11, 2024 | 1:20 PM

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात ‘व्होट जिहाद’ कामाला लागली आहे. या निवडणुकीसाठी चार दिवसांपूर्वी कोट्यवधी रुपयाचे व्यवहार झाल्याचे मालेगाव येथे बाहेर आले आहे. देशभरातून विविध बँक खात्यातून मालेगावच्या बँकेत पैसे जमा झाले. 125 कोटीहून अधिक पैसे जमा झाले आहे. या प्रकरणी मालेगाव येथे गुन्हा दखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिराज अहमद फरार झाला आहे, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी सांगितले.

37 अकाऊंटमध्ये पाठवले पैसे

किरीट सोमय्या म्हणाले की, मुंबई, मालेगाव, नाशिक, अहमदाबाद 37 अकाऊंटमध्ये पैसे पाठवून त्यानंतर ते काढण्यात आले आहे. सुमारे सव्वाशे कोटी रुपये व्होट जिहादमध्ये वापरण्यात येत आहेत. मी या संदर्भात निवडणूक आयोगाला तक्रार करणार आहे. तसेच सीबीआय आणि ईडीने ताबडतोब कारवाई सुरू करावी, अशी आपली मागणी आहे.

देशातील बँकांमध्ये पैसे जमा झाला आहे. या प्रकरणामागे मोठे रॅकेट आहे. 100 कोटी रुपये बाहेरून आला आहे. हा पैसा विदेशातून आल्याची मला शंका आहे, असे सोमय्या यांनी म्हटले. ते म्हणाले, अवघ्या तीन दिवसात बँकेत कुठून पैसा जमा झाले ते कळले पाहिजे. हे पैसे कुठून आले पैसे आणि कुठे गेले हे कळले पाहिजे. ग्रामीण भागातील सहकारी बँकेत हे अकाऊंट उघडले जातात. तसेच ज्या नावाने बँक अकाऊंट उघडले ते सर्व खाती हिंदू व्यक्तींच्या नावाने आहेत. मालेगाव येथील मर्चेंट बँकेच्या शाखेत गेल्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये जवळजवळ १२ खात्यांमध्ये शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा प्रकार उघड झाला होता. शिवसेना पदाधिकारी व बेरोजगार तरुण यांनी मालेगाव येथे पत्रकार परिषद घेत हे आरोप केले होते.

हे सुद्धा वाचा

सामनावर गुन्हा दाखल करणार

सामना वर्तमानपत्रावर आपण गुन्हा दाखल करणार आहोत, असे सोमय्या यांनी म्हटले आहे. सामना वृत्तपत्रातून पुन्हा माझ्या कुटुंबाची बदनामी सुरू आहे. आज पुन्हा एकदा वकिलामार्फत नोटीस पाठवली आहे. जुहूमध्ये मालमत्ता हडप करत असल्याचा त्यांनी सामनामधून सांगितले आहे. कोर्टात शिक्षा झाल्यानंतर अजूनही संजय राऊत यांनी धडा घेतलेला नाही, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.