मुंबईत पुन्हा 14 तासांचा मेगा ब्लॉक, अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द; ‘असे’ असेल ब्लॉकदरम्यान वेळापत्रक

मध्य रेल्वेकडून पुन्हा एकदा ठाणे आणि दिवा स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सध्या या मार्गावर पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे काम सुरू आहे. या कामांसाठी ठाणे, दिवा स्थानकांदरम्यान येत्या रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक तब्बल 14 तासांचा असणार आहे.

मुंबईत पुन्हा 14 तासांचा मेगा ब्लॉक, अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द; 'असे' असेल ब्लॉकदरम्यान वेळापत्रक
Mumbai local
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 8:08 PM

मुंबई : मध्य रेल्वेकडून (Central Railway)  पुन्हा एकदा ठाणे आणि दिवा स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. सध्या या मार्गावर पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे काम सुरू आहे. या कामांसाठी ठाणे, दिवा स्थानकांदरम्यान येत्या रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक तब्बल 14 तासांचा असणार आहे. या दरम्यान डाऊन जलद मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहे. अशी माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच याचदरम्यान अप जलद मार्गावर देखील दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक येत्या शनिवार आणि रविवार असा असणार आहे. 23 तारखेला मध्यरात्रीपासून  12.30 वाजेपासून दुपारी 2.30 वाजेपर्यंत  हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. दरम्यान या मेगा ब्लॉकदरम्यान या मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता असून, प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन मध्य रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.

ब्लॉक सुरू होण्यापूर्वी गाड्या धावण्याचा पॅटर्न

दादर येथून दिनांक 22.1.2022 रोजी रात्री 11.40 वाजलेपासून ते दिनांक 23.1.2022 रोजी पहाटे 02.00 वाजेपर्यंत सुटणार्‍या जलद उपनगरी व मेल/एक्स्प्रेस गाड्या माटुंगा ते कल्याण डाउन धिम्या मार्गावर वळविल्या जातील. डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे स्थानकावर थांबणार नाहीत. 11003 दादर-सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस न वळविता आपल्या नियोजित डाऊन जलद मार्गाने व आपल्या नियोजित थांब्यांसह धावेल. दिनांक 23.1.2022 रोजी मध्यरात्री 12 नंतर लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या कल्याणकडे जाणार्‍या डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या मुलुंड ते कल्याण डाऊन धिम्या मार्गावर वळविल्या जातील व या गाड्या ठाणे स्थानकावर थांबणार नाहीत.

ब्लॉक सुरू झाल्यानंतर गाड्यांचे वेळापत्रक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक 23.1.2022 रोजी पहाटे 02.00 वाजलेपासून ते ब्लॉक अवधी पूर्ण होईपर्यंत कल्याणकडे जाणार्‍या उपनगरीय व मेल/एक्स्प्रेस गाड्या मुलुंड ते कल्याण दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. कल्याणकडे जाणार्‍या मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे स्थानकावर थांबणार नाहीत. ठाण्यातील प्रवाशांना दादर, कल्याण आणि पनवेल स्थानकांवरून संबंधित गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी आहे. कोकणाकडे जाणाऱ्या डाऊन मेल एक्स्प्रेस गाड्या ठाणे येथे प्लॅटफॉर्म क्र. 7 वर थांबतील आणि पुढे जातील. ब्लॉकनंतर, कल्याणकडे जाणार्‍या डाऊन जलद उपनगरीय व मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे फलाट क्रमांक 5 मार्गे ठाणे-दिवा विभागातील नवीन डाऊन जलद अलाइनमेंटवर कळवा आणि मुंब्रा स्थानकांमधून धावतील. ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/ दादर/ लोकमान्य टिळक टर्मिनसहून पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन गाड्या डाऊन फास्ट मार्गावरून किंवा 5 व्या मार्गावरून ठाणे येथे प्लॅटफॉर्म क्र.7 वर येतील आणि नवीन 5व्या मार्गाने (पूर्वीचा डाऊन जलद मार्ग) पारसिक बोगद्यामधून जातील.

22.1.2022 रोजी  ‘या’ एक्सप्रेस गाड्या रद्द

17618 नांदेड – मुंबई तपोवन एक्सप्रेस 11030 कोल्हापूर – मुंबई कोयना एक्सप्रेस 12140 नागपूर – मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस

23.1.2022 रोजी  ‘या’ एक्सप्रेस गाड्या रद्द

22105 / 22106 मुंबई – पुणे – मुंबई इंद्रायणी एक्सप्रेस 22119 / 22120 मुंबई – करमळी – मुंबई तेजस एक्सप्रेस 11007 / 11008 मुंबई – पुणे – मुंबई डेक्कन एक्सप्रेस 17617 मुंबई – नांदेड तपोवन एक्सप्रेस 12071 / 12072 मुंबई – जालना – मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस 11029 मुंबई – कोल्हापूर कोयना एक्सप्रेस 12139 मुंबई – नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस

संबंधित बातम्या

केडीएमसीच्या निषेधार्थ उपोषणकर्त्यांनी केले मुंडन, रिंग रोड प्रकल्पातील लोकांच्या पुनर्वसनाचे काय? संतप्त सवाल

राज्यातील 3 जम्बो कोविड सेंटरमध्ये 100 कोटीचा भ्रष्टाचार, किरीट सोमय्यांचा आरोप, मुख्यमंत्र्यांवरही निशाणा

ral video| हिरो बनून कुत्र्याने वाचवले हरणाचे प्राण; लोकांकडून श्वानाच्या शौर्याचे कौतुक

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.