फक्त 22 व्या मजल्यावर गेल्याचं निमित्त झालं… अमेरिकेहून मुंबईत फिरायला आलेल्या मुलाचं काय झालं?; पोलीस तपास सुरू

| Updated on: Jul 02, 2023 | 2:28 PM

अंधेरीच्या मरोळ येथे एका मुलाचा इमारतीच्या 22 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. तो आईसोबत अमेरिकेहून मुंबईत फिरायला होता. तो डिप्रेशनमध्ये होता. कुणाशीच बोलत नसायचा. त्याच्या मृत्यूमुळे संशय निर्माण झाला आहे.

फक्त 22 व्या मजल्यावर गेल्याचं निमित्त झालं... अमेरिकेहून मुंबईत फिरायला आलेल्या मुलाचं काय झालं?; पोलीस तपास सुरू
Andheri Boy dies
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : आईसोबत अमेरिकेहून मुंबईत फिरायला आलेल्या एका 14 वर्षाच्या मुलावर दुर्देवी प्रसंग कोसळला आहे. या मुलाची ही शेवटचीच मुंबई भेट ठरली आहे. इमारतीच्या 22 व्या मजल्यावरून पडून या मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हळहळ पसरली आहे. या मुलाचे वडील अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर आहेत. मुलाचा मृत्यू झाल्याने या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कृष्णा अग्रवाल असं या मुलाचं नाव आहे. अनुपम अग्रवाल असं त्याच्या वडिलांचं नाव आहे. अंधेरी परिसरातील मरोळ येथे ही दुर्देवी घटना घडली आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलीस या घटनेची प्रत्येक अँगवलने चौकशी करत आहे. आज सकाळीच ही घटना घडल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मरोळ येथील ओएसीस या इमारतीतील 22 व्या मजल्यावरून पडून कृष्णाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

हे सुद्धा वाचा

तो डिप्रेशनमध्ये होता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याला व्हिडीओ गेम खेळण्याचा छंद लागला होता. तो कुणाशीही बोलत नसे. फक्त मोबाईलवर गेम खेळण्यात व्यस्त असायचा. दिवसभर फक्त तो व्हिडीओ गेमवरच असायचा. मात्र, त्याचा इमारतीच्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला की त्याने आत्महत्या केली याचा पोलीस शोध घेत आहेत. त्याचा शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावरच अधिक माहिती मिळणार आहे. त्याच्या कुटुंबीयांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

आणखी एका तरुणाचा मृत्यू

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील नोएडा येथेही एका 21 वर्षीय तरुणाचा इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. सेक्टर -100 मधील लोट्स बुलवर्ड सोसायटीत ही घटना घडली. हा तरुण इमारतीवरून कोसळल्यानंतर गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेलं असता उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. हा तरुण मथुराचा राहणारा असून गंतव्य शर्मा असं त्याचं नाव आहे. तो बुलवर्ड सोसायटीतील टॉवर-10 मधील फ्लॅटनंबरमधील 806 व्या मजल्यावर भाड्याने राहत होता.