धारावीत सिलिंडर स्फोट, 5 जणांची प्रकृती गंभीर, 8 वर्षाच्या मुलाचा समावेश, तिघांचे चेहरे भाजले; जखमींची यादी एका क्लिकवर
धारावीत आज दुपारी झालेल्या गॅस सिलिंडर स्फोटात 15 जण होरपळले आहेत. त्यापैकी 10 जण किरकोळ जखमी झाले आहेत. तर 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. (cylinder blast in Dharavi)
मुंबई: धारावीत आज दुपारी झालेल्या गॅस सिलिंडर स्फोटात 15 जण होरपळले आहेत. त्यापैकी 10 जण किरकोळ जखमी झाले आहेत. तर 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेत तीन जणांचे चेहरे भाजले असून त्यात एका 8 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. (15 injured in cylinder blast in dharavi 5 critical)
धारावी-माटुंग्याच्या दरम्यान असलेल्या शाहू नगरातील कमला नगरमध्ये ही घटना घडली. धारावीच्या मुबारक हॉटेलच्या बाजूलाच कमला नगर आहे. दुपारी 12.28च्या सुमारास एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन फायर इंजिन आइणइ एका जेटीच्या सहाय्याने आग विझवली. त्यानंतर आगीत होरपळलेल्यांना तात्काळ बाहेर काढून त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
पाच जणांची प्रकृती चिंताजनक
एकूण 15 जणांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी 10 जण किरकोळ भाजले आहेत. तर 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. हे दोघे 50-60 टक्के भाजल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर डॉ. सायली यांनी सांगितलं.
तिघांचे चेहरे भाजले
या दुर्घटनेत दोन जण 50-60 टक्के होरपळले आहेत. तसेच तीन जणांचे चेहरे भाजले आहेत. यात एका आठ वर्षीय मुलाचाही समावेश आहे. गंभीर भाजलेल्या या पाचही जणांमध्ये 8 ते 58 वर्षीय व्यक्तींचा समावेश आहे.
स्थानिकांची धावपळ
गॅस सिलिंडरचा स्फोट होताच आजूबाजूच्या नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली. क्षणात आगीने पेट घेतला. त्यामुळे या घरातील आणि आजूबाजूच्या घरातील 15 जण या आगीत होरपळले गेले. त्यामुळे स्थानिकांचा एकच आक्रोश सुरू झाला. तसेच आग विझवण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी एकच धावपळ सुरू झाली. यावेळी काही लोकांनी आगीवर पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न सुरू असतानाच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ आग नियंत्रणात आणली. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात नेण्यता आले.
किरकोळ भाजलेल्यांची यादी
1) राजकुमार जैस्वाल (45) 2) अबिना बीबी शेख (27) 3) गुलफान अली (29) 4) अलिना अन्सारी (5) 5) मोहम्मद अब्दुल्ला (21) 6) अस्मा बानो (18) 7) फिरोज अहमद (35) 8) फैय्याज अन्सारी (16) 9) प्रमोद यादव (37) 10) अत्ताजाम अन्सारी (4)
गंभीर जखमी
11) सतारादेवी जैस्वाल (वय 40) – 50-60% प्रकृती गंभीर
12) शौकत अली (वय 58) – 50-60% भाजले, प्रकृती गंभीर
13) सोनू जैस्वाल (वय 08) चेहरा भाजला, प्रकृती गंभीर
14) अंजून गौतम (वय 28) चेहरा भाजला, प्रकृती गंभीर
15) प्रेम जैस्वाल (वय 32) चेहरा भाजला, प्रकृती गंभीर (15 injured in cylinder blast in dharavi 5 critical)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 29 August 2021 https://t.co/p1tCobauIS #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 29, 2021
संबंधित बातम्या:
धारावीत सिलिंडरचा स्फोट, 14 जण होरपळले; दोघांची प्रकृती चिंताजनक
दोन्ही मुली झाल्याने पतीचा संताप, पुण्यात महिलेला नग्न करुन भोंदूबाबाचा अंगारा फासला
बिझनेससाठी पाच लाख आणण्याचा तगादा, पत्नी माहेरी जाताच मुख्याध्यापकाने थाटला दुसरा संसार
(15 injured in cylinder blast in dharavi 5 critical)