AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या स्थानकातील प्रवासी सुधारणा तुम्हीच करा, मध्य रेल्वेच्या 15 स्थानकांचा प्रवाशांच्या सूचनांनूसार विकास होणार

प्रवाशांसाठी सेवा आणि सुविधेत वाढ करण्यासाठी स्टेक होल्डरकडून सूचना मागविण्यात येणार आहे. प्रवासी, रेल युजर, प्रवासी संघटना अशा विविध घटकांकडून स्थानकात सुधारणा करण्यासाठी सूचना मागविल्या होत्या.

तुमच्या स्थानकातील प्रवासी सुधारणा तुम्हीच करा, मध्य रेल्वेच्या 15 स्थानकांचा प्रवाशांच्या सूचनांनूसार विकास होणार
ESCALATOR Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 04, 2023 | 9:39 PM

मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : मध्य रेल्वेच्या पंधरा रेल्वे स्थानकांचा रेल्वे मंत्रालयाच्या अमृतभारत स्टेशन योजनेंतर्गत या पंधरा स्थानकांतील सुविधा वाढविण्यासाठी पुनर्विकास केला जाणार आहे. यासाठी येत्या 15 ऑगस्टपर्यंत प्रवासी सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी सल्ला मागविण्यात येत आहे. खालील पंधरा स्थानकांसाठी ईमेल आयडी किंवा ट्वीटरवर हॅश टॅग @drmmumbaicr वर सूचना मागविण्यात आल्या आहेत.

भारतीय रेल्वेवर दररोज 14000 मेल-एक्सप्रेस धावत असून 2.25 कोटी प्रवासी दररोज प्रवास करीत असतात. देशभरात 7,500 रेल्वे स्थानकातून रेल्वे प्रवाशांना सेवा देत आहे. आता रेल्वेने अमृत भारत स्थानक योजनेद्वारे महत्वाच्या स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. तसेच 76 रेल्वे स्थानकातील प्रवासी सुविधांमध्ये देखील वाढ करण्यात येत आहे.

नेमक्या कोणत्या सुविधा वाढविणार

– रेल्वे स्थानकात अतिरिक्त पादचारी पुलांची निर्मिती करणे

– आवश्यक तेथे लिफ्ट आणि सरकते जिन्यांची निर्मिती करणे

– सर्क्यूलेटींग एरिया आणि स्थानकातील गर्दीचे विभाजन करणे

– स्थानकातील वेंटीग हॉल आणि टॉयलेटची गुणवत्ता वाढविणे

– स्थानकातील प्रकाश व्यवस्था दुरुस्त करणे

– स्टेशनातील फलक, टेनचे इंडीकेटर्स, कोचचे इंडीकेटर्सची गुणवत्ता वाढविणे

– स्थानकातील पार्किंगची व्यवस्थेत वाढ करणे

– प्लॅटफॉर्ममधील छप्परांची दुरुस्ती आणि वाढ करणे

प्रवाशांसाठी सेवा आणि सुविधेत वाढ करण्यासाठी स्टेक होल्डरकडून सूचना मागविण्यात येणार आहे. प्रवासी, रेल युजर, प्रवासी संघटना अशा विविध घटकांकडून स्थानकात सुधारणा करण्यासाठी सूचना मागविल्या होत्या. अमृत भारत स्टेशन स्किम अंतर्गत या स्थानकांचा विकास केला जाणार आहे.

या पंधरा रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास 

भायखळा – #AmritBharat_Byculla

चिंचपोकळी – #AmritBharat_Chinchpokli

परळ – #AmritBharat_parel

माटुंगा – #AmritBharat_Mantunga

कुर्ला – #AmritBharat_kurla

विद्याविहार – #AmritBharat_vidyavihar

विक्रोळी – #AmritBharat_vikhroli

कांजूरमार्ग – #AmritBharat_kanjurmarg

मुंब्रा – #AmritBharat_mumbra

दिवा – #AmritBharat_diva

शहाड – #AmritBharat_shahad

टिटवाळा – #AmritBharat_titwala

इगतपूरी – #AmritBharat_iagatpuriroad

वडाळा रोड – #AmritBharat_wadalaroad

सॅंडहर्स्ट रोड – #AmritBharat_sandhurstroad

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.