150 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार अडचणीत येणार?

महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर तब्बल 150 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. अब्दुल सत्तार यांच्यावर नुकतंच कृषी बिभागाने अकोल्यात टाकलेल्या धाडीवरुन टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर तब्बल 150 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे.

150 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार अडचणीत येणार?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 15, 2023 | 5:46 PM

मुंबई : ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आणखी एका घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. कृषी उद्योग विकास महामंडळात 150 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. कीटकनाशक खरेदीच्या टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप ‘सामना’तून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अब्दुल सत्तार यांच्यावर नुकतंच अकोल्यातील कृषी विभागाने टाकलेल्या धाडीवरुन टीका करण्यात येत होती. ज्या पथकाने बनावट खत असल्याचा आरोप केला होता त्या पथकात खाजगी लोकांचा समावेश असल्याचादेखील आरोप करण्यात आला होता. तसेच या पथकाकडून पैशांची मागणी करण्यात आली होती, असा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणावर पडदा पडत नाही तोच आता ‘सामना’तून सत्तार यांच्यावर 150 कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप करण्यात आला आहे.

नेमका आरोप काय?

कृषी उद्योग विकास महामंडळात 150 कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती मिळतेय. ऑरगॅनिक कीटकनाशक खरेदीसाठी काढलेल्या टेंडरमध्ये 150 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय. एकच संचालक असलेल्या दोन संस्था मॅनेज करुन टेंडर दिल्याचा आरोप ‘सामना’तून करण्यात आलाय.

के. बी. बायो ऑरगॅनिक प्रा. ली आणि न्यूएज एॅग्रो एनोव्हेशन कंपन्यांकडून घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय. दोन्ही कंपन्यांचा संचालक एकच असून संबंधित व्यक्ती अब्दुल सत्तार यांच्या जवळचा असल्याची माहिती आहे, असं ‘सामना’त म्हटलं आहे. अटी आणि शर्थीचा भंग करुन मर्जीतील कंपनीला टेंडर दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अंबादास दानवे यांची अब्दुल सत्तारांवर टीका

दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे. “कृषी खात्याचे मंत्री आणि अधिकारी दलालीचं काम करत आहेत. महाराष्ट्रात कृषी विभाग भ्रष्टाचाराचा मोठा अड्डा बनलेला आहे. शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या या खात्यात आज फक्त भ्रष्टाचार आणि दलाली केली जात आहे. काही अधिकारी सुद्धा या खात्यात एजंटगिरीचं काम करतात. मी अतिशय जबाबदारीने बोलतोय”, असं अंबादास दानवे म्हणाले.

“एक बट्टळ नावाचा खाजगी व्यक्ती असतो. त्याच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून सगळे अकोल्याचे लोक मागणी करत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अब्दुल सत्तार यांच्या भ्रष्टाचाराला किंवा या वृत्तीला पाठिंबा आहे का? हा माझा प्रश्न आहे”, असं दानवे म्हणाले.

अब्दुल सत्तार काय म्हणाले?

दरम्यान, या आरोपांवर अब्दुल सत्तार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “दीडशे कोटींच्या घोटाळ्याचा आरोप खोटा आहे. तसं कोणतंही टेंडर झालेलं नाही. एकाच कंत्राटदाराला टेंडर दिलेलं नाही”, असं अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलं आहे.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.