Bhabha Cyclothon : 1700 किमी सायक्लोथॉनचा मुंबईत समारोप, अणूऊर्जेबाबत जागरुकता, 5 राज्यांत जनजागृती
अणूऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांनी 11 दिवस दिल्लीतील इंडिया गेट ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडियापर्यंत सायकल चालविली.
मुंबई : भाभा अणूऊर्जा संशोधन केंद्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 13 ऑगस्टला नवी दिल्लीतील इंडिया गेट (India Gate) येथून सायक्लोथॉनला सुरुवात केली. 1700 किलोमीटरचे अंतर सायकलिंग करून पार केले. हे अभियान स्वच्छ, हिरवे आणि अणूऊर्जेच्या संशोधनाबाबत जागरुकता पसरविण्यासाठी होतं. दिल्ली, राजस्थान (Rajasthan), मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातून ही सायकल रॅली आली. 23 ऑगस्ट रोजी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) येथे या रॅलीचा समारोप झाला. रस्त्यात सायकल चालकांनी लोकांसोबत चर्चा केली. अणूऊर्जेच्या उपयोगाबाबत जागरुकता पसरविली. पोलीस तसेच रुग्णालयासह काही संघटनांसोबतही चर्चा केली. अणूऊर्जा विभागाकडून करण्यात येणाऱ्या सामाजिक आणि आरोग्य विषयक बाबींची माहिती दिली.
सायक्लोथॉन टीमचे कौतुक
अणूऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांनी 11 दिवस दिल्लीतील इंडिया गेट ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडियापर्यंत सायकल चालविली. चेन रिअॅक्शन हा शब्द अणू आणि सायकलिंग दोन्ही संदर्भात वापरण्यात आला. अभियानातील लोकांनी स्वच्छ, हिरव्या अणूऊर्जेचा संदेश पोहचविला. आझादीचा अमृत महोत्सवाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्राचे निदेशक डॉ. ए. के. मोहंती यांनी सायक्लोथॉन टीमचे कौतुक केले.
अभियानाला चेन रिअॅक्शनचं नाव
दिल्ली ते मुंबई सायक्लोथॉनचा समारोप 23 ऑगस्ट रोजी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे झाला. 13 ऑगस्ट रोजी प्रतिष्ठित इंडिया गेट नवी दिल्ली येथून झेंडी दाखवून रॅली रवाना करण्यात आली. सायक्लोथॉनमध्ये भाभा अणूऊर्जा संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक सहभागी होते. रस्त्यातील लोकांना अणूऊर्जेबाबत जागरुकता पसरविण्यात आली. या अभियानाला चेन रिअॅक्शनचं नाव देण्यात आलं. अभियान विशेषतः विद्यार्थी, युवक यांच्यामध्ये पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. सायकल चालविण्यासारखं अणूऊर्जा, सर्वात स्वच्छ, हिरवे आणि सुरक्षित आहे. सुदृढ राहा, हसा आणि अणू ऊर्जेचा संदेश लोकांपर्यंत पोहचवा, असा संदेश देण्यात आला. चंदन डे, डॉ. राजेश कुमार, सुशील तिवारी, विनय कुमार मिश्रा, विमल कुमार, नितीन कावडे, जीत पाल सिंह या अधिकाऱ्यांनी अभियानात सहभाग घेतला होता.