Mumbai Rain News : चेंबूरच्या वाशीनाका परिसरात दरड कोसळली, मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता
मुंबईसह महाराष्ट्रात पावसाळ्यात अशा घडत असतात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी अशा भागातल्या दरडी काढून घेतल्या जातात. तसेच नागरिकांना सतर्क केले जाते.
मुंबई – उकाड्याने हैरान झालेल्या मुंबईकरांना (Mumbai) सकाळी पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला. परंतु चेंबूर (Chembur) येथील वाशीनाका (Vashinaka) परिसरात आज सकाळी एक दगड कोसळ्याची घटना घडली आहे. वाशीनाक्यातील न्यू भारत नगर भागात असलेल्या झोपडपट्टीवर दरड कोसळ्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अचानक दरड कोसलळ्याने घरातील दोन भाऊ जखमी झाले आहेत. त्यांना सायन उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती अग्नीशमक दलाकडून मिळाली आहे.
पंधरा दिवसापुर्वी लोकांना अलर्ट केले होते
दोन्ही जखमींना तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. काहीवेळाने त्यापैकी एकाला उपचारानंतर घरी सोडण्यात आले, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. सुमारे पंधरवड्यापूर्वी, गेल्या वर्षी पावसाळ्यात अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी परिसरातील रहिवाशांना सावध केले होते. मुंबईसह महाराष्ट्रात पावसाळ्यात अशा घडत असतात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी अशा भागातल्या दरडी काढून घेतल्या जातात. तसेच नागरिकांना सतर्क केले जाते.
मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता
मुंबईत येत्या दोन ते तीन दिवस पावसाचाअंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईत सगळीकडे जोरदार पाऊस सुरू आहे. तसेच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे. मुंबईकरांनी काळजी घ्यावी असं प्रशासनाचं आवाहन केलं आहे. मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, अंधेरी आणि वांद्रे भागात सकाळपासून काळ्या ढगांसह पाऊस पडत आहे.
अद्याप कुठेही पाणी साचलेलं नाही. आज रविवार असल्याने अनेकजण पावसाची मज्जा घेताना दिसत आहे.