रविवारी 24 तासांचा मेगा ब्लॉक, ठाणे-दिवा मार्गावरील वाहतुकीवर होणार परिणाम, अनेक लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द

मध्य रेल्वेकडून ठाणे-दिवा मार्गावर पुन्हा एकदा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सध्या या मार्गावर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम सुरू आहे, यासाठी रविवारी तब्बल 24 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

रविवारी 24 तासांचा मेगा ब्लॉक, ठाणे-दिवा मार्गावरील वाहतुकीवर होणार परिणाम, अनेक लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द
Mumbai local
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 8:43 AM

मुंबई : मध्य रेल्वेकडून ठाणे-दिवा मार्गावर पुन्हा एकदा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सध्या या मार्गावर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम सुरू आहे. यासाठी रविवारी तब्बल 24 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी मध्यरात्री दोन ते सोमवारी मध्यरात्री दोनपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे वाहतुकीवर परिणाम होऊन, प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. मेगा ब्लॉक दरम्यान प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. ब्लॉकमुळे अनेक गाड्यांच्या वेळेमध्ये देखील बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘या’ गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

मध्य रेल्वेने घेतलेल्या या ब्लॉकचा लोकल सेवेवर मोठा परिणाम होणार आहे. एक जानेवारीला रात्री 11 : 43 पासून ते दोन जानेवारीला रात्री 11 : 43 पर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या कल्याणहून सुटणाऱ्या अप आणि जलद गाड्या कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या गाड्या ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकावर थाबंबणार नाहीत. पुढे मुलंड स्थानकावर अप धीम्याा मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. त्यामुळे या सर्व लोकल नियोजित वेळेपेक्षा दहा मिनिटे उशीराने पोहोचतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघणाऱ्या डाऊन धीम्या, अर्ध जलद सेवा मुलुंडहून 2 जानेवारी रोजी 5.05 पासून ते 3 जानेवारी मध्यरात्री 1.15 पर्यंत मुलुंड व कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर धावतील. या लोकल कळवा, मुंब्रा, कोपर व ठाकुर्ली स्थानकावर थांबणार नाहीत.

‘या’ लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द

दरम्यान या मेगा ब्लॉकदरम्यान काही लांब पल्ल्याच्या गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये अमरावती -मुंबई एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस, मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेस, मुंबईजआदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस, डेक्कन क्विन, मुंबई-अमरावती एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, मुंबई -नांदेड राजधानी एक्सप्रेस या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या

Bank Robbery | मुंबईतील SBI बँक शाखेत दरोडा आणि हत्या, दोघा आरोपींना काही तासात अटक

Dr. Deepak Sawant | दोन्ही डोस घेऊनही दुसऱ्यांदा लागण! डॉ. दीपक सावंत कोविड पॉझिव्हट, रुग्णालयात दाखल

Corona : मुंबई पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने? 9 दिवसातली रुग्णवाढ नाकी नऊ आणणारी

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.