Mumbai Rain : कुठे भिंत तर कुठे दरड कोसळली, गेल्या 24 तासांत मुंबईत 33 जणांचा मृत्यू

शनिवारी दुपार पासून सुरु झालेल्या पावसाने मुंबईत कहर केलाय. थोडीशी उसंत घेऊन पाऊस पुन्हा जोरदार बरसतोय. मुंबईत पडत असलेल्या या बेभान पावसाने मागील 24 तासांत 33 जणांचे प्राण गेले आहेत.

Mumbai Rain : कुठे भिंत तर कुठे दरड कोसळली, गेल्या 24 तासांत मुंबईत 33 जणांचा मृत्यू
मुंबईत पावसाचा हाहाकार, मागच्या 24 तासांत पावसाचे 33 बळी
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 2:10 PM

मुंबई : शनिवारी दुपार पासून सुरु झालेल्या पावसाने मुंबईत कहर केलाय. थोडीशी उसंत घेऊन पाऊस पुन्हा जोरदार बरसतोय. मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय. मुंबईत पडत असलेल्या या बेभान पावसाने मागील 24 तासांत 33 जणांचे प्राण गेले आहेत.

चेंबूर, विक्रोळी, भांडूपसह मुंबईतील बऱ्याच ठिकाणी पावसामुळे छोट्या-मोठ्या दुर्घटना घडल्या. या दुर्घटनेत गेल्या 24 तासांत तब्बल 33 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने असं वृत्त दिलं आहे. मुंबईतील चेंबूर वाशी नाका परिसरातील भारतनगर बी ए आर सी संरक्षण भिंत कोसळली. या घटनेत 21 जणांचे प्राण गेले आहेत तर विक्रोळीमध्ये दरड कोसळून दहा आणि भांडुपमध्ये एक जण मृत्यूमुखी पडल्याचं समोर आलंय.

चेंबूर दुर्घटनेत 21 जणांचे प्राण गेले

मुंबईतील चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील भारत नगर बी ए आर सी संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या भिंतीलगत असणाऱ्या काही झोपड्यांवर ही भिंत कोसळली. तर दुसरीकडे एकूण तीन घरांवर झाड आणि संरक्षक भिंत पडून घरांचे नुकसान झाले आहे. यात अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. रविवारी सकाळी सातच्या सुमारास दुर्घटना घडली आहे. यात आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. एका महिलेचाही यामध्ये समावेश आहे.

विक्रोळीत 10 जणांचा मृत्यू, भांडुपमध्येही दुर्घटना

तर दुसरीकडे विक्रोळी पश्चिम भागातील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील पंचशील चाळीतील सूर्या नगर परिसरात मोठी दुर्घटना घडली. शनिवारी मध्यरात्री दोन वाजून 40 मिनिटांच्या सुमारास पाच ते सहा घरांवर दरड कोसळली. सध्या बळींचा आकडा 10 वर पोहोचला आहे. तसेच भांडुप परिसरात वनविभागाची भिंत कोसळली आहे. यात 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत

मुंबईत मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शोक व्यक्त केला. मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर मोफत उपचार केले जातील, असं त्यांनी जाहीर केलं.

कुठेही दुर्घटना घडल्यास त्वरित बचाव कार्य झालं पाहिजे

मुंबईत शनिवारपासून पाऊस सुरु असून मुख्यमंत्री स्वत: पालिकेच्या नियंत्रण कक्षाकडून सातत्याने माहिती घेत आहेत. आजही पाउस सुरूच राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्याने सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे व कुठेही दुर्घटना घडल्यास त्वरित बचाव कार्य सुरु ठेवावे व मदत पोहचवावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

…त्यांना प्रसंगी स्थलांतरित करावे

मुंबईतील मिठी नदी व इतर मोठ्या नाल्यांलगत पाणी वाढल्यास आसपास राहणाऱ्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास होऊ शकतो हे पाहून त्यांना प्रसंगी स्थलांतरित करावे. कोविड संसर्ग लक्षात घेऊन जम्बो केंद्रामधील रुग्ण तसेच इतर साधन सामुग्री यांची काळजी घ्यावी व सावध राहण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी पालिकेस सांगितले आहे.

(33 killed in rain-related incidents in mumbai last 24 hours)

हे ही वाचा :

Mumbai Rains Live Updates | उल्हास नदीला पूर, चौपाटी पूर्णपणे पाण्याखाली, बदलापूर शहरात पूरस्थितीची भीती, तर बोरिवलीत संजय गांधी नॅशनल पार्कमधील नदीला पूर

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.