तृतीयपंथी, बांधकाम कामगार, देहविक्रय करणाऱ्या महिला, एचआयव्ही रुग्णांसाठी मुंबईत 4 फिरती लसीकरण केंद्र

कोव्हिड - 19 प्रतिबंधक लस घेण्याची इच्छा असूनही, काही अपरिहार्य कारणांनी लसीकरण केंद्रांपर्यंत येऊ न शकणाऱ्या, पर्यायाने दुर्लक्षित राहणाऱ्या समाजघटकांचे लसीकरण करण्यासाठी मुंबई मनपाने पुढाकार घेतला आहे.

तृतीयपंथी, बांधकाम कामगार, देहविक्रय करणाऱ्या महिला, एचआयव्ही रुग्णांसाठी मुंबईत 4 फिरती लसीकरण केंद्र
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 5:08 PM

मुंबई : कोव्हिड – 19 प्रतिबंधक लस घेण्याची इच्छा असूनही, काही अपरिहार्य कारणांनी लसीकरण केंद्रांपर्यंत येऊ न शकणाऱ्या, पर्यायाने दुर्लक्षित राहणाऱ्या समाजघटकांचे लसीकरण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि व्हॅक्सिन ऑन व्हिल्स्, अमेरिकन इंडिया फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 4 फिरते लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या हस्ते झेंडा दाखवून या उपक्रमाचा आज (9 ऑगस्ट) शुभारंभ करण्यात आला आहे. (4 mobile vaccination centers for Transgenders, construction workers, prostitutes and HIV patients in Mumbai)

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज या उपक्रमाचा शुभारंभ करताना उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, व्हॅक्सीन ऑन व्हिल्स फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिग्नेश पटेल, उपक्रम व्यवस्थापक संगीता मोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

कोव्हिड – 19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी उपाय आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त नागरिकांचे जलद गतीने लसीकरण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने निरनिराळे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांव्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राइव्ह इन लसीकरण, अंथरुणास खिळलेल्या नागरिकांचे त्यांच्या घरी जाऊन लसीकरण, गर्भवती महिलांचे लसीकरण असे वेगवेगळे उपक्रम हाती घेतल्यानंतर आता त्यापुढे जाऊन फिरते लसीकरण केंद्र (मोबाईल व्हॅक्सिनेशन युनिट) सुरु करण्यात आले आहेत.

यासाठी व्हॅक्सिन ऑन व्हिल्स आणि अमेरिकन इंडिया फाऊंडेशन यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेसमवेत भागीदारी केली आहे. इच्छा असूनही काही अपरिहार्य कारणांनी लसीकरण केंद्रावर येऊन लस घेऊ न शकणाऱ्या तसेच कोव्हिड संसर्गाची बाधा होण्याचा धोका असलेल्या दुर्लक्षित घटकांपर्यंत जाऊन त्यांचे लसीकरण करण्याचा उपक्रम या भागीदारीतून हाती घेण्यात आला आहे. यामध्ये एचआयव्ही रुग्ण, नाईलाने देह विक्रय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या महिला, तृतीयपंथी, बांधकाम कामगार, स्थलांतरित कामगार, रस्त्यावरील विक्रेते अशा विविध समाज घटकांपर्यंत पोहोचून, लसीकरणासाठी त्यांना आवश्यक असलेले सर्व निकष पूर्ण करुन विनामूल्य लस देण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रशासकीय विभागनिहाय अशा घटकांची यादी तयार केली आहे. त्यासाठी मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था, पदपथावरील विक्रेत्यांची राष्ट्रीय संघटना तसेच इतर संबंधित बिगर शासकीय संस्थांची मदत घेण्यात आली आहे.

या समाज घटकांच्या कोव्हिड प्रतिबंधक लसीकरणासाठी प्रारंभी एकूण 4 फिरते लसीकरण केंद्र (मोबाईल व्हॅक्सिनेशन युनिट) सुरु करण्यात आले आहेत. प्रत्येक फिरत्या केंद्रामध्ये 1 प्रशिक्षित डॉक्टर, 2 परिचारिका, 2 वैद्यकीय सहाय्यक, रुग्णवाहिका चालक उपलब्ध राहणार आहेत. त्यांना लॅपटॉप आणि वायफाय इंटरनेट सुविधा पुरविली जाणार आहे, जेणेकरुन कोव्हिन संकेतस्थळावर नोंदणी करुन लसीकरणाची पुढील कार्यवाही करता येईल. आवश्यकतेनुसार अशा फिरत्या केंद्रांची संख्या देखील वाढविण्यात येणार आहे.

आज पहिल्या दिवशी महात्मा जोतिराव फुले मंडई परिसरातील पदपथावरील 50 विक्रेते आणि देह विक्रय करणाऱ्या 25 महिला यांचे लसीकरण करण्यात येत आहे. या लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यासाठी संबंधित मनुष्यबळाला प्रशिक्षण देखील दिले जात आहे. वेगवेगळ्या प्रशासकीय विभागांमध्ये, संबंधित समाज घटकांच्या परिसरात महानगरपालिकेने नेमून दिलेल्या जागी फिरते लसीकरण केंद्र पोहोचेल. दिनांक 12 ऑगस्ट 2021 पासून यारितीने लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये पदपथावरील विक्रेत्यांसाठी बोरिवली भागात पहिले लसीकरण केंद्र तर मालवणी, मालाड, भांडुपमध्ये दुसरे केंद्र कार्यान्वित राहील. देहविक्रय करणाऱ्या महिलांचे लसीकरण करण्यासाठी भांडुप-मुलुंडमध्ये तिसरे केंद्र तर ग्रँटरोड आणि कामाठीपुरा भागात चौथे केंद्र कार्यान्वित होईल.

अमेरिकन इंडिया फाऊंडेशनसह पदपथ विक्रेत्यांची राष्ट्रीय संघटना, वाय. आर. गायतोंडे सेंटर फॉर एड्स रिसर्च अँण्ड एज्युकेशन यांचादेखील या उपक्रमात सहभाग व योगदान आहे.

इतर बातम्या

VIDEO: शिवसेना-भाजपची युती होणार की नाही? शिवसेना खासदारानं इनसाईड स्टोरी जगजाहीर केली, बघा काय म्हणाले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘या’ निर्णयाचं मनसेकडून पहिल्यांदाच जाहीर स्वागत; काय आहे मनसेचं ट्विट?

पेगाससद्वारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा, लोकशाही वाचवण्यासाठी देश एकवटल्याशिवाय राहणार नाही: जयंत पाटील

(4 mobile vaccination centers for Transgenders, construction workers, prostitutes and HIV patients in Mumbai)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.