पश्चिम रेल्वेच्या खार आणि गोरेगाव दरम्यान 9 किमी रेल्वे मार्गाचा होणार विस्तार
एमएमआरडीएने विलेपार्ले येथील प्रकल्पबाधितांना शुक्रवारी मालाड येथे पर्यायी जागा दिली आहे. त्यामुळे खार आणि गोरेगाव दरम्यान 6 व्या मार्गिकेचे काम सुरु होणार, त्याचा प्रवाशांना होणार फायदा आहे.
मुंबई | 13 ऑगस्ट 2012 : पश्चिम रेल्वेच्या खार आणि गोरेगाव दरम्यानच्या नऊ किमी रेल्वेमार्गाचा विस्तार करण्याआड येत असलेल्या तीन प्रकल्पग्रस्थ कुटुंबियांना स्थलांतर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विलेपार्ले येथील या रहिवाशांचे मालाड येथे पर्यायी घरे देण्यात आली आहेत. तब्बल आठ वर्षांनी एमएमआरडीए येथील रहीवाशांना पर्यायी घरे दिल्याने या सहाव्या मार्गिकेचे काम लवकरच सुरु होणार असून पश्चिम रेल्वेचा फायदा होणार आहे.
मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प ( एमयूटीपी ) – 2 मुंबई सेंट्रल ते बोरीवली पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम गेली अनेक वर्षे सुरु आहे. आता खार ते गोरेगाव या 9 किमी मार्गिकेच्या आड येणाऱ्या प्रकल्पगस्तांना पर्यायी घरे दिली आहेत. दुसऱ्या टप्प्यात 11 किमीपर्यंतचे बोरीवलीपर्यंतच्या मार्गिकेचे काम साल 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. मात्र खार आणि मुंबई सेंट्रलपर्यंतच्या 10.8 किमीपर्यंतच्या मार्गिकेचे भवितव्य अद्यापही अधांतरीच आहे.
एमएमआरडीएने केले पुनर्वसन
एमएमआरडीएने विलेपार्ले येथील प्रकल्पबाधितांना शुक्रवारी मालाड येथे पर्यायी जागा दिली आहे. तसेच विलेपार्ले येथील एका 9.5 चौरस मीटर जागेचा 2.3 कोटीचा मोबदला जमीनमालकाला देण्यात आला आहे. येथील जागा मोकळी झाल्याने रेल्वे ट्रॅक टाकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
माहीम आणि सांताक्रुझ दरम्यानचे काम रखडले
पश्चिम रेल्वेची बोरीवली ते सांताक्रुझ पाचवी मार्गिका 2002 मध्येच पूर्ण करण्यात आली आहे. तर मुंबई सेंट्रल ते माहीम ही मार्गिका 1993 मध्ये पूर्ण झाली आहे. परंतू माहीम आणि सांताक्रुझ दरम्यानचे काम जागेच्या संपादनाअभावी रखडले आहे.
लांबपल्ल्याच्या गाड्यांना स्वतंत्र मार्गिका मिळण्यासाठी मुंबई सेंट्रल आणि बोरीवली असा 30 किमीचा मार्ग बांधण्याचे काम सुरु आहे. एमयूटीपी -2 अंतर्गत 918 कोटी रुपयांचा प्रकल्प गेली अनेक वर्षे रखडला आहे. खार आणि बोरीवलीपर्यंत सहावी मार्गिका टाकण्याचे काम पूर्ण झाले तर पश्चिम रेल्वेवर जागा उपनगरीय लोकलची सोडल्याने प्रवासी वाहतूकीची क्षमता 20 टक्क्याने वाढेल.
खर्च 8,087 कोटी पर्यंत वाढला
एमयूटीपी – 2 मधील सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प हा सर्वात जास्त रखडलेला प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा मूळ खर्च 5,300 कोटी रुपयांचा असून त्यांची किंमत आता 8,087 कोटी पर्यंत वाढली आहे. एमयूटीपी – 2 प्रकल्पात मध्य रेल्वेच्या कुर्ला ते सीएसएमटी पाचवी ते सहावी मार्गिकेचे कामही जागे अभावी प्रचंड रखडले आहे.