मुंबई : एका शिवभक्ताच्या (Shiva Bhakta) गाडीत शिवाजी महाराजांची मूर्ती होती. तो शिवभक्त आंध्र प्रदेशातील तिरुमाला तिरुपतीच्या दर्शनाला जात होता. शिवाजी महाराजांची मूर्ती असल्यानं गाडीला अडविण्यात आलंय. एका व्यक्तीनं अशाप्रकारचा व्हिडीओ फेसबूकला शेअर केला. महाजारांची मूर्ती असल्यानं चेकपोस्टवर अडविण्यात आल्याचा दावा शिवभक्तानं केलाय. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांना यासंदर्भात मुंबईत विचारणा करण्यात आली. त्यावेळी अजित पवार चांगलेच भडकलेत. यासंदर्भात अजित पवार म्हणाले, मिलिंद नार्वेकर हे तिरुपती देवस्थानच्या (Tirupati Devasthan) विश्वस्त मंडळात आहेत. मी त्यांच्याशी बोललो. याबाबत नार्वेकर (Milind Narvekar) निवेदन देणार आहेत. या व्हिडीओमुळं जनतेत संभ्रम निर्माण झाला. शिवाजी महाराज हे या राज्याचे दैवत आहेत. अशा बातमी सोशल मीडियावर देणं चुकीचं असल्याचं पवार यांनी सांगितलं.
हा व्हिडीओ सुरेश पाटील नावाच्या व्यक्तीने 22 जूनला फेसबूकवर शेअर केला. व्हिडीओमध्ये पाटील म्हणतात, मी तिरुपतीहून तिरुमाला येथे जात होतो. नाक्यावर माझ्या गाडीची तपासणी झाली. त्यावेळी तपासणी करणाऱ्यांनी कारमधून शिवाजी महाराजांची मूर्ती काढण्यास सांगितलं. संबंधित अधिकाऱ्यांनी ही मूर्ती काढली नाही, तर तुम्हाला वर जाता येणार नसल्याचं सांगितलं. विनंती करूनही अधिकाऱ्यांनी नकार दिल्याचं पाटील म्हणतात.
तिरुपती संस्थानच्या वतीनं याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलंय. तिरुमाला येथे जाताना काही नियमावली आहे. त्याचं पालन केल्याचं त्यांचं म्हणण आहे. भाविकांनी त्यांच्या वाहनात मूर्ती, छायाचित्र, राजकीय पक्षाचे ध्वज घेऊन जाता येत नाही. मूर्तीपूजक प्रचार साहित्य तिरुमालाला नेण्यास मनाई आहे. नियमानुसार संबंधित व्यक्तीला सांगण्यात आलं. पण, त्या व्यक्तीनं याबाबत व्हिडीओ व्हायरल केला, असं संस्थानचं म्हणण आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी बोलून चर्चा केली पाहिजे. खरचं काय घडलं, हे लोकांसमोर आलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.