मुंबईकरांनो, ‘या’ वेळेत हॉर्न वाजवल्यास तुमच्यावर कारवाई होणार! कारण काय? जाणून घ्या
नो हॉर्न या मोहिमेला सर्वांनी सहकार्य करावे असेही पोलिसांकडून सांगितले जात आहे. दिवसेंदिवस ध्वनीप्रदूषणचा विषय गंभीर बनत चालला आहे. यामध्ये मुंबई पोलिसांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र काैतुक केले जात आहे. शनिवारी संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान कोणी जर हॉर्न वाजवताना दिसले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई : आपण पाहतो की, दिवसभराच्या कर्णकर्श हॉर्नमुळे (Horn) कान दुखायला लागतात. हॉर्नमुळे ध्वनीप्रदूषणही चांगलेच वाढले आहे. वाढलेल्या ध्वनीप्रदूषणचा त्रास लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत जवळपास सर्वांनाच होतो आहे. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी आता मुंबई वाहतूक पोलिसांनी (Police) महत्वाचे पाऊल टाकले आहे. मुंबईमध्ये आता शनिवारी संध्याकाळी दोन तास कोणालाही हॉर्न अजिबात वाजवायला जमणार नाहीये. यादरम्यान कोणी हॉर्न वाजवला तर त्याच्या कारवाई देखील केली जाणार असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगितले जात आहे. मुंबई (Mumbai) पोलिसांकडून संध्याकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये नो हॉर्न ही विशेष मोहिम राबवली जाणार आहे.
शनिवारी नो हॉर्न विशेष मोहिम
नो हॉर्न या मोहिमेला सर्वांनी सहकार्य करावे असेही पोलिसांकडून सांगितले जात आहे. दिवसेंदिवस ध्वनीप्रदूषणचा विषय गंभीर बनत चालला आहे. यामध्ये मुंबई पोलिसांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र काैतुक केले जात आहे. शनिवारी संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान कोणी जर हॉर्न वाजवताना दिसले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या मोहिमेसाठी पोलिसांकडून जोरदार तयारी केली जात आहे. शहरातील सर्वात जास्त हॉर्न होणारी ठिकाणे पोलिसांनी घेतली आहे. यामध्ये एकून शंभर ठिकाणे आहेत, ज्याठिकाणी पोलिस थांबणार आहेत.
कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता
या मोहिमेदरम्यान पोलिस फक्त हॉर्न वाजवणाऱ्यांवर कारवाईच करणार नसून याबद्दल जनजागृती देखील करणार आहेत. हॉर्न वाजवणाऱ्या व्यक्तीला हॉर्न वाजू नका, असे सुरूवातीला सांगण्यात येणार आहे. मात्र, तरीही एखादी व्यक्ती परत परत हॉर्न वाजवत असेल तर मग त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. वाहतूक पोलिसांकडून असे सांगण्यात आले आहे की, ही मोहिम फक्त शनिवारसाठीच नसून ही पुढेही सतत सुरू राहणार आहे, तसेच या नो हॉर्न मोहिमेला नागरिकांनी देखील सहकार्य करावे असे आवाहन केले जात आहे.