अखेर मुंबईतील मत्स्यालयाचा मार्ग मोकळा, दुग्धशाळा आरे वसाहतीमध्ये होणार स्थलांतरीत!

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या संकल्पनेतील जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभे करण्यासाठीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे वरळी (Worli) दुग्धशाळाची सुमारे 10 एकर जमीन मत्स्यालयासाठी नगरविकास विभागाला हस्तांतरित करण्याचा निर्णय जारी देखील करण्यात आला आहे.

अखेर मुंबईतील मत्स्यालयाचा मार्ग मोकळा, दुग्धशाळा आरे वसाहतीमध्ये होणार स्थलांतरीत!
वरळीमध्ये उभारणार जागतिक दर्जाचे मत्स्यालयImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 12:50 PM

मुंबई : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या संकल्पनेतील जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभे करण्यासाठीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे वरळी (Worli) दुग्धशाळाची सुमारे 10 एकर जमीन मत्स्यालयासाठी नगरविकास विभागाला हस्तांतरित करण्याचा निर्णय जारी देखील करण्यात आला असून दुग्धशाळा (Dairy) आता आरे वसाहतीमध्ये स्थलांतरीत केली जाणार आहे. वरळी डेअरी सुमारे 14 एकरमध्ये पसरलेली आहे. आता दुग्धशाळेच्या जागेवर बहुचर्चित जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभे केले जाणार आहे.

नगरविकास विभागाला देणार जागा

वरळीमधील दुग्धशाळा सुमारे 14 एकरमध्ये पसरलेली आहे. तेथे 7  एकर जागेवर दुग्ध आयुक्त कार्यालय आहे. तसेच तीन कर्मचारी निवास आहेत. तर तिथे वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांचे देखील निवासस्थान आहेत. सप्टेंबर महिन्यामध्ये मुख्य सचिवांनी एका बैठकीत ही जागा राज्याच्या नगरविकास विभागाला देण्याचा निर्णय घेतला. दुग्धव्यवसाय विभाग ही जमीन महसूल विभागाकडे सुपूर्द करेल आणि त्यांच्याकडून नगरविकास विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

दुग्धशाळा आरे वसाहतीमध्ये होणार स्थलांतरीत

दुग्धशाळा ही आरे वसाहतीमध्ये स्थलांतरित केली जाईल. पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्यासाठी मुंबईमध्ये बँकॉक येथील सिअ‍ॅम ओशन वर्ल्डच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभे केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दुग्धशाळेची जमीन एकूण 14 एकर आहे. त्यापैकी 10 एकर जमीन ही मत्स्यालयासाठी वापरली जाणार आहे. उर्वरित जमीन ही दुग्धविभागाचे कार्यालय, निवासस्थाने आदींसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे.

संबंधित बातम्या : 

वीज कर्मचाऱ्यांच्या संपाची शक्यता, अत्यावश्यक सेवेत समावेश करत ठाकरे सरकारकडून मेस्मा लागू

तलवार दाखवल्यानंतर माझ्यावर गुन्हा, आता काँग्रेस नेत्यांवर तीच कारवाई करा, मोहीत कंबोज यांची मागणी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.