तेजसला काहीही झालं नाही, आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण, दोन सुरक्षारक्षकांना बाधा

आदित्य ठाकरेंनी उल्हासनगर शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक (Aaditya Thackeray on Tejas Thackeray Security Guards Corona) घेतली.

तेजसला काहीही झालं नाही, आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण, दोन सुरक्षारक्षकांना बाधा
Follow us
| Updated on: Jul 20, 2020 | 8:08 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर कोरोनाने धडक (Aaditya Thackeray on Tejas Thackeray Security Guards Corona) दिली आहे. उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे यांच्या दोन सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. तेजस ठाकरे यांच्या सुरक्षरक्षकांना कोरोना झाल्याचे समजताच अनेक उलटसुलट चर्चा सुरु होत्या. या चर्चांवर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरातील कोरोनासंदर्भात आढावा बैठक घेतली. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी “तेजस यांना काहीच झालेले नाही,” असे सांगितले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

तसेच “मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख हे ही दहा दिवसात बरे होऊन पुन्हा कामाला सुरुवात करतील,” असा विश्वासही आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.

दरम्यान आदित्य ठाकरेंनी उल्हासनगर शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. या बैठकीला पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, महापौर,आयुक्तासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी उल्हासनगरमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी धारावी आणि वरळी पॅटर्न राबविला जाऊ शकतो का याबाबतची चर्चा (Aaditya Thackeray on Tejas Thackeray Security Guards Corona) केली.

तेजस ठाकरे यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते. तेजस ठाकरे यांच्यासह तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांची प्रकृती काही दिवसांपूर्वी बिघडली होती. त्यानंतर त्यांची चाचणी केली असता दोघेही ‘कोरोना पॉझिटिव्ह’ आढळले आहेत.

तेजस ठाकरेंच्या इतर सुरक्षारक्षकांची तातडीने कोरोना चाचणी करण्यात आली आहे. इतर सुरक्षारक्षकांना तातडीने क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

तेजस ठाकरे काय करतात?

वडील उद्धव ठाकरे आणि मोठे बंधू-मंत्री आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणे तेजस ठाकरे अद्याप सक्रीय राजकारणात उतरलेले नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तेजस यांचे दर्शन घडले होते. आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने तेजस यांनी प्रचारात सहभाग घेतला (Aaditya Thackeray on Tejas Thackeray Security Guards Corona) होता.

संबंधित बातम्या : 

Aslam Shaikh Corona Positive | मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण

Tejas Thackeray | मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र तेजस ठाकरेंच्या दोन सुरक्षारक्षकांना कोरोना

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.