राजकारणात वातावरण बदल होतोय, काही विषाणुही येतायेत, आमच्यासाठी विषय संपला: आदित्य ठाकरे
राजकारणात वातावरण बदल होत आहे. काही विषाणुही परत येत आहेत, असा टोला लगावताच जे काही घडलं तो विषय आमच्यासाठी संपला आहे. (aaditya thackeray taunt narayan rane over chaos between shiv sena and bjp)
मुंबई: राजकारणात वातावरण बदल होत आहे. काही विषाणुही परत येत आहेत, असा टोला लगावताच जे काही घडलं तो विषय आमच्यासाठी संपला आहे. आम्ही जनतेसाठी काम करत राहू, असं विधान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. (aaditya thackeray taunt narayan rane over chaos between shiv sena and bjp)
मुंबईच्या पहिल्या वातावरण कृती आराखड्याचा शुभारंभ राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी आदित्य ठाकरे याांनी ही टीका केली. मुंबईत सातत्यानं वातावरण बदलाचे परिणाम बघायला मिळत आहेत. मुंबईतल्या वातावरण बदलाचा कृती आराखडा मुंबई महापालिकेकडून तयार केला जाणार आहे. या कृती आराखड्याबाबत नागरिकांच्या तसेच तज्ज्ञांच्या हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. या हरकती सूचना नोंदवण्यासाठी महापालिकेनं स्वतंत्र वेबसाईट तयार केली असून त्याचा शुभारंभ आज पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते करण्यात आला. हा कृती आराखडा डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच, राज्य सरकारच्या नवीन ईलेक्ट्रिक व्हेईकल धोरणानुसार महापालिकेनं आता वापरासाठी नवी विद्युत वाहनं खरेदी केली आहेत.
हरकती सूचना मागवल्या
वातावरण बदलतंय. गेल्या 10 वर्षात हा बदल होतोय. आपण अॅक्शन प्लान तयार करतोय. नोव्हेंबरपर्यंत सर्व जणांचे मतं आम्ही मागवत आहोत. हा प्लान फक्त मुंबईसाठी नाही तर राज्यासाठी असेल. वातावरण बदलतंय. विषाणू देखील बदलतात. जर कोरोना संख्या वाढली तर समस्या वाढेल. वातावरण जसं बदलत आहे तसं उत्तर देणं गरजेचं आहे. जनतेसाठी आता काम करत राहू, असं आदित्य म्हणाले.
आमच्यासाठी विषय संपला
माझी वसुंधरा अभियानाचा दुसरा भाग सुरु झालाय. एमएमआरडीए आणि बीएमसी मिळून हा कृती आराखडा तयार होतोय. बीएमसीनं आता इलेक्ट्रिक गाड्या घ्यायला सुरुवात केलीय, असं सांगतानाच राजकारणात वातावरण बदल होतोय आणि काही विषाणुही येतायेत. जे काही घडलं… आता आमच्यासाठी हा विषय संपला आहे, असं ते म्हणाले.
तर मुंबई शहर राहण्यासाठी अयोग्य ठरेल
आता हीच वेळ कृती करण्याची असून त्यात दिरंगाई झाली तर पुढील दशकभरात मुंबई शहर राहण्यासाठी अयोग्य ठरेल. ‘मुंबईच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी करतानाच वातावरण बदलांबाबतची कृती मुख्य प्रवाहात आणल्यामुळे शहरातील नैसर्गिक रचनेचे संरक्षण, संवदेनशील समूहाची सक्षमता वाढवणे आणि शहराची समृद्ध वाढ होणे शक्य होऊन शहरातील हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात प्रभावी घट करता येईल.’ असे ते म्हणाले. वातावरण बदलाचे आव्हान हाताळण्यासाठी व्यापक आणि सर्वसमावेशक असे धोरण तयार करणे हे या आराखड्याचे मुख्य उद्दीष्ट आहे. त्यासाठी वातावरण बदलाचे धोके कमी करणारे ठोस, प्रभावी आणि सर्वसमावेशक असे अनुकूल धोरण स्वीकारले जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. (aaditya thackeray taunt narayan rane over chaos between shiv sena and bjp)
VIDEO : 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 27 August 2021https://t.co/UO1rQexmHK#SuperFastNews100 #SuperFastNews #MarathiNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 27, 2021
संबंधित बातम्या:
‘राजीव तुम्हाला मिस करतेय’, काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रज्ञा सातव भावूक
बाहेर शिवसेना-राणेंमध्ये राडा, फडणवीस-मुख्यमंत्र्याची बंद दाराआड चर्चा; तर्कवितर्कांना उधाण
उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या असहिष्णुतेचे जनक, आशिष शेलार यांचा घणाघाती हल्ला
(aaditya thackeray taunt narayan rane over chaos between shiv sena and bjp)