‘आले रे आले मुंबई पोलीस…’, जनतेच्या सेवेसाठी कायम तत्पर असणाऱ्या पोलिसांवर खास गाणं, व्हिडीओ व्हायरल

Aale Re Aale Mumbai Police | 'खाकी रुप भिडते मनाल...', कडक उन्हात, मुसळधार पावसात आणि सणांमध्ये कायम आपले कार्य बजावत असलेल्या पोलिसांसाठी खास गाणं, सध्या सर्वत्र पोलिसांच्या कामावर तयार करण्यात आलेल्या गाण्याची चर्चा...

'आले रे आले मुंबई पोलीस...', जनतेच्या सेवेसाठी कायम तत्पर असणाऱ्या पोलिसांवर खास गाणं, व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Feb 24, 2024 | 10:50 AM

मुंबई | 24 फेब्रुवारी 2024 : गणपती, दसरा, दिवाळी, हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळ्यात कायम जनतेच्या सेवेसाठी पोलीस तत्पर असतात. पोलिसांमुळे होणाऱ्या अनेक घटना टळतात. देशात सर्वत्र मुंबई पोलिसांच्या कामाचं कौतुक होत असतं. पोलिसांना सुपरकॉप असं देखील म्हणतात. आता पोलिसांच्या कामाला सलाम ठोकण्यासाठी खास गाणं तयार करण्यात आलं आहे. पोलिसांच्या कामावर तयार करण्यात आलेलं गाणं इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पोलिसांवर तयार करण्यात आलेल्या गाण्याची चर्चा रंगली आहे.

पोलिसांवर तयार करण्यात आलेल्या गाण्याचे बोल ‘आले रे आले मुंबई पोलीस…’ असे आहेत. व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘आले रे आले मुंबई पोलीस आले… पीसी मयूर राणे यांनी त्यांच्या आवडीने आणि जिद्दीने गाणं तयार केलं आहे. हे गाणं शहराच्या संरक्षकांच्या शौर्याला आणि वचनबद्धतेला श्रद्धांजली आहे.’

हे सुद्धा वाचा

मयूर राणे पुढे म्हणाले, ‘गाणं ऐकल्यानंतर तुमत्या मनात देखील अभिमानाची भावना जागृत होईल. जी आमच्या मनात असते…’ सध्या सोशल मीडियावर आणि सर्वत्र फक्त आणि फक्त बोल ‘आले रे आले मुंबई पोलीस…’ गाण्याची चर्चा रंगली आहे. आतापर्यंत अनेकांनी ‘आले रे आले मुंबई पोलीस…’ गाणं पाहिलं आहे.

‘आले रे आले मुंबई पोलीस…’ गाण्याचा व्हिडीओ देखील सर्वांना आवडला आहे. व्हिडीओमध्ये विविध विभागातील पोलीस त्यांचं कर्तव्य बजावता दिसत आहेत. व्हिडीओ जवळपास 14 तासांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओला काही तासांतच 16,258 लाईक्स मिळाले आहेत.

व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत प्रेमाचा वर्षाव करत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘प्रचंड उत्तम काम. मुंबई पोलिसांमुळे मुंबईकर असल्याचा गर्व आहे…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘गाण्यातील प्रत्येक शब्द मुंबई पोलिसांच्या बाबतीत सर्वकाही परिभाषित करताना दिसत आहे.’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘गाणं ऐकून प्रचंड चांगलं वाटलं..’ नेटकऱ्यांना देखील मुंबई पोलिसांच्या कर्तव्यावर तयार करण्यात आलेलं गाणं आवडलं आहे.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....