AAP In Mumbai: गली गली मे शोर है, बीजेपीवाले चोर है, दरेकरांच्या राजीनाम्यासाठी ‘आप’नं मुंबई दणाणून सोडली

मुंबै बँकेत (Mumbai Bank case) दरेकरांनी घोटाळा केल्याचा आरोप करत आम आदमी पार्टी (AAP) दरेकरांविरोधात आक्रमक झाली आहे. त्यांनी दरेकरांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत त्यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले आहे.

AAP In Mumbai: गली गली मे शोर है, बीजेपीवाले चोर है, दरेकरांच्या राजीनाम्यासाठी 'आप'नं मुंबई दणाणून सोडली
प्रवीण दरेकारंच्या राजीनाम्यासाठी आप आक्रमकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 3:15 PM

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून सतत आरोप होत आहेत. मुंबै बँकेत (Mumbai Bank case) दरेकरांनी घोटाळा केल्याचा आरोप करत आम आदमी पार्टी (AAP) दरेकरांविरोधात आक्रमक झाली आहे. त्यांनी दरेकरांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत त्यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले आहे. या आंदोलनावेळी पोलिसांकडून आंदोलनकांची धरपकड करण्यात आली. यावेळी दरेकरांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लागवले आहेत. तर प्रवीण दरेकर चोर है…गली गली मे शोर है, बीजेपीवाले चोर है…च्या जोरदार घोषणा यावेळी आंदोलकांकडून देण्यात आल्या. यावेळी आंदोलकांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत आपच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीही दरेकरांवर सतत आरोप करत आहे. ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आम आदमी पार्टीने यात उडी घेतल्याने आगामी निवडणूक आणखी चुरशीची होणार आहे.

गली गली शोर है, प्रवीण दरेकर चोर है-आप

पोलिसांनी आमचे कपडे फाडले आहेत, आम्हाला मारलं आहे. पोलीस दडपशाही करत आहेत, असा आरोप यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी केला. तसेच भाजपला जरा जरी लाज उरली असेल तर मुंबईला लुटणाऱ्या प्रवीण दरेकरांचा राजीनामा घ्यावा, अशी तिखट प्रतिक्रिया यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. तसेच प्रवीण दरेकरांचा जोपर्यंत राजीनामा घेणार नाही, तोपर्यंत आम्ही शांत होणार नाही. पंतप्रधान मोदी बोलतात. ना खाऊंगा, ना खाने दुंगा, मग प्रवीण दरेकरांचा राजीनामा का घेत नाही? असा सावल यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. हे आंदोलन आता फक्त सुरू झालं आहे. असाही इशारा आपने दिला आहे. तसेच राष्ट्रवादीचा दरेकरांना पाठिंबा असल्याचा आरोपही आम आदमी पार्टीने केला आहे.

प्रवीण दरेकर काय म्हणाले?

दरेकरांनी हे आरोप फेटाळून लावताना कोर्टात जाण्याचा आणि दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. ही मागणी निराधार आहे. बँकेचा नफा पंधरा कोटी असताना दोन हजार कोटींचा घोटाळा होणे शक्य नाही, त्यामुळे मी आपचे शिंदे आणि काँग्रेसचे भाई जगताप, आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात अब्रू नुकसानचीचा दावा ठोकणार. राज्य सरकार अनेक विषयात अपयशी ठरलं त्यामुळे हे सर्व सुरू आहे. शिवाय आपला आपले हातपाय मुंबईत पसरायचे आहेत, म्हणून हे सर्व सुरू आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

navneet rana on privilege motion: नवनीत राणांचा संसदेत हक्कभंग, मुंबई, अमरावतीच्या पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये नाराजी? Chandrasekhar Bavankule यांनी सांगितलं कारण

attacked on kejriwal house: अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला, सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.