मुंबईत तब्बल 1000 कोटींचं ड्रग्ज जप्त
मुंबई : मुंबईतील वाकोला परिसरात मुंबई पोलिसांनी ड्रग्जवरील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. तब्बल 1000 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडे सेलिब्रेशनचं वातावरण तयार झालं आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये पार्ट्यांचं आयोजनही करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर या काही दिवसात ड्रग्जची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते. मुंबईतील वाकोला परिसरातून मुंबई पोलिसांनी एक हजार […]
मुंबई : मुंबईतील वाकोला परिसरात मुंबई पोलिसांनी ड्रग्जवरील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. तब्बल 1000 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडे सेलिब्रेशनचं वातावरण तयार झालं आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये पार्ट्यांचं आयोजनही करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर या काही दिवसात ड्रग्जची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते.
मुंबईतील वाकोला परिसरातून मुंबई पोलिसांनी एक हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. एका वाहनातून 100 किलो वजनाचे हे ड्रग्ज नेले जात होते. फेटानिल असे या ड्रग्जचे नाव असल्याची माहिती मिळते आहे. या ड्रग्जसोबत कार आणि त्यातील चौघा जणांना मुंभी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईतून अमेरिकेला फेटानिल असे या जप्त केलेल्या ड्रग्जचे नाव आहे.
वेदनाशामक औषधे आणि अँनास्थेशियासाठीही फेटानिलचा वापर केला जातो. फेटानिल इंजेक्शन, स्प्रेद्वारे नाकातून किंवा तोंडावाटे सेवन केले जाते. फेटानिलचे साइड इफेक्ट्स जास्त असल्याने निर्बंध घालण्यात आले आहे. फेटानिलमुळे श्वासोच्छवास, कमी रक्तदाब त्रास, व्यवसानाधिनता वाढते.
अमेरिकेत 2016 मध्ये फेटानिलमुळे 20 हजार जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली होती.