मुंबई -पुणे एक्सप्रेस वे वर भिषण अपघात; एक ठार, एक जखमी
मुंबई -पुणे एक्सप्रेस वे वर भिषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला असून, एक जण जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी खोपोलीच्या पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई : मुंबई -पुणे एक्सप्रेस वे वर भिषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला असून, एक जण जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी खोपोलीच्या पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीची प्रकृती देखील गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मध्यरात्री अडीच्या सुमारास हा अपघात घडला.
वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई -पुणे एक्सप्रेस वे वर खोपोलीजवळ बोरघाटामध्ये हा अपघात घडला. पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या भरधाव पिकअपने क्रॅश बॅरियरला धडक दिली, धडकेनंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पिकअप पलटी झाले. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. उपस्थितांनी जखमीला उपचारासाठी खोपोवलीच्या पालिका रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान अपघातात मृत आणि जखमी झालेल्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. जखमीवर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
वाहने जपून चालवण्याचे आवाहन
दरम्यान या अपघातामध्ये बॅरियरला धडकून वाहन पलटी झाल्याने वाहनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. बोरघाट हा वळणाचा रस्ता असल्याने वाहने चालवताना काळजी घ्यावी, वाहनाचा वेग नियंत्रीत करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या
कल्याणमध्ये शिवसेनेला खिंडार पडणार?, माजी आमदार भाजपच्या वाटेवर?; उलटसुलट चर्चांना उधाण