VIDEO : अमोल पालेकरांना भाषण करताना आयोजकांनी रोखलं!
मुंबई : नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या (NGMA) कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचं भाषण सुरु असतानाच आयोजकांनी त्यांना रोखल्याचं प्रकरण समोर आलं आहे. अमोल पालेकर हे सरकारवर टीका करत असताना, आयोजकांनी त्यांना रोखलं. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे प्रभाकर बरवे यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यातील ‘इनसाईड द एम्प्टी बॉक्स’ या प्रदर्शनाच्या […]
मुंबई : नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या (NGMA) कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचं भाषण सुरु असतानाच आयोजकांनी त्यांना रोखल्याचं प्रकरण समोर आलं आहे. अमोल पालेकर हे सरकारवर टीका करत असताना, आयोजकांनी त्यांना रोखलं.
नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे प्रभाकर बरवे यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यातील ‘इनसाईड द एम्प्टी बॉक्स’ या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रकार अमोल पालेकर यांनी हजेरी लावली होती.
अमोल पालेकर आणि आयोजकांमधील संवाद जसाच्या तसा :
अमोल पालेकर : एनजीएमएच्या शाखा कोलकाता आणि ईशान्यत सुरु होतायत हे चांगलं आहे. 13 नोव्हेंबरला आणखी अतिशय खराब निर्णय घेतला की पुढचे सगळे प्रदर्शन..
आयोजक महिला : सॉरी..सर तुम्ही फक्त प्रभाकर बर्वेंबदद्ल बोला. हा कार्यक्रम फक्त बर्वेंबद्दल आहे. तुम्ही त्यावरच बोला.
अमोल पालेकर : सॉरी, होय मी त्यांच्याबद्दलच बोलतोय. याच्याशी संबंधीत बोलतोय.
आयोजक महिला : सॉरी सर, तुम्हाला थांबवावं लागेल.
अमोल पालेकर : तुम्ही मला सांगताय की मी बोलू नये. तुम्ही तर मला निमंत्रीत केलंय.
आयोजक महिला : होय, मी तुम्हाला बर्वेंबद्दल बोलायला निमंत्रीत केलेलं आहे.
अमोल पालेकर : अलिकडेच तुम्हाला लक्षात असेल की नयनतारा सहगल यांना निमंत्रीत केलं गेलं होतं आणि ज्यावेळेस त्या सध्यस्थितीबद्दल बोलणार आहेत असं कळालं त्यावेळेस त्यांचं निमंत्रण रद्द केलं गेलं. तशीच तुम्ही आता परिस्थिती निर्माण करताय ? तुम्ही मला बोलू देणार नाहीत ?
VIDEO :