Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधवा औक्षण करू शकतात का? मंगळसूत्र घालू शकतात का?; आयोगाच्या ‘त्या’ प्रश्नांवर प्रसिद्ध अभिनेत्री भडकली; थेट मुख्यमंत्र्यांना…

राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्यभरात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण केलं जात आहे. या सर्वेक्षणासाठी प्रत्येक घरात एक फॉर्म दिला जातोय. या फॉर्मवर विधवा महिलांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी आक्षेप घेतला आहे.

विधवा औक्षण करू शकतात का? मंगळसूत्र घालू शकतात का?; आयोगाच्या 'त्या' प्रश्नांवर प्रसिद्ध अभिनेत्री भडकली; थेट मुख्यमंत्र्यांना...
Follow us
| Updated on: Feb 02, 2024 | 6:06 PM

मुंबई | 2 फेब्रुवारी 2024 : राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सर्वेक्षण सुरु आहे. या सर्वेक्षणासाठी घरोघरी फॉर्म दिला जात आहे. तो फॉर्म प्रत्येक कुटुंबांना भरण्यास सांगितलं जात आहे. या फॉर्ममध्ये विधवा स्त्रियांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर प्रसिद्ध अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करत फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत तक्रार केली आहे. तसेच संबंधित प्रश्न या फॉर्मवरुन हटवून देण्यात यावेत, अशीदेखील मागणी त्यांनी केली आहे. या फॉर्मध्ये स्त्रियांविषयी काही जाचक प्रश्न विचारण्यात आल्याचं दीपाली सय्यद यांचं म्हणणं आहे. ‘कुटुंबाची सामाजिक माहिती’ या मथळ्याखाली याबाबतचे प्रश्न विचारण्यात आले आहेत. दीपाली यांनी संबंधित फॉर्मच्या प्रश्नावलीचा फोटोदेखील आपल्या पोस्टसोबत जोडले आहेत. त्यावर आता विविध जणांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

दीपाली सय्यद नेमकं काय म्हणाल्या?

“सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपण मराठा समाजाला आरक्षण संदर्भात दिलेला शब्द पूर्ण करून या समाजाला आरक्षण दिले याबद्दल आपले खूप अभिनंदन! सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आपले अभिनंदन करत असताना मी एक महिला म्हणून राज्य मागासवर्गीय आयोगाच्या प्रश्नावलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. साहेब मराठा आरक्षण देण्यासंदर्भात या समितीने विधवा महिलांच्या विषयी काही जाचक प्रश्न विचारले आहेत. तरी आपण कर्तृत्वशाली मुख्यमंत्री असून हे जाचक प्रश्न या यादीमधून तात्काळ हटवावे ही आपणास विनंती”, असं दीपाली सय्यद आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.

संबंधित फॉर्ममध्ये नेमके प्रश्न काय विचारले आहेत?

1) सरकारी योजनांचा लाभ : तुम्हाला कोणत्या सरकारी योजनांचा लाभ झाला आहे?

2) जर हो, तर कृपया लाभ मिळालेल्या प्रमुख तीन योजनांची नावे सांगा…

3) तुमच्या समाजात लग्नामध्ये हुंडा जेण्याची पद्धत आहे का?

4) तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना कपाळाला कुंकू लावण्याची अनुमती आहे का?

5) तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना मंगळसूत्र घालण्याची अनुमती आहे का?

6) तुमच्या समाजात विधवा स्त्री औंक्षण करु शकतात का?

7) तुमच्या समाजात विधुर पुरुषांचे पुनर्विवाह होतात का?

8) तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना धार्मिक पूजा पाठ करु दिलं जातं का?

9) तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना हळदी-कुंकू कार्यक्रमांसाठी आमंत्रित करतात का?

10) तुमच्या समाजात विधवांना धार्मिक कार्यक्रमात किंवा शुभ कार्यात बोलावंल जातं का?

11) तुमच्या समाजात विवाहित स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतला पाहिजे असं बंधन आहे का?

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.