मविआत मोठा गेम, अभिनेत्री स्वरा भास्करचा पती फहद अहमद सपाकडून अणुशक्तीनगरच्या जागेसाठी इच्छुक, नवाब मलिकांची चिंता वाढणार?

महाविकास आघाडीत समाजवादी पक्षाकडून अणुशक्तीनगरच्या जागेची मागणी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. समाजवादी पक्षाकडून फहद अहमद इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे.

मविआत मोठा गेम, अभिनेत्री स्वरा भास्करचा पती फहद अहमद सपाकडून अणुशक्तीनगरच्या जागेसाठी इच्छुक, नवाब मलिकांची चिंता वाढणार?
स्वरा भास्करचा पती फहद अहमद सपाकडून अणुशक्तीनगरच्या जागेसाठी इच्छुक
Follow us
| Updated on: Sep 24, 2024 | 3:51 PM

महाविकास आघाडीत जागावाटपांसाठी बैठकांचं सत्र पार पडत आहे. या जागावाटपात कुणाला किती जागा मिळतात? हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. विशेष म्हणजे काही जागांवर संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. त्यापैकी एक महत्त्वाची जागा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांचा अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ. अणुशक्तीनगरच्या जागा ही महायुतीत कदाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटण्याची शक्यता आहे. या जागेवर अजित पवार नवाब मलिक यांना पुन्हा संधी देतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत नवाब मलिक यांच्यावक नवी लॉन्ड्रिंग प्रकरणाचे आरोप असल्यामुळे अजित पवार कदाचित त्यांच्या कन्येला विधानसभेचं तिकीट देऊ शकतात, अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतही जोरदार हालचाली घडत असल्याची माहिती मिळत आहे. महाविकास आघाडी देखील नवाब मलिक यांच्याविरोधात तितकाच तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. सूत्रांकडून याबाबत अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

महाविकास आघाडीत समाजवादी पक्षाकडून अणुशक्तीनगरच्या जागेची मागणी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. समाजवादी पक्षाकडून फहद अहमद इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे. फहद अहमद हे अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती आहेत. अहमद हे सध्या समाजवादी पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी कार्यरत आहेत. त्यांच्याकडून अणुशक्तीनगरच्या जागेची मागणी करण्यात आली आहे.

फहद अहमद कोण आहे?

फहद अहमद यांनी 2022 मध्ये समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. त्याआधी त्यांनी विद्यार्थी संघटनांमध्ये काम करत अनेक रॅली आणि आंदोलनांमध्ये सहभाग घेतला होता. त्यांनी केलेल्या एका आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीदेखील समर्थन दिलं होतं. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शुल्क माफीबद्दलचं ते आंदोलन होतं. याशिवाय फहद अहमद यांनी सीएए कायद्याच्या विरोधातील रॅलींमध्ये सक्रीय सहभाग घेतला होता.

अभिनेत्री स्वरा भास्करसोबत लग्न

फहद अहमद यांनी गेल्यावर्षी 16 फेब्रुवारी 2023 ला बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिच्यासोबत लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नावर काही जणांनी प्रचंड टीका केली होती. या दरम्यान 23 सप्टेंबर 2023 ला स्वरा भास्करने मुलीला जन्म दिला होता. फहद अहमद आणि स्वराची मुलगी आता एक वर्षांची झाली आहे. लग्नानंतर आपली मानसिक अवस्था काय होती, याबाबत स्वराने नुकतंच एका मुलाखतीत मनमोकळेपणाने मत मांडलं आहे.

अणुशक्तीनगरचा इतिहास काय?

अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाची निर्मिती 2008 मध्ये झाली होती. या मतदारसंघात 2009 मध्ये नवाब मलिक जिंकून आले होते. त्यानंतर 2014 मध्ये शिवसेनेचे तुकाराम काटे जिंकून आले होते. त्यानंतर 2019 मध्ये नवाब मलिक जिंकून आले होते. नवाब मलिक हे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री देखील होते. पण अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाशी संबंधित व्यवहार केल्याच आरोप त्यांच्यावर झाला होता. नवाब मलिक यांना पैशांची अफरातफर प्रकरणात अटकही झाली होती. या प्रकरणी ते अनेक महिने जेलमध्ये होते. अखेर सत्तांतरानंतर प्रकृतीच्या कारणास्तव नवाब मलिक यांना जामीन मंजूर झालाय. मलिक यांनी अजित पवार यांच्या पक्षात जाणं पसंत केलं आहे. पण या गोष्टीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोध आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.