मुंबईतील कोरोना नियंत्रणात आणणाऱ्या पालिका अधिकाऱ्यालाच कोरोनाचा संसर्ग, प्रकृती स्थिर
रात्र न् दिवस काम करून मुंबईतील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणणारे पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. (suresh kakani)
मुंबई: रात्र न् दिवस काम करून मुंबईतील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणणारे पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं. मात्र, कोरोनाची लक्षणे न आढळल्याने त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. (additional municipal commissioner suresh kakani infected covid positive)
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना कोरोनाची लागल झाली आहे. त्यामुळे त्यांना सेव्हन हिल्स रूग्णालयात चेकअपसाठी गेले होते. लक्षणे नसल्याने ते परत घरी आले असून होम क्वारंटाईन झाले आहेत. मुंबईतील कोरोना संकट थोपवण्यात काकाणी यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
देशात कोरोना रुग्ण किती?
देशात गेल्या 24 तासात भारतात 32 हजार 937 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 417 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 35 हजार 909 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
मुंबईतील आकडेवारी काय?
दरम्यान, राज्यात काल 4 हजार 797 कोरोना रुग्ण आढळले असून 130 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात काल 3710 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या 61, 89, 933 वर गेली आहे. मुंबईत आतापर्यंत 73, 9331 रुग्णांना कोरोना झाला आहे. त्यापैकी 71, 7844 रुग्ण बरे झाले आहेत. तर 15,981 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत सध्या 3096 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आतापर्यंतची आकडेवारी
देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 22 लाख 25 हजार 513 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 14 लाख 11 हजार 924 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 31 हजार 642 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 81 हजार 947 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 54 कोटी 58 लाख 57 हजार 108 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (additional municipal commissioner suresh kakani infected covid positive)
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 16 August 2021 https://t.co/N83KSL50Ad #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 16, 2021
संबंधित बातम्या:
Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट सुरुच, कोरोनाबळींचा आकडाही घसरला
अंबरनाथमध्ये सर्वात मोठी लसीकरण मोहीम, 30 हजार कामगारांना दिली जाणार मोफत लस
(additional municipal commissioner suresh kakani infected covid positive)