महाडमध्येच एनडीआरएफचं बेस कॅम्प का?; आदिती तटकरे यांनी सांगितलं कारण!
महाडच्या तळीयेमध्ये दरड कोसळण्याची घटना घडल्यानंतर कोकणात एनडीआरएफचं बेस कॅम्प असावं या मागणीने जोर धरला आहे. (aditi tatkare addresses press conference)
मुंबई: महाडच्या तळीयेमध्ये दरड कोसळण्याची घटना घडल्यानंतर कोकणात एनडीआरएफचं बेस कॅम्प असावं या मागणीने जोर धरला आहे. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनीही महाडमध्येच एनडीआरएफ किंवा एसडीआरएफचं बेस कॅम्प असावं अशी मागणी केली आहे. महाडमध्येच बेस कॅम्प का असावं याची कारणमिमांसाही आदिती तटकरे यांनी केली आहे. (aditi tatkare addresses press conference, demand ndrf base camp in mahad)
आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. एनडीआरफची एक कायमस्वरुपी टीम महाडमध्ये असावी. एनडीआरएफची टीम किंवा त्यांचा बेस कॅम्प येण्यास उशीर लागत असेल तर एसडीआरएफचा बेस कॅम्प उपलब्ध व्हावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना केली असून त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महाडमध्ये एक जागा निश्चित केली आहे. त्या ठिकाणी बेस कॅम्प तयार झाल्यास दुर्घटना घडल्यास तातडीनं पोहोचता येईल. आता महाडमध्ये दरड कोसळली. त्या आधी खेडमध्ये अशीच दुर्घटना घडली असती. महाड हे मध्यवर्ती ठिकाण आहे. महाडमध्ये बेस कॅम्प झाला तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पोहोचणं सोपं जाणार आहे. महाडमधून तीन जिल्हे कव्हर करणं एनडीआरएफला सोपं जाऊ शकतं त्यामुळे महाडमध्येच बेस कॅम्प झालं पाहिजे, असं आदिती यांनी सांगितलं.
तोपर्यंत एसडीआरएफची टीम असावी
कोकणात काही दुर्घटना घडल्यास मुंबई आणि पुण्यातून रेस्क्यू टीम पोहोचेपर्यंत 8 ते 10 तास जातात. त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनला विलंब होतो. परिणामी मोठी हानी झालेली असते. त्यामुळे महाडमध्ये एनडीआरएफचा बेस कॅम्प असला पाहिजे. एनडीआरएफचा बेस कॅम्प देता आला नाही तर एसडीआरएफचा कॅम्प द्यावा. जेणे करून दुर्देवाने भविष्यात दुर्घटना घडल्यास तात्काळ मदत पोहोचेल, असं त्या म्हणाल्या. एनडीआरएफ संदर्भात केंद्राकडं मागणी केलीय आहे. मात्र, जोपर्यंत केंद्राची मंजूर मिळत नाही तोपर्यंत एसडीआरएफच्या बेस कॅम्पला मंजुरी द्यावी, असंही त्या म्हणाल्या.
सहा महिन्यात पूनर्वसन करा
तळीये येथील दुर्घटनाग्रस्तांचं पूनर्वसन करण्यासंदर्भात स्थानिकांशी चर्चा करावी लागते. तळीये ग्रामस्थांनी आता जिथं वाडी आहे त्या जवळचं पूनर्वसन करावं अशी विनंती केली आहे. येत्या सहा महिन्यात पूर्नवसन करण्यात यावं, असंही आदिती तटकरे म्हणाल्या. (aditi tatkare addresses press conference, demand ndrf base camp in mahad)
VIDEO | 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 28 July 2021 https://t.co/HLdcXueajU #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 28, 2021
संबंधित बातम्या:
VIDEO : धीर तरी कसा देऊ, हातावर नोटा ठेवून उर्मिला मातोंडकर ढसाढसा रडल्या
मराठमोळ्या दीपाली सय्यदची बॉलिवूडकरांना चपराक, भुदरगडमध्ये जाऊन तब्बल 10 कोटींची मदत
BREAKING : जयंत पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात, अस्वस्थ वाटू लागल्याने मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडली
(aditi tatkare addresses press conference, demand ndrf base camp in mahad)