Aditya Thackeray : उद्यापासून आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा, गळती रोखण्यात यश येणार?

अनेक महानगरपालिकातील नगरसेवक हे शिंदे गटाकडे वळले आहेत. हीच गळती थांबवण्यासाठी आता आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेची घोषणा केली आहे.

Aditya Thackeray : उद्यापासून आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा, गळती रोखण्यात यश येणार?
आदित्य ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 6:38 PM

मुंबई : राज्यात ठाकरे सरकार पडलं आणि उद्धव ठाकरेंमागे (Uddhav Thackeray) लागलेला गळतीचा पाढा संपवायचं नाव घेईना. रोज एक नवा नेता शिंदे (Cm Eknath Shinde) गटात दिसू लागला. सुरुवातीला 35 ते 40 लोक एकनाथ शिंदे यांच्या सोबत आधी गुजरातला आणि तिथून गुवाहाटीला गेल्याच्या बातम्या आल्या. मात्र त्यानंतर हा आकडा एक एक करून वाढत 50 वरती जाऊन (Shivsena MLA) पोहोचला. आमदार परत आले, राज्यात सरकार स्थापन झालं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मात्र तरीही ठाकरेंची डोकेदुखी संपेना, कारण आता नवं सरकार स्थापन झाल्यावर शिंदे यांच्या पावलावर पाऊल टाकत अनेक नेते, स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते, अनेक महानगरपालिकातील नगरसेवक हे शिंदे गटाकडे वळले आहेत. हीच गळती थांबवण्यासाठी आता आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेची घोषणा केली आहे.

महाराष्ट्र पिंजून काढणार

शिवसेनेतली पडझड रोखण्यासाठी आदित्य ठाकरे हे उद्यापासूनच निष्ठा यात्रेवर निघत आहे. आदित्य ठाकरे हे मुंबईतला प्रत्येक मतदार संघ प्रत्येक शाखा पिंजून काढणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या यात्रेची सुरुवात ही बंडखोर आमदार यामिनी जाधव यांच्या मतदारसंघातून म्हणजेच मुंबईतील भायखळ्यातून होत आहे. आदित्य ठाकरे मुंबईतील ठाकरे गटाकडे उरलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आदित्य ठाकरे यांचीही निष्ठा यात्रा फक्त मुंबई पुरती थांबणार नाही, तर आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र पिंजून काढण्याचाही प्लॅन आखला आहे.

बंडखोरांच्या मतदारसंघातही फिरणार

आदित्य ठाकरेंची ही निष्ठा यात्रा महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात निघणार आहे. बंडखोर आमदारांच्या मतदार संघात तर आदित्य ठाकरे जास्त ताकद लावून ही निष्ठा यात्रा काढणार आहेत. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. संघटन बांधून ठेवण्याचं काम करणार आहेत. मात्र आता आदित्य ठाकरे यांना शिगळती रोखण्यात किती यश येईल याबाबत ही शंका आहे.

गळती थांबवण्यात यश येणार?

आज सकाळीच नागपुरातील काही कार्यकर्ते आणि पदाची गाडी हे ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील होणार असल्याची बातमी आली. त्या पाठोपातच ठाण्यातल्या नगरसेवकांनी ठाकरेंना दुसरा हादरा दिला आणि शिंदे गटाशी वाढ धरली ही बातमी शांत झाली नव्हती तोपर्यंतच तिसरी बातमी आली की नवी मुंबईतील नगरसेवकही आता शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुका पाहता शिंदेंची ताकद वाढतेय, तर ठाकरे गटाची साथ लोक सोडत आहेत, आता आदित्य ठाकरेंची ही यात्रा किती कार्यकर्ते बांधून ठेवणार? हे येणाऱ्या निवडणुका आणि येणारा काळच सांगेल.

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.