अन्याय होत असेल, तर मैत्रीचा विषय येतोच कुठे; आदित्य ठाकरेंकडून भाजप-सेना युतीच्या चर्चेचे एका घावात दोन तुकडे
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरतोय. दोन पक्ष जिथे एकमेकांविरोधात लढलोय, तिथे नाराजी असणे स्वाभाविक आहे. वरिष्ठ नेते लक्ष घालतायत. यातूनही मार्ग निघेल.
मुंबईः आपल्यावर अन्याय होत असेल, तर मैत्रीचा विषय येतोच कुठे म्हणत भाजप-शिवसेना (BJP-Shivsena) युतीच्या चर्चेचा आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) एका घावात तुकडा पाडून पूर्णविराम दिला. आदित्य म्हणाले की, त्यांच्याकडून जी वागणूक दिली जातेय…मैत्री होणार की नाही हा दुसरा भाग आहे. सध्या देशासमोरील विषय हे राजकारणापेक्षा महत्त्वाचे आहेत. आपल्यावर अन्याय करत असाल, तर मैत्रीचा विषय येतो कुठे. सध्या बिगर भाजप राज्यात राजकीय षडयंत्र सुरू आहे. आम्ही टक्कर द्यायला सज्ज आहोत. नैराश्यातून सुरू असलेले हे घाणेरडे राजकारण थांबले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सध्या येणाऱ्या काही दिवसांत मुंबई (Mumbai) महापालिकेची निवडणूक आहे. त्यासाठी भाजप आणि शिवसेना या दोघांनीही आकाश-पाताळ एक करत आत्तापासूनच तयारी सुरू केलीय. राज्याच्या राजकारणा सुरू असलेल्या कुरघोड्याही त्याचाच एक भाग असल्याची चर्चा आहे. यात अनेकदा भाजप-शिवसेना युतीचा मुद्दा अनेकजण उगाळतात. त्याला आज आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे.
केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर…
शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी नुकतेच निधी वाटपाबाबत शिवसेनेवर अन्याय झाल्याचे वक्तव्य केले होते. याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले की, राजकारणात थोडं मागे-पुढे चालत असते. मात्र, ते तानाजी सावंत यांचे वैयक्तिक मत असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणावरही अन्याय होवू देणार नाहीत. अफवावर किती बोलायचे. किती अफवा पसरवल्या जातात. बदनामीचा प्रकार केला जातोय. अधिकृत गोष्टी आल्यावरच आम्ही बोलू. ज्या राज्यात भाजप सरकार नाही, तिथे केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर सुरू आहे. मात्र, महाराष्ट्र टक्कर द्यायला सज्ज आहे. सध्या सुडाचे, बदनामीचे राजकारण सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.
‘मविआ’चा प्रयोग यशस्वी
आदित्य ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरतोय. दोन पक्ष जिथे एकमेकांविरोधात लढलोय, तिथे नाराजी असणे स्वाभाविक आहे. वरिष्ठ नेते लक्ष घालतायत. यातूनही मार्ग निघेल. रिफायनरीसंदर्भात समर्थक आणि विरोधकांची भूमिका समजून घेणार आहोत. ही भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवणार आहोत. रिफायनरीच्या प्रकल्पासाठी जागा पाहत आहोत. प्रदूषण होणार नाही, अशा दृष्टीने प्रकल्प करणार आहोत. सध्या राजकीय मोर्चेबांधणी पेक्षा आम्ही पर्यावरण, पर्यटन आणि कामावर फोकस दिलेला आहे.
इतर बातम्याः