मेट्रो कारशेडची नवी जागा लवकरच घोषित करू, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य, वाद संपणार?
कारशेड कांजूर मार्गला करत असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आलं. मात्र ही जागा केंद्र आणि राज्य सरकारच्या वादात सापडली. केंदाने या जागेवर दावा केल्याने राज्य सरकारच्या अडचणी वाढल्या. आज पुन्हा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी कारशेडचा उल्लेख करत मोठं वक्तव्य केलंय.
मुंबई : मुंबई मेट्रेच्या कारशेडसाठी (Mumbai Metro Car shade) जागेचा वाद अजूनही संपलेला नाही. सुरूवातील फडणवीस सरकारच्या काळाच आरेच्या जंगलात कारशेडचा (Aare Forest) घाट घातला. त्यासाठी काही झाडंही तोडण्यात आली. मात्र शिवसेना आणि पर्यावरण प्रेमींना आरेत मेट्रोच्या कारशेडला कडाडून विरोध केला. काही दिवसातच राज्यात सत्तापालट झालं. भाजप सरकार जाऊन महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. त्यानंतर ठाकरे सरकारने आरेतल्या कारशेडला स्थगिती देत पहिला झटका दिला. त्यानंतर कारशेड कांजूर मार्गला करत असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आलं. मात्र ही जागा केंद्र आणि राज्य सरकारच्या वादात सापडली. केंदाने या जागेवर दावा केल्याने राज्य सरकारच्या अडचणी वाढल्या. आज पुन्हा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी कारशेडचा उल्लेख करत मोठं वक्तव्य केलंय.
मेट्रोचे कारशेड कुठे होणार?
मेट्रोच्या कारशेडची जागा वादात सापडली आहे. लवकरच मेट्रोच्या कारशेडचे नवे ठिकाण जाहीर करू असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. त्यामुळे कारशेड कुठे होणार असा सवाल उपस्थित झालाय. तसेच तिथल्या स्थानिकांशी संवाद साधताना, हे सरकार आपले आहे. मुख्यमंत्री आपले आहेत. आता मागण्या हक्काने पूर्ण करून घ्यायच्या आहेत, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. आरेतील हा रस्ता केला पाहिजे अशी आपण चर्चा केली होती. आरेचा हा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे तो चांगला झाला पाहिजे. मी त्यावेळी आयुक्त चहल यांना फोन केला होता. रस्त्याची रुंदी न वाढवता जसा आहे तसा रस्ता राहील, एकही झाड तुटणार नाही, असे सांगितले होते, असेही ते म्हणाले.
आदिवासी पाड्यासाठी वेगळी सिस्टीम
वन्य प्राण्यासाठी रस्त्याच्या खालून कलवट बाधण्यात येणार आहे. हा रस्ता रात्री 1 ते सकाळी 6 इतर लोकांसाठी बंद असेल फक्त आरेतील लोकांसाठी चालू असेल. आपण वाईल्ड लाईफ आणि लोकांसाठी हा रस्ता बनवत आहोत. आदिवासी पाड्यासाठी वेगळी सिस्टीम बनवत आहोत, असेही ते म्हणाले. तसेच त्यांनी राजकीय मुद्यावरही भाष्य केले आहे. देशात लोकशाही किती जिवंत आहे? हा विचार करावा सर्वांनाच कारवा लागेल. जिथे निवडणुका होतात तिथे केंद्रीय तपास यंत्रणा आणि असे प्रकार समोर येत आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी फोन टॅपिंगच्या वादावर दिली आहे.
फोन टॅपिंगचे आदेश देणारे ‘बिग बॉस’ कोण? गुजरात मॉडेल मुळासकट उखडून फेकण्याची गरज-काँग्रेस
Video: राणे म्हणजे राणेच, रोमानियाला ‘वुमानिया’ म्हणाले तर देशाची राजधानीही बदलून टाकली!
फडणवीस असताना फोन टॅपिंगच्या घटना घडल्या, किंमत अधिकाऱ्यांना चुकवावी लागेल: शरद पवारांचा इशारा